Chandigarh University Video Leaked News In Marathi : पंजाबमधील एका खासगी विद्यापीठातील अनेक विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. शनिवारी रात्री उशिरापासून शेकडो विद्यार्थ्यांनी हा मुद्दा उपस्थित करत आंदोलन केले.या प्रकरणी मोहालीचे एसएसपी विवेक सोनी यांनी सांगितले की, मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लुधियाना-चंदीगड महामार्गावर स्थित खाजगी विद्यापीठ
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण लुधियाना-चंदीगड हायवेवर असलेल्या एका खासगी विद्यापीठाशी संबंधित आहे. जिथे शेकडो विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री उशिरा आंदोलन केले आणि इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्याच एका सहकारी विद्यार्थिनीने लीक केल्याचा आरोप केला होता.
विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची अफवा
आपल्याच सहकारी विद्यार्थिनीने आपले आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ते तीच्या मित्राला पाठवले अशी माहिती विद्यापीठात वाऱ्यासारखी पसरली आणि यामुळे कित्येक मुली बेशुद्ध पडल्या तर काही मुलींनी आत्महत्या केल्याची अफवा उडाली,मात्र सुदैवाने कुणीही आत्महत्या केलेली नाही,असं विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितलं आहे.
एकाही विद्यार्थिनीने आत्महत्या केली नाही. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी मुलीने तिचे स्वतःचे फोटो/व्हिडिओ तिच्या प्रियकराला पाठवले होते. इतर साहित्य सापडले नाही. एफआयआर दाखल केला. पोलीस त्याचा तपास करत आहेत. मी विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका:-कुलगुरू
विद्यापीठातील विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी मुलीने तिचे स्वतःचे फोटो/व्हिडिओ तिच्या प्रियकराला पाठवले होते.
माहिती देताना पोलिस म्हणाले की, आतापर्यंत आमच्या तपासात आम्हाला असे आढळून आले आहे की आरोपी मुलीचा एकच व्हिडिओ आहे. तिने इतर कोणाचाही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. तिच्याकडे असलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनी कडक कारवाईचे संकेत दिले
ही घटना उघडकीस आल्यानंतर पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोतसिंग बैंस यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना
शांत राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
ते म्हणाले की ही अत्यंत संवेदनशील बाब आहे आणि आमच्या बहिणी आणि मुलींच्या प्रतिष्ठेचीसन्मानाचा मुद्दा आहे.
गांजा तस्करीत तरुणाला फसवून लाच घेणाऱ्या पोलिसांवर पोलिस आयुक्तांची कारवाई
जात मुद्यावरून अंत्यसंस्कार करण्यास रोखले; बाहेरच करावा लागला विधी
मराठा समाजाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य ; किरणकुमार बकाले निलंबित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on SEP 18,2022, 17:30 PM
WebTitle – Chandigarh University Video Leaked News latest