पाकिस्तान,दि 23 : लाहोरच्या पूर्व भागात तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या अतिरेकी हाफीज सईद च्या निवासस्थानाजवळ बुधवारी एक शक्तिशाली बॉम्बस्फोट पडला,हा बॉम्बस्फोट कार मध्ये झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यात दोनजण ठार तर 14 जन जखमी झाले, अशी माहिती पोलिस आणि बचाव अधिकाऱ्यांनी दिली.
फुटेज पाहून स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो. डॉन या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजलेले नाही. आपत्कालीन बचाव दलाच्या सदस्याने सांगितले, ‘गॅस पाइपलाइनमध्ये स्फोट झाला की सिलिंडर, हे अद्याप समजलेले नाही. आम्ही चार लोकांना रुग्णालयात हलवले आहे, जखमींची संख्या आणखी वाढू शकते.
लाहोरच्या जोहर टाऊन परिसरात हा स्फोट झाला, असे स्थानिक पोलिस प्रमुख इनाम घनी यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले की हे आत्मघाती बॉम्बस्फोट होते की बॉम्ब रिमोटने स्फोट करून घटना घडली
हे निश्चित करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत.जखमींमध्ये काही पोलिस अधिकारीही होते, असे घनी यांनी म्हटलंय.
हा बॉम्बस्फोट दहशतवादी म्हणून घोषित असलेला आणि अमेरिकेने ज्याच्यावर 10 मिलियनची इनाम रक्कम घोषित केली आहे अशा हाफीज सईद च्या घराजवळ करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी इनाम घनी यांनी दिली आहे.
हेही वाचा.. शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना १६ हजार २५० रुपयांची सूट
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
WebTitle – Car bombblast near Hafiz Saeed’s home in Pakistan; two killed 14 were injured 2021-06-23