माणसाला माणसात आणणार्या, संपूर्ण मानवी समाजाला समतेची शिकवण देणाऱ्या महामानव, क्रांतीपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला “सम्राट अशोक विजयादशमी” च्या दिवशी महान बुद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली आणि भारतात चेतनाहीन, जवळपास नष्ट झालेल्या बुद्ध धम्माला पुनः ऊर्जा देऊन धम्मक्रांती केली आणि तथागत भगवान बुद्धांनी परावर्तित केलेले धम्मचक्र हे पुन:वर्तीत केले, म्हणून हया दिवसाला “धम्मचक्क अनुवत्तन दिन” सुद्धा संबोधण्यात येते. आज भारतात हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. ह्याच महान ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून “बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, UK (BAMS UK) आणि केंब्रिज बुद्धिस्ट सेंटर, इंडियन कम्युनिटी” द्वारा आयोजित “धम्म दीक्षा दिवस” हा कार्यक्रम United Kingdom मधील Cambridge, UK येथील “Cambridge Buddhist Center” येथे 13 ऑक्टोबर 2024 दिनी आत्यंतिक हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला.
ह्या कार्यक्रमानिमित्त विविध आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवातीस आरोग्य विषयक सुरक्षेच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर सामूहिक त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना, “सब्बेसत्ता सुखी होंतु” आणि “महामंगल सुत्त” ह्या धम्मदेसना गाथेंचे उच्चारण करण्यात आले. लेझिमच्या तालावर महामानवांना मानवंदना देण्यात आली आणि जयभीम च्या जयघोषाने संपूर्ण हॉल निनादून गेला. उपासकांनी एकाग्र ध्यानसाधना आणि चक्रमण ध्यानसाधना यांचा अभ्यास केला.क्रांतिकारी २२ प्रतिज्ञा यांचे महत्त्व आणि त्यांचे पठण लहान मुलांच्या सुमधूर आवाजात करण्यात आले.
सध्याच्या काळातील ताणतणावाचे जीवन जगताना येणाऱ्या असंख्य प्रश्नांना, संकटांना बुद्ध धम्माच्या संस्कारातून आपण कसे सामोरे जातो आणि त्यावर कशी मात करतो ह्या बद्दल एक महत्त्वपूर्ण Talkshow आयोजित करण्यात आला. या चर्चासत्रात बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा का घेतली, त्यांची त्यामागची भूमिका काय होती, ते ह्या निर्णयापर्यंत कसे पोहोचले आणि सर्व उपसकांची जबाबदारी ह्याची चर्चा आणि विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर या कार्यक्रमात विविध नृत्य, गाणी आणि प्रेझेंटेशनस् सादर करण्यात आले.
आपला सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न
(BAMS UK) बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, UK चा प्रयत्न हा नेहमी लहान मुलांना आंबेडकरी आणि बुद्ध धम्माचे संस्कार आणि परंपरा देण्याचा असतो. बुद्धिस्ट आंबेडकराईट मैत्री संघ, यूके मध्ये आंबेडकरी आणि बुद्धिस्ट सामाजिक आणि सांस्कृतिक मंच निर्माण करण्यात प्रयत्नशील आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समजातील लहान, मोठे यांना त्यांचे कौशल्य सादर करण्यास मंच उपलब्ध झाला. संधीचे सोने करत मुलांनी मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली. ही संघटना युनाइटेड किंग्डम येथील कौटुंबिक संघटन असून येथे राहणाऱ्या कुटुंबाना, स्टुडंट्स ना एकत्र आणून आपला सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न सातत्याने करते, त्याचवेळी कोणत्याही राजकीय संघटनांपासून अलिप्त आहे.
Cambridge Buddhist Center हे गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रेट ब्रिटेन मधील बुद्ध धम्माचे एक महत्वाचे संस्कार केंद्र आहे.
त्रिरत्न संघाची ही एक महत्वाची शाखा असून इथे बुद्ध धम्माबद्दलचे महत्वपूर्ण ज्ञान, सर्व प्रकारच्या ध्यानसाधना,
Tai chi आणि योगासने ह्यांचे प्रशिक्षण दिल्या जाते.
Cambridge Buddhist Center हे संपूर्णतः “दानं” ह्या तत्वावर चालते, जे या बौद्ध केंद्रात येणाऱ्या लोकांकडून दिले जाते.
Cambridge परिसरात बुद्ध धम्माचे पाळेमुळे रोवण्यात Cambridge Buddhist Center चे महत्वाचे योगदान आहे.
युनायटेड किंगडम मध्ये राहून देखिल ह्या संघटना बुध्द धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महान सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले,
छत्रपति शाहूजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, यांच्यासह सर्व महामानवांची अमुल्य विचारधारा आपल्या मुलांमध्ये रुजवत आहेत हे विशेष.
कार्यक्रमासाठी युनायटेड किंग्डम च्या विविध भागातून लोक आले
बहुजनांना शेकडाे वर्षे गुलामीत जाेखडबंद ठेवले हाेते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच त्यांना त्यांच्या गुणवत्तेत प्रमाणे काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच ‘उद्धरली काेटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ म्हणत “आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं” ह्याची जाण ठेवत अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, पीएचडी होल्डर्स, स्टुडंट्स सातासमुद्रापार जाऊन प्रस्थापित झालेत आणि समाजाचे उत्तरदायित्व म्हणून तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महामानवांचे विचार पसरवित आहेत.
बँकॉकमध्ये धम्मकाय फाउंडेशन ने २,५६,४७७ मेणबत्त्या लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 14,2024 | 18:00 PM
WebTitle – Cambridge, UK Hosts Celebrations of “Dhammachakra Pravartan Day” with Enthusiasm by BAMS UK and Cambridge Buddhist Center