मुंबई दि.09 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे.सध्या ते ICU मध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे.त्यांना आणखी काही दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल.
त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेज वरून दररोज देण्यात येईल.
असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी कळवले आहे.आज सकाळी रेखा ठाकूर यांनी एक पत्रक जारी करुन प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली असल्याचे त्यात म्हटले आहे.
मेडिकल बुलेटिन –
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. pic.twitter.com/lNGvyVZF3R
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 9, 2021
याच कारणामुळे पुढील तीन महीने ते सक्रीय राजकारणापासून अलिप्त राहणार आहेत.
या संदर्भात त्यांनी सोशल मिडियात एक व्हिडीओ प्रकाशीत केला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमांनी याची नोंद घ्यावी ही विनंती! @VBAforIndia pic.twitter.com/pezJFwou9y
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 8, 2021
तसेच पक्ष चालला पाहिजे संघटन चालले पाहिजे,आपण आंदोलनाची सुरुवात केली आहे.पांच जिल्ह्यात निवडणूका आहेत.पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची निवड करण्यात येत आहे.
डॉ. अरुण सावंत महाराष्ट्र कमिटी जिल्हा कमिटी आणि इतर सर्व कार्यकर्ते त्यांना मदत करून पक्षाची यशस्वीरित्या पुढील वाटचाल करतील आणि रेखाताई ठाकूर यांना सहयोग करतील.
असं अॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचं काम व्यवस्थित सुरू राहावं त्यासाठी व्हिडीओ करून
रेखाताई ठाकूर यांना सहकार्य करण्याचं आवाहन अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
ऍड.प्रकाश आंबेडकर पुढील तीन महीने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार..
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 09 , 2021 12 : 59 PM
WebTitle – bypass-surgery-on-adv-prakash-ambedkar-vba-2021-07-09