मध्यप्रदेश :उज्जैन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने अपत्यप्राप्तीच्या इच्छेने नागपूरमधून महिलेला विकत घेतले.16 महिने तीला घरातच लपवून ठेवले. तो तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार करत होता. प्रसूतीसाठी महिलेला पत्नीच्या नावाने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑपरेशनद्वारे प्रसूती करण्यात आली.त्यानंतर काही तासातच तीला रुग्णालयातून पळवून लावले. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे. याशिवाय अन्य २ जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6 नोव्हेंबर रोजी ही महिला पोलिसांना बेवारस सापडली तेव्हा ही बाब उघडकीस आली. महिलेला वन स्टॉप सेंटरमध्ये आणण्यात आले.तिच्या पोटात इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले, त्यामुळे प्रकृती अधिकच बिघडली. आता महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. महिलेच्या सांगण्यावरून पोलीसही गावातही गेले. वन स्टॉप सेंटरमध्ये महिलेची चौकशी करण्यात आली.
या प्रकरणातील पाच आरोपी
देवासगेट पोलिस ठाण्याचे प्रभारी राम मूर्ती शाक्य यांनी सांगितले की, आरोपी विरुद्ध कलम ३४४, ३७६-अ, ३६५, ३७७, ३२३, ५०६ आणि १२०बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. राजपाल सिंग दरबार त्यांच्या पत्नीसह, मेव्हणा वीरेंद्र सिंग, पुतण्या कृष्णपाल सिंग आणि एक महिला चंदा जीने मध्यस्थीची भूमिका बजावली होती अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पीडित महिला देवास गेट पोलिसांना रेल्वे स्थानकातून सापडली होती, त्यामुळे देवास गेट पोलीस ठाण्याने केस डायरीत पोलिस हद्द शून्यावर आल्याने कायथा पोलिसांकडे सुपूर्द केली आहे. महिलेला सध्या वन स्टॉप सेंटरवर ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी, गुरुवारी दुपारी तीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
आरोपी कोण आहे?
राजपाल सिंग दरबार असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. उज्जैनमधील तराना येथील काठबडोदा गावात तो उपसरपंच राहिला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे संबंध आहेत. ते या भागातील प्रबळ नेते असल्याचे बोलले जाते. त्याच्या घरात बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावरही बंदी आहे.
नागपूर मधिल चंदा नामक महिलेने केली होती तिची विक्री
नागपूरमधून महिलेला विकत घेतले – एसपी सत्येंद्र कुमार शुक्ला यांनी सांगितले की, १९ वर्षीय पीडित तरुणी नागपूरजवळील एका गावातील रहिवासी आहे. तीला आई-वडील नाहीत. ती तिच्या धाकट्या भावासोबत राहत होती. उदरनिर्वाहासाठी ती महिन्याला 5000 रुपयांवर एके ठिकाणी काम करत होती.तिचा भाऊ सध्या मूळ गावी राहत आहे. वन स्टॉप सेंटरमध्ये या महिलेने सांगितले की, नागपुरातील चंदा नावाच्या महिलेने दीड वर्षांपूर्वी लग्नाच्या बहाण्याने मला विकले या व्यक्तीला विकले होते. तो माणूस मला त्याच्या गावी घेऊन आला. येथे त्याने 16 महिने माझे शारीरिक शोषण केले.
बायकोच्या पोटावर उशी बांधली होती
महिलेने चौकशीदरम्यान सांगितले की, त्या व्यक्तीच्या पत्नीला दोन मुले आहेत. तिच्या ( राजपाल सिंग दरबार ) नवऱ्याने तिची नसबंदी करून घेतली. याच दरम्यान त्यांची मुले मरण पावली. त्याच्या बायकोला आता मुलं होत नसल्यामुळे, त्याने मला मुलं होण्यासाठी विकत घेतले. त्याची बायको मला तिच्या नवऱ्याकडे राहायला सांगायची. ती मला पण मारायची. 16 महिने लपवून ठेवले.लोकांना ती गरोदर असल्याचे वाटावे म्हणून त्या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या पोटावर उशी बांधली होती.
पत्नीच्या नावाने रुग्णालयात केले होते दाखल
यापूर्वी आरोपी डॉक्टरांकडे तपासणीसाठीही गुपचूप घेऊन जात होते.
आरोपीने पत्नीच्या नावाने महिलेला प्रसूतीसाठी दाखल केले होते.
एवढेच नाही तर पत्नीच्या नावावरच मूल आहे, असे वाटावे म्हणून तशी तिच्या नावे कागदपत्रेही तयार केली होती.
नंतर 6 नोव्हेंबर रोजी प्रसूती झाल्यावर तीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन सोडण्यात आले.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर एफआयआर नाही
पोलिसांनी महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल केलेला नाही.
वास्तविक, प्रसूतीच्या वेळी महिलेला आरोपीची पत्नी म्हणूनच दाखल करण्यात आले होते.
शिवाय आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रे सुद्धा त्याच्या खऱ्या पत्नीचीच जमा करण्यात आली होती.
आरोपीने कायदेशीर विवाह केला नाही
आरोपी राजपाल सिंगने नागपूरच्या महिलेसोबत वैदिक पद्धतीने किंवा कोर्ट मॅरेज केलेले नाही. त्याने लग्न नोटरी केले आहे. महिलेला संतुष्ट करण्यासाठी हा पेपर तयार करण्यात आल्याचे एसपीचे म्हणणे आहे. हा विवाह कायदेशीर मानला जाऊ शकत नाही. पीडित महिलेचे नवजात बाळ सध्या आरोपी राजपाल सिंग दरबारच्या कुटुंबाकडे आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला महिलेच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
महिलेची खरेदी विक्री झाली का?
आरोपी आणि महिलेची ओळख कशी झाली आणि त्यांची ओळख कोणी करून दिली? दोघांचे लग्न लावण्यात कोण-कोणांचा हात आहे?
या सर्व बाबींचाही तपास केला जाणार आहे. जेणेकरून महिलेची खरेदी विक्री झाली असेल तर ते रॅकेटही पकडले जाईल.
सध्या ती नोटरीच्या आधारे पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. पण त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही.
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 11, 2021 23: 5 PM
WebTitle – Bought a woman from Nagpur to have a child, raped for 6 months, kicked out after having a baby