किडनीविना असहाय बिहारच्या मुझफ्फरपूरच्या सुनीताची काळीज हेलावणारी कहाणी.किडनी चोरी झाल्या नंतर सुनता च्या नवराही तिला हॉस्पिटलमध्ये मरायला सोडून फरार झाला. लग्नाच्या सात फेऱ्यांपैकी तिसऱ्या फेरीत मुलगा आणि मुलगी वचन देतात की मी आयुष्याच्या सर्व टप्प्यावर तुला साथ देईन, परिस्थिती कशीही असली तरी मी तुला सोडणार नाही. पण मुझफ्फरपूरच्या (Muzaffarpur) सुनीता देवी ((Sunita Devi) चा पती जेव्हा जीवन-मृत्यूच्या संघर्षात हेलकावे खात असताना तिला सोडून गेला, तेव्हा या वचनासाठी तिनं कुणाकडं रडायचं?
याआधी ज्या डॉक्टरला पृथ्वीतलावरच्या ‘देवाचं’ रूप म्हटलं जातं, त्या डॉक्टरने तिचा विश्वासघात करून तिच्या दोन्ही किडनी चोरल्या (Both kidneys of a woman Sunita devi stolen Bihar) आणि या अवस्थेत सात जन्मापासून सोबत राहिलेला नवराही सुनीताला मध्येच सोडून पळून गेला.
जीवन-मरणाचा संघर्ष
दोन्ही किडनी चोरी झालेल्या सुनीता सोबत आता फक्त तिची तीन निरागस मुलं उरली आहेत. ज्यांची ती स्वत: काम करून काळजी घेत होती, आता ती स्वत:बुडत्या नावेत बसून रुग्णालयात दाखल झाली आहे. गर्भाशयाच्या ऑपरेशनच्या नावाखाली खासगी दवाखान्यात डॉक्टरांनी सुनीता यांच्या दोन्ही किडन्या काढल्या, त्यानंतर ती जीवन-मरणाच्या संघर्षात झुलत आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरची (Muzaffarpur, Bihar kidney case ) ही घटना रक्ता उकळविणारी अशीच आहे.एका खाजगी क्लिनिकच्या डॉक्टरने गर्भाशयाच्या ऑपरेशनच्या नावाखाली सुनीताच्या दोन्ही किडनी ((Woman kidney removed instead of uterus)) काढली. गर्भाशयाचे ऑपरेशन करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने दोन्ही किडन्या चोरल्या. सुनीताची प्रकृती वारंवार ढासळत असल्याने तपासणी केल्यावर ही धक्कादायक गोष्ट उघडकीस आली.
गुन्हा केल्यानंतर डॉक्टर फरार
ऑपरेशननंतर सुनीताची प्रकृती बिघडल्याने तिला एसकेएमसीएचमध्ये नेण्यात आले, तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या दोन्ही किडनी गायब आहेत. त्यानंतर सुनीताला पटनाच्या IGIMS मध्ये पाठवण्यात आले, मात्र तेथे काही दिवस उपचार केल्यानंतर तिला पुन्हा SKMCH मध्ये आणण्यात आले. आता असहाय सुनीताची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हा मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा केल्यानंतर डॉक्टर फरार झाला होता,मात्र, पोलिसांनी डॉक्टरच्या मुसक्या आवळत अटक केली आहे.
मुझफ्फरपूरच्या शासकीय श्री कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल झालेल्या सुनीताला दर दोन दिवसांनी डायलिसिस करावे लागते.
लोक तीच्या मदतीसाठी पुढे आलेच नाहीत असं नाही,परंतु इच्छा असूनह काही करता येत नाही,
किडनी दान करण्यासाठी अनेक जण पुढे आले,
पण सुनीता देवीशी त्यांची किडनी जुळत नसल्याने अद्यापही किडनी प्रत्यारोपण होऊ शकलेले नाही.
सुनीताच्या मदतीसाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
तीन मुलांना सोडून नवरा पळून गेला
बरियारपूर गावातील आपल्या दु:खाला कवटाळून रडणारी सुनीता
आपल्या तीन मुलांच्या अंधकारमय भविष्याकडे पाहत आहे आणि दररोज आपल्या मृत्यूची घटका मोजत आहे.
सर्वात भयंकर आघात तेव्हा झाला जेव्हा अशा अवस्थेत तिचा पती तिला आणि 3 निरागस मुलांना सोडून पळून गेला.
पती अल्कू राम आणि सुनीता यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला.
त्यानंतर तो आपल्या तीन मुलांना आईकडे सोडून पळून गेला.आता सुनीताकडे रडण्याशिवाय काही उरलं नाही.
सुनीताच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा तिला म्हणाला, “तु जगली नाहीतर मेलीस तरी याची मला पर्वा नाही.”
सुनीता म्हणाली, “मी आता जगेन की नाही हे मला माहीत नाही. माझे आयुष्य आधीच नरक बनलं आहे.”
सुनीता विचारते माझी चूक काय?

रडत रडत सुनीता एवढच म्हणते की या सगळ्यात तिचा आणि तिच्या मुलांचा काय दोष? काय चूक आहे?
ज्याचा त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सुनीता यांनी सांगितलं की,
जेव्हा तिची प्रकृती ठीक होती, तेव्हा ती मजुरीचे काम करायची आणि घर चालवायला पतीला मदत करायची.
पण आता ती स्वत: आजारी पडलीय त्यामुळे काहीच करू शकत नाही.
अमेरिकेतील सिएटल सिटी येथे जातिभेदावर बंदी करणारा कायदा
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on JAN 30,2023 16:15 PM
WebTitle – Both kidneys stolen Sunita devi bihar, husband also left