डॉ.बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा वर भाजप चा आक्षेप कारवाई ची मागणी भाजप करून करण्यात आलीय.भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 आॅक्टोबर 1935 रोजी नाशिक येथील येवला येथे धर्मांतर करण्याची घोषणा केली. अस्पृश्योद्धाराची चळवळ चालवत असताना बाबासाहेबांना जे कटू अनुभव आले त्याची मूळे इथल्या धर्मव्यवस्थेत आहेत, धर्मातील जात अन वर्णव्यवस्थेत आहेत, इथल्या मागासवर्गीयांना माणसासारखी वागणूक मिळत नाही.हिंदुधर्म व्यवस्थेत पिढ्यानपिढ्या आपल्याच धर्मातील एका मोठ्या मागासवर्गीय समाजावर अस्पृश्यता लादले गेली होती.अमानवी अन्यायग्रस्त बंधने अन त्यातून त्यांची झालेली सामाजिक,आर्थिक पिळवणूक शैक्षणिक पिळवणूक अन मानसिक गुलामी दुर करणे आवश्यक होते.
यासाठी भगवान बुद्धांच्या बुद्धिप्रामाण्यवादी तत्वज्ञानाशिवाय ते शक्य नव्हते. तसेच मानवाच्या उत्कर्षाला हानिकारक अंधश्रद्धा दैववाद यांना मूठमाती देत विज्ञानवादाची कास धरणे आवश्यक होते,मानवी जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर तो बुद्धाचा मार्ग आहे हे ओळखून त्यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे ब्राह्मणी धर्म त्यागून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली, धर्मांतर केले.यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञा लिहिल्या,बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीस या 22 प्रतिज्ञा ग्रहण करण्याची आवश्यकता असते. दिल्लीत नुकताच धर्मांतराचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला,त्यावेळी या 22 प्रतिज्ञा सामूहिकरीत्या ग्रहण करण्यात आल्या. मात्र यावर भाजप ने आक्षेप घेतला आहे.एवढच नाहीतर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आप नेते राजेंद्र पाल गौतम यांच्यावर कारवाईची करण्याची धक्कादायक मागणी सुद्धा केली आहे.
राजेंद्र पाल गौतम यांनी पदाचा राजीनामा दिला
धर्मांतर विधीतील शपथविधी ग्रहण वादानंतर दिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हिंदू देवतांवर विश्वास न ठेवण्याची आणि त्यांची पूजा न करण्याची शपथ घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आप पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीपासून गुजरातपर्यंत निषेधाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत राजेंद्र पाल गौतम यांनी पद सोडण्याची घोषणा केली. पाल यांच्याकडे समाजकल्याण मंत्रालयाव्यतिरिक्त एससी एसटी, महिला व बालविकास, सहकारी संस्था आणि गुरुद्वारा निवडणुकांची जबाबदारी होती.
केजरीवाल अगोदरच नाराज होते, म्हणून मंत्रालय हिसकावले गेले
सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, शपथविधी ग्रहण प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे
राजेंद्र पाल गौतम यांच्यावर नाराज होते. याआधीही केजरीवाल अंगणवाडी सेविकांच्या संपावरून देखील संतप्त झाले होते.
कदाचित त्यामुळेच राजेंद्र पाल गौतम यांच्याकडून ते मंत्रिपद काढून कैलाश गेहलोत यांना देण्यात आलं होतं. त्यावेळीही त्याना हटवल्याची चर्चा होती.
राजीनाम्याचे कारण काय सांगितले गेले?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, त्या कार्यक्रमानंतर भाजप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माझ्या पक्षाला लक्ष्य करत असल्याचे मला दिसत आहे. गौतम म्हणाले, बाबासाहेबांच्या या 22 प्रतिज्ञांवर भाजपचा आक्षेप आहे. ज्याचा वापर करून भाजप गलिच्छ राजकारण करत आहे. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. कारण माझ्यामुळे आमच्या पक्षाचे आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नुकसान होऊ नये असे मला वाटते.
डॉ.बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा वर भाजप चा आक्षेप कायदेशीर कारवाईही झाली पाहिजे – भाजप
भाजप च्या दबावाखाली घेतला राजीनामा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधूड़ी यांनी भाजपच्या दबावामुळे दिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांना राजीनामा द्यावा लागल्याचा दावा केला आहे. केवळ राजीनामा पुरेसा नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही व्हायला हवी आणि हिंदू देवतांची निंदा केल्याबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी व्हायला हवी, असे रामवीर सिंह बिधूड़ी म्हणाले आहेत.
22 Pratidnya by Dr. Ambedkar in Marathi २२ प्रतिज्ञा मराठी
Vande Bharat Express चा पुन्हा अपघात|जाणून घ्या Top 10 fastest train in India 2022?
गांधी जी ना ब्रिटिशांकडून 100 रु. पेन्शन भाजप नेत्याचा आरोप
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 10,2022, 12:12 PM
WebTitle – BJP’s objection to Dr. Babasaheb’s 22 pledges demands action