भोपाळ : नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आल्या आहेत.
भाजपाच्या भोपाळमधील खासदार (BJP MP) प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांनी कोरोना लसीचा (Corona Vaccine) पहिला डोस घरीच घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एका टीमने त्यांच्या घरी जाऊन त्यांना हा डोस दिला आहे.
प्रकृती बरी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांनी लस घेतली नसल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी घरीच लस घेतल्याचे समजल्याने काँग्रेसने यावरून जोरदार निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकूर यांचा बास्केटबॉल खेळत असतानाचा आणि डान्स करत असतानाच्या व्हिडीओची आठवण करून देत काँग्रेसने काही सवाल विचारले आहेत.
https://twitter.com/NarendraSaluja/status/1415303325164081158
कॉँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी प्रश्न विचारला आहे. “मोदींसह भाजपाचे मोठे नेते हे रुग्णालयात जाऊन लसीकरण करत आहेत आणि अशा परिस्थितीत आमच्या भोपाळ च्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज घरी टीम बोलावून लस घेतली.
काही दिवसांपूर्वीच त्या बास्केटबॉल खेळताना आणि नाचताना दिसून आल्या होत्या.
भाजपा खासदारांना घरबसल्या लस मिळते यावरून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
काँग्रेसचे नेते नरेंद्र सलूजा यांनी भाजपावर या गोष्टीवरून हल्लाबोल केला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
ठाकूर यांना कोणत्या आधारावर घरबसल्या कोरोना लस मिळाली याचं उत्तर द्या असं सलूजा यांनी म्हटलं आहे.
कोरोना महामारी आणि वाढणारी उपासमारी व भुकबळी
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JULY 16, 2021, 15 : 40 PM
WebTitle – BJP Pragya Singh Thakur Got Corona Vaccine At Home 2021-07-16