मंदिर प्रवेशासाठी अभिनेत्रीकडे मागितला हिंदू असल्याचा पुरावा, 20 मिनिटं कोपऱ्यात उभं केलं.प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप नेत्या नमिता वांकावाला यांच्याबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. तमिळ अभिनेत्री नमिता या त्यांच्या पतीबरोबर मदुराईमधील मीनाक्षी सुंदरेश्वरी मंदिरात गेल्या होत्या, पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.

अभिनेत्री आणि भाजप नेत्या नमिता वांकावाला यांनी आरोप केला आहे की मंदिर प्रशासनाने त्यांच्याकडून हिंदू असल्याचा पुरावा मागितला.
PTIच्या वृत्तानुसार, मंदिर प्रशासनाने त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आणि हिंदू असल्याचा पुरावा देखिल मागितला.
पुरावा मागितल्याचं वाईट वाटलं नाही, पण ज्या पद्धतीने तो पुरावा मागितला गेला, ते सर्वात जास्त वाईट वाटलं.
अभिनेत्री आणि भाजप नेत्या नमिता वांकावाला यांनी व्हिडीओ शेअर करताना या प्रकाराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांनी म्हटलंय, “मला पहिल्यांदा स्वतःच्या देशात, स्वतःच्या राज्यात परके असल्याचा अनुभव आला. मला हिंदू असल्याचा पुरावा द्यावा लागला. पुरावा मागितल्याचं वाईट वाटलं नाही, पण ज्या पद्धतीने तो पुरावा मागितला गेला, ते सर्वात जास्त वाईट वाटलं. मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी ज्या उद्धटपणे वागलं, त्याचा सर्वात जास्त त्रास झाला.”

मंदिर प्रशासन आमच्याशी खूप उद्धटपणे वागलं. माझ्या जातीचा आणि श्रद्धेचा पुरावा माझ्याकडे मागितला
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी हिंदू म्हणून जन्मले आहे. माझ्या मुलाचं नाव भगवान श्रीकृष्णाच्या नावावरून ठेवलं आहे.
मंदिर प्रशासनान आमच्याशी खूप उद्धटपणे वागलं. माझ्या जातीचा आणि श्रद्धेचा पुरावा माझ्याकडे मागितला.”

अभिनेत्रीने सांगितले की, त्यांचा पती मंदिरात जाताना मास्क घालून गेला होता.
त्यांनी सांगितले की, तो सेलिब्रिटी असल्यामुळे फोटो काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी होऊ नये आणि लोकांनी त्याला ओळखू नये म्हणून त्याने मास्क घातला होता.
मंदिर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दोघेही मास्क घालून मंदिरात प्रवेश करत होते, म्हणून त्यांची चौकशी करण्यात आली.
ते हिंदू असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या कपाळी तिलक लावून त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला आणि त्यांना परंपरांची माहिती देण्यात आली.
अभिनेत्री आणि तिच्या पतीला 20 मिनिटं मंदिराच्या एका कोपऱ्यात उभं ठेवण्यात आलं होतं.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 27,2024 | 16:57 PM
WebTitle – BJP leader and actress asked proof of Hindu status for temple entry