पत्रकाराने स्वत: ट्विट करून सांगितले की मी जीवंत आहे ;भाजपा आयटीसेलकडून जीवंत पत्रकार हिंसाचारात मारला गेल्याची खोटी स्टोरी रचून हिंसा भडकवण्याचा धक्कादायक प्रयत्न
भाजप आयटी सेल हा राजकीय नेत्यांचे फोटो एडिट करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात वाकबगार मानला जातो,तसेच स्त्री नेत्यांच्या बाबत अतिशय वाईट भाषेत व्यक्त होणे,बलात्कार जीवे मारण्याची धमकी देणे असले प्रकार भाजपच्या समर्थक आयटीसेल कडून करण्यात आल्याचे अनेकदा समोर आले आहे.यावेळी भाजपा आयटीसेलकडून जीवंत पत्रकार हिंसाचारात मारला गेल्याची खोटी स्टोरी रचण्यात आली.
देशात आणि जगात सुद्धा कोरोनाचा कहर सुरू आहे.लोक तडफडून मरत आहेत.
अशातच देशातील काही राज्यात निवडणुका पार पाडल्या गेल्या,
त्यात पश्चिम बंगाल ची निवडणूक ही भाजप आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेची बनवली होती.
या निवडणुकीसाठी कोरोना च्या संकटात मदत करण्याचे सोडून भाजपचे नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहीत पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त दिसले.
त्यांनी अनेक मोठ्या रॅलीज काढल्या,गर्दी जमू दिली,त्यामुळे कोरोनाचे संकट आणखी वाढले.
या सर्व प्रकाराला न्यायालयाने देखील कडक ताशेरे ओढले,
मात्र भाजप ही निवडणूक हरली आणि अशा निकालानंतर पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचार सुरू झाला.
त्यातून मग भाजपच्या आयटीसेलने हिंसाचार आणखी भडकवण्याच्या उद्देशाने असत्य गोष्टी सोशल मिडियात शेअर करणे सुरू केले.
अशीच एक खोटी स्टोरी त्यांनी हिंसाचाराचे नाव घेत केली.त्या स्टोरीतील व्यक्ती माणिक मोईत्रा असल्याची बतावणी केली. ही व्यक्ती पश्चिम बंगाल मधील सितालकुची येथे झालेल्या धार्मिक हिंसाचारात मरण पावली अशी थाप मारण्यात आली.ती पोस्ट “हिंदू खतरे में हैय” म्हणत अनेकांनी शेअर केली.आणि संताप चीड व्यक्त करत अभद्र भाषेत टीका सुरू झाली.ही वायरल पोस्ट संबंधित व्यक्तीपर्यंत गेल्यावर मात्र धक्कादायक सत्य समोर आलं.
ते असं की सदर व्यक्ती इंडिया टूडेचा पत्रकार निघाला.त्यांचे नाव अभ्रो बॅनर्जी असे असून विशेष म्हणजे तो जीवंत आहे.ही गोष्ट या पत्रकारालाच ट्विट करत सांगावी लागली की भाजप आयटी सेल्स दावा करीत आहे की मी माणिक मोइत्रा आहे आणि त्याचा मृत्यू सितालकुची येथे झाला. कृपया या बनावट पोस्टवर विश्वास ठेवू नका आणि काळजी करू नका. मी पुन्हा सांगतो: मी (अद्याप) जिवंत आहे.
I am Abhro Banerjee, living and hale and hearty and around 1,300 km away from Sitalkuchi. BJP IT Cell is now claiming I am Manik Moitra and died in Sitalkuchi. Please don't believe these fake posts and please don't worry. I repeat: I am (still) alivehttps://t.co/y4jKsfx8tI pic.twitter.com/P2cXJFP5KO
— Abhro Banerjee (@AbhroBanerjee1) May 6, 2021
धक्कादायक आणि खेदजनक बाब ही की आयटीसेलकडून जीवंत पत्रकार हिंसाचारात मारला गेल्याची खोटी स्टोरी ही खोटी बातमी/स्टोरी भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून प्रसारित केले गेले.या जीवंत पत्रकाराने खुलासा केल्यानंतर मात्र या अधिकृत हँडल वरून हे खोटी बातमी डिलिट करण्यात आली.मात्र त्याच्या डिजिटल फुटप्रिंट आपल्याला इथे पाहता येतील.
पश्चिम बंगाल चा पराभव जिव्हारी लागल्याने हा रडीचा डाव सुरू झाला असे काही युजर म्हणत आहेत.
या प्रकाराने भाजप आयटीसेल समाजात धार्मिक दुफळी माजवून
अराजक माजवू पाहत असल्याचे स्पष्ट होत असून भाजप केंद्रात सत्तेत असूनही
अशा हरकती करत असल्याने लोकशाही धोक्यात आल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.
- टीम जागल्या भारत
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? भावनिक होऊ नका, कारण जाणून घ्या..
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on MAY 06, 2021 22: 10 PM
WebTitle – Factcheck-BJP IT cell tries to incite violence by spreading false story that a alive journalist was killed in violence 2021-05-06