मी गोसावी बनून आलो तर तुम्ही मला ओळखणार नाही..मी पांडे बामन बनून आलो तर तुम्ही मला ओळखणार नाही.. मी दिकू बनून आलो तर तुम्ही मला ओळखणार नाही.म्हणून मी मुंडा बनून येईन. जो कुणी ऊलगुलानची भाषा बोलेल, तिथं बिरसा आला असं तुम्ही समजा.”
९ जून १९०० रांची जेलपंचवीस वर्षाचा बिरसा रक्ताची उल्टी करून अचेतन झाला… छोटा नागपूर पठार, पालूम, सिंगभूम, चक्रधरपूर च्या अरण्यावर आपला अधिकार सांगणारा योद्धा. मुंडा, कोल, हूल आणि संथाळाना घेऊन सामंती भांडवली ब्रिटीश शक्ती व दिकू, पांडे सारख्या ब्राम्हणी शक्तीविरूद्ध एकाचवेळी विद्रोह पुकारणारा अधिनायक.
मुंडाच्या काळ्या कृष्णवर्णीय रक्तातच भूक, गरीबी आणि शोषण मिसळून गेलंय
आणि त्याचे एक अद्भुत मिश्रण बनलेय, तेच हलाहल त्याला संघर्षासाठी प्रेरीत करतेय असे मानणारा.
ज्यानं अदिम आदिवासींच्या सहजप्रेरणा समजून घेऊन स्वतःला धरती आबा घोषित केलं.
हे स्वतःला भगवान घोषित करणं एक क्रांतीकारी सामाजिक,आर्थिक व राजकीय परिवर्तन आणण्याची त्याची व्यूहरचना होती.
भानी अन सुगना मुंडाचा कोवळ्या वयाचा पण टणक जिद्दीचा पोरगा.
चालकाइबासा या ख्रिश्चन मिशनरीत त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं होतं, त्याला स्वतःला उत्तम इंग्रजी येत होती.
तरी तिथे आपल्या मुळांपासून तुटून बाजूला झाला नाही.
शाळा अन गोरे युरोपियन मिशनरी त्याला बांधून ठेवू शकले नाही.
फादर त्याच्या बायबल चेच दाखले देऊन विचारल्या जाणार्या प्रश्नांवर निरूत्तर व्हायचे.
तारुण्यसुलभ प्रेमभावना त्याला आकर्षित करू शकल्या नाहीत.
आतून सतत प्रचंड धुमसत असलेला बिरसा एकदा थकून, भागून त्याच्या भोळ्या आईच्या कुशीत झोपला.
अन त्याला स्वप्न पडले… ” एक तेरा चौदा वर्षाची कोवळी तरूण मुंडारी मुलगी जंगलातल्या खडकावर नग्न बसलीय.तिचे काळे शरीर, तिची नग्न शरीर त्याला पाहवत नाही… अन तिच्या डोळ्यातलं कारूण्य त्याला पाहवत नाही….” बिरसानं तिला झोपेतच वचन दिलं.
हे मुंडाच्या आदिम माये…..तुला मी आजादकरीन.
बॅरिस्टर जेकबने त्याची केस लढली…अमूल्यबाबू त्याचा जवळचा मित्र जो ब्रिटीश सेवेत डॉक्टर होता त्यानं बिरसाला शरण जाण्यासाठी खूप विनवलं पण बिरसा त्याच्याकडे बघून तुच्छतेने हसला.भात खाणं अन मीठ मिळवणं हे ज्या मुंडांचं स्वप्न होतं बिरसा तिथून आला होता.
गद्दारी
जशी ऊमाजी नाईकांबरोबर गद्दारी करून त्यांना पकडून देण्यात आलं तशीच गद्दारी त्यांचा पूर्वसूरी असलेल्या बिरसाबरोबर झाली….. भूक, उपोषण आणि पोटातल्या संसर्गाने बिरसा गेला… अन ब्रिटीशांनी त्यांच्या जेल डायरीमध्ये लिहिलं… कॉलऱ्याने मेला….. त्याचा रक्तसंबंधी म्हणून कुणीही त्याच्या प्रेताला अग्नी दिला नाही तर त्याच्या प्रेताला अग्नी बिरसाईतांनी (जो बिरसाच्या नावाने पंथ निर्माण झाला होता) दिला
आज जिथं जंगलखेडू आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या जातात… त्यांनी जंगल खेडून कसलेल्या भूखंडाचे तुकड्यांचा त्यांना सातबारा मिळत नाही…. छोटा नागपूर पठार ते महाराष्ट्रातील नागपूरपर्यंत संपन्न असलेल्या खनिजपट्ट्यांवर बिरसाच्या शब्दात दिकू_बनियांचे राज्य आलेय… तमाम आदिवासी जमातींना त्यांच्या घरातून हाकलून हे हा भुप्रदेश गिळू लागलेत…. त्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करू लागलेत… टि वन वाघिणीला असेच नरभक्षक ठरवून त्यांनी गोळ्या घातल्या.
अॅमेझॉन वर रडणाऱ्यांचे गडचिरोली चंद्रपूर अन आरेकडे लक्ष नाही….. ब्रम्हो भांडवली साम्राज्यवादी शक्ती क्रोनी कॅपिटीलिझमचा वापर करून शेवटचा बुलडोझर आपल्या घरावर आणणार आहेत
म्हणून…..
हे_बिरसा ऊलगुलान संपलं नाही उलट त्याची गरज वाढलीय”
हे ओते दिसूम सिरजाओनि,
आलम आनदुलिया.
आलम आनदुलिया…. आमा रेगे भरोसा…” – मुंडारी भाषेतील प्राचीन गीत..दुर्बोध मंत्रोच्चारासारखं, गंभीर स्वरात बिरसाईतांनी गायलेलं……”
हे पृथ्वी माये,
आमची प्रार्थना व्यर्थ घालवू नकोस
आमचा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे.
महान स्वातंत्र्य वीर जननायक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
संपूर्ण संदर्भ.अरण्येर अधिकार – महाश्वेतादेवीमूळ बंगाली प्रकाशन १९७८.(महाश्वेतादेवी स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे, त्यांच्यावर पुन्हा कधीतरी…)
बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाने दिली लेटेस्ट अपडेट
गया मध्ये नक्षलवाद्यांचे तांडव, एकाच कुटुंबातील चार जणांना फाशी
डॉ.कफील खान यांना क्लीनचिट मिळूनही सरकारी सेवेतून केले बडतर्फ
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15, 2021 15:50 PM
WebTitle – Birsa Munda Ulgulan jari rahe