बिहारच्या समस्तीपूरमध्ये कथितपणे एका नकली डॉक्टरने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून एका नर्सचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आत्मसुरक्षेत नर्सने डॉक्टरचा प्रायव्हेट पार्ट कापला. जखमी डॉक्टरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. या घटनेची माहिती समोर येताच, आरोपी संजय कुमार उर्फ संजूचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे त्याच्या डॉक्टर असण्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. असेही सांगितले जात आहे की, तो ‘हिंदू समाज पार्टी’ या संघटनेचा ‘संगठन मंत्री’ आहे.
नर्सने सर्जिकल ब्लेडने कापला प्रायव्हेट पार्ट
ही घटना १२ सप्टेंबरच्या रात्री समस्तीपूरच्या आरबीएस हेल्थ केअर रुग्णालयात घडली. रुग्णालयाचा संचालक संजय कुमार उर्फ संजूने आपल्या दोन मित्रांसोबत दारू पिल्यानंतर, तिथे काम करणाऱ्या नर्ससोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोप आहे की, त्यांनी नर्सवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नर्सने आपल्या आत्मसुरक्षेसाठी सर्जिकल ब्लेडने संजयचा प्रायव्हेट पार्ट कापला. त्यानंतर ती नर्स तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली.
घटना समोर आल्यानंतर आरोपी संजय कुमार याच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
या प्रकरणावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सरकारवर टीका करत X (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया दिली.
आरोपी विविध माफिया कारवायांमध्ये गुंतलेला आहे
सोशल मीडियावर आरोपी डॉक्टरचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात तो धार्मिक वातावरणात दिसत आहे. इंडिया टुडेच्या जहांगीर आलम यांनी आरोपीविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भाकपा माले (CPI-ML)च्या जिल्हा स्थायी समितीचे सदस्य सुरेंद्र प्रसाद सिंह यांच्याशी चर्चा केली. सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, संजय कुमार उर्फ संजू विविध माफिया कारवायांमध्ये गुंतलेला आहे. प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली नाही तर ते आंदोलन करतील.
आजतक ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर बेगूसरायच्या बछवारा पोलीस ठाण्याच्या परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या साथीदारांची ओळख वैशाली जिल्ह्यातील बालीगावचे सुनील कुमार गुप्ता आणि समस्तीपूरच्या बंगरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील अवधेश कुमार अशी झाली आहे.सदर प्रकरणी पोलिसांकडून अखेर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एएसपी संजय पांडे यांनी सांगितले की, महिलेच्या जबाबावरून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. रुग्णालयातून रक्ताने माखलेले कपडे, एक कार, दारूच्या बाटल्या आणि तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. पोलिस सध्या तपास करत आहेत.
हिंदू समाज पार्टीने आरोपीवर केले निलंबन
हिंदू समाज पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष गौरव गोस्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं की,
संजय कुमार उर्फ संजू याला २०२२ मध्येच हिंदू समाज पार्टीतून निष्कासित करण्यात आले होते.
हिंदू समाज पार्टी या घटनेची चौकशी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 17,2024 | 14:45 PM
WebTitle – Bihar nurse cut the private part of accused doctor Sanjay Kumar