अमेरिका : तमाम भारतीय आणि जगभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी ही एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.अमेरिकेतील आंबेडकरी समाजासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे यांचे खंड आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या विद्यमाने हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी केंब्रिज मॅसॅच्युसेट्स लायब्ररीला हॉर्वर्ड यार्ड, 1, केंब्रिज, MA 02138 मार्च 8, 2024 रोजी देण्यात आले. या विद्यापीठाच्या ग्रंथालयाला एकूण 18 खंड दान करण्यात आले आहेत.8 मार्च 2024 हा दिवस भारतातील आणि जगभरातील आंबेडकरी अनुयायांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी लायब्ररीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन आणि भाषणे यांचे १८ खंड दान करण्यात आल्याने हा विशिष्ट कार्यक्रम अमेरिकेतील आंबेडकरी समाजासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
हॉर्वर्ड यार्ड, 1, केंब्रिज, एमए 02138 येथे असलेल्या ग्रंथालयात झालेल्या देणगी समारंभात,आंबेडकरी समाजाचे सदस्य, विविध संघटनांचे प्रतिनिधी,
हॉर्वर्ड विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक न्यायाचे वकील सहभागी झाले होते.
डॉ.आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांच्या 18 खंडांची देणगी हे त्यांचे प्रगल्भ विचार आणि शिकवण जतन
आणि प्रसार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर,भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून ओळखले जातात, ते एक दूरदर्शी नेते,
समाजसुधारक तसेच स्त्रिया आणि वंचित समुदायांच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे योगदान आणि त्यांचे अथक प्रयत्न,
विशेषत: वंचित मागासवर्गीय सक्षमीकरणासाठी, जगभरात व्यापकपणे प्रेरणा देतात.
आपल्या लिखाणातून आणि भाषणातून डॉ. आंबेडकरांनी सामाजिक नियमांना आव्हान दिले आणि न्याय आणि समतेच्या क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले.
हे 18 खंड हार्वर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयाला देणगी देऊन डॉ. आंबेडकरांच्या अमूल्य संसाधनांचे जतन
आणि प्रसार करण्याचा हार्वर्ड विद्यापीठाचा संकल्प आहे. या १८ खंडांमध्ये डॉ. आंबेडकरांचे विविध विषयांवरील लेखन समाविष्ट आहे.
आतापर्यंत चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित
आतापर्यंत चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे दोन वर्षांत १८ ग्रंथ प्रकाशित झाले असल्याचे कळते.डॉ.आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड २३ (इंग्रजी भाषेत) , जनता ३-३, जनता खास अंक १९३३ आणि इंग्रजी खंड २ चा मराठी अनुवाद (भाग १ व २) या नवीन ग्रंथांचे प्रकाशन 3 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते.याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड ४, खंड १२, खंड १५, खंड १७ (तीन भाग), खंड १८ (तीन भाग), आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन या ग्रंथांच्या नव्या आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले होते.
डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २३ विषयी जाणून घेऊया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने आतापर्यंत डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषण यांचे एकूण २२ खंड प्रकाशित झाल्याचे समजते तसेच २३ वा खंड हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘एम. एससी.’ च्या पदवीकरिता सादर करण्यात आलेल्या प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’) या शोधप्रबंधाविषयीचा आहे. हा शोध प्रबंध ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ ला १९२१ मध्ये सादर करण्यात आला होता. हा शोध प्रबंध तब्बल १०० वर्षानंतर प्रकाशन समितीला नोव्हेंबर २०२१ मध्ये लंडनच्या सिनेट ग्रंथालयाकडून प्राप्त झाला होता.
या खंड २३ चे दोन भाग करण्यात आले असून पहिल्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘एम. एससी.’ चा प्रबंध आहे, तर दुसऱ्या भागामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणाबाबतचा दुर्मिळ दस्तऐवज आणि पत्रव्यवहार दिला आहे. त्यामध्ये ‘एम.ए.’ आणि ‘पीएच. डी.’, ‘एम. एससी.’, ‘डी.एससी.’ ‘एलएल. डी.’ च्या संदर्भातील दस्तावेज आणि पत्रव्यवहार आहे. अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाड महाराज यांनी शिष्यवृत्ती दिली होती. सदर शिष्यवृत्तीचे ऋण फेडण्यासाठी बाबासाहेबांनी महाराजांचे चरित्र लिहिण्याचे ठरविले होते. त्यासंदर्भात त्यांनी बडोद्याचे महाराज प्रतापसिंग यांना १० ऑक्टोबर १९५० रोजी पत्र लिहिलेले पत्र देखील या खंडात समाविष्ट असल्याचे कळते.
जनता ३-३ या खंडात ‘जनता’ पत्रातील १० डिसेंबर १९३२ ते २ डिसेंबर १९३३ पर्यंतच्या अंकांचा समावेश
जनता खास अंक, १९३३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मादिनानिमित्त ‘जनता’ ने
एप्रिल १९३३ रोजी जनता चा खास अंक प्रकाशित केला होता.
मुंबई विधीमंडळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य इंग्रजी खंड २ च्या मराठीतील अनुवाद ग्रंथात समाविष्ट आहे ,
सायमन आयोगाला सादर केलेल्या शिफारशी तसेच गोलमेज परिषदेतील भाषणे आणि इतर कामकाजाचा समावेश करण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्य प्रकाशित करून ते सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचले पाहिजे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर: लेखन व भाषणे (Dr. Babasaheb Ambekar Writing and Speeches) चे एकूण २२ खंड प्रकाशित करण्यात आले असून या २२ खंडांपैकी १ ते १७ हे इंग्रजी भाषेत आहेत. तर १८,१९ आणि २० हे मराठीत आहेत. २१ वा खंड हा पत्रांचा आहे. तर २२ खंड हा डॉ. आंबेडकरांच्या छायाचित्रांचा संग्रह (अल्बम) आहे. आता २३ वा खंड प्रकाशित झाला आहे. या व्यतिरिक्त सोर्स मटेरियल (Source Material) चे ३ खंड आणि २ पुस्तिका यांचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.मात्र बाजारात आजही हे खंड पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत,अशी आंबेडकरी जनतेकडून नेहमीच खंत व्यक्त केली जाते.
अमेरिका मध्ये 14 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक,सर्वात मोठ्या पुतळ्याचे भव्य अनावरण
स्त्री मुक्ती : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला वर्ग
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 13 ,2024 | 17:25 PM
WebTitle – BAWS Enriches Harvard University Library with Babasaheb Ambedkar Writing and Speeches