बदलापूर मधील नामांकित शाळेतील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एनकाउंटर करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होता.
बदलापूर : चिमूरडीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे चा एनकाउंटर..जाणून घ्या घटनाक्रम
अक्षय शिंदेला तपासासाठी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेत असताना, त्याने अचानक पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले. या गोळीबारात एक गोळी API निलेश मोरे यांच्या पायाला लागली, तर उर्वरित दोन गोळ्या मिसफायर झाल्या. या घटनेनंतर, पोलिसांनी सेल्फ-डिफेन्समध्ये शिंदेवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला आणि त्याला तात्काळ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही.
त्याने स्वतःवर गोळी झाडली का, की त्याला नाईलाजाने मारण्यात आलं चौकशी झाली पाहिजे – सुषमा अंधारे
या घटनेवर उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर शंका उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अंधारे यांनी म्हटले की, “ही घटना साधी नाही. आरोपी अक्षय शिंदेने स्वत:वर गोळी झाडली की काहीतरी वेगळं घडलंय? त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की अक्षयला या प्रकरणात फसवलं जात आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडली का, की त्याला नाईलाजाने मारण्यात आलं, याचा सखोल तपास होणं आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.”
या गंभीर घटनेमुळे बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी योग्य तपासाची मागणी केली आहे.
कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा – सुप्रिया सुळे
महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे.
याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला.
लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली खरी पण आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 23,2024 | 20:32 PM
WebTitle – Badlapur case Encounter of Akshay Shinde