लखनऊ – अयोध्याची गँगरेप पीडिता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना भेटली आणि तिने त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. पीडितेने न्यायाची मागणी केली आहे. पीडितेने अखिलेश यादव यांना सांगितले की आरोपी भाजपाचे कार्यकर्ते आहेत आणि ते एफआयआर परत घेण्यासाठी धमक्या देत आहेत. पीडितेची अखिलेश यादव यांच्याशी भेट सपा नेते पवन पांडे यांनी लखनऊ येथील पक्ष कार्यालयात घडवून आणली. तथापि, सपा पक्षाने अधिकृतरित्या याबाबत अद्याप काहीही म्हटलेले नाही.
रौनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तीन तरुणांनी पंधरवड्यापर्यंत वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नेऊन बलात्कार केला. तिच्या पाच मित्रांनीसुद्धा तिच्यासोबत छेडछाड केली. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून कॅन्ट पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
रौनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडितेने एफआयआर दाखल करताना सांगितले की ती एका महाविद्यालयात बीए तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे आणि राम जन्मभूमी मंदिरात सफाई कर्मचारी आहे. ती सहादतगंज येथे राहणाऱ्या वंश चौधरी नावाच्या तरुणाला मागील चार वर्षांपासून ओळखते. १६ ऑगस्ट रोजी वंश चौधरी, तिचा मित्र विनय आणि शारिक यांनी तिला फिरवण्याच्या बहाण्याने अंगूरी बाग येथील एका गेस्ट हाऊस मध्ये नेले. तिथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
यानंतर ते तिला बनवीरपूर येथे असलेल्या एका गॅरेजमध्ये घेऊन गेले, जिथे वंश चौधरीने पुन्हा बलात्कार केला आणि त्याचा मित्र शिवाने नशेच्या अवस्थेत तिच्याशी छेडछाड केली. १८ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजता विनयने तिला देवकाली बायपासजवळ सोडले. २२ आणि २३ ऑगस्ट रोजी वंश चौधरी आणि विनयने तिच्यावर पुन्हा गॅरेजमध्ये बलात्कार केला.
सपा कार्यालयाच्या बाहेर माहिती देताना अयोध्याची गँगरेप पीडिता
समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांना अयोध्याच्या गँगरेप पीडितेने भेट घेतली.
यावेळी सपा नेते पवन पांडे यांनी लखनऊ येथील पक्ष कार्यालयात सपा प्रमुखांशी तिची भेट घडवून आणली.
पीडितेने अखिलेश यादव यांना घटनेबद्दल सांगितले आणि न्यायाची मागणी केली.
सपा कार्यालयाच्या आवारात तिने माध्यमांशी संवाद साधला. पीडिता म्हणाली- “मी अखिलेश यादव यांना सर्व काही सांगितले आहे. त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. १६ ते २५ ऑगस्ट दरम्यान माझ्याबरोबर ही घटना घडली. मी प्रशासनाकडे गेले होते, परंतु महिला पोलीस ठाण्यातील दारोगाने माझ्याशी वाईट वर्तन केले. मला शिव्या देऊन हाकलून दिले. एसएसपीकडे गेले तेव्हा एफआयआर दाखल करण्यात आले. आरोपी मला खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. एफआयआर परत घेण्यासाठी दबाव आणला जातो आहे. माझ्या आई-वडिलांवरही दबाव टाकण्यात आला. त्यांनी माझ्या कुटुंबीयांना सांगितले की, तुमच्या मुलीला समजवून ठेवा, नाहीतर तिची इज्जत राहणार नाही.”
राम जन्मभूमी परिसरात सफाईचे काम करते अयोध्याची गँगरेप पीडिता
या प्रकरणात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे,
तर एका आरोपीने न्यायालयात आत्मसमर्पण केले आहे. तिघे आरोपी अद्याप फरार आहेत.
पीडिता (२०) बीएची विद्यार्थिनी असून राम जन्मभूमी परिसरात सफाईचे काम करते.तिने अयोध्या कॅन्ट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.
अयोध्याची गँगरेप पीडिता म्हणाली की, ती सहादतगंज येथे राहणाऱ्या वंश चौधरीला मागील ४ वर्षांपासून ओळखते.
६ ऑगस्ट रोजी वंशने तिला सोहावल येथून गाडीत बसवले आणि जिल्हा रुग्णालयात सोडले.
१६ ऑगस्ट रोजी वंश, सारिक आणि विनयने तिला फिरायला नेण्यासाठी सांगितले. वंशला ती आधीपासून ओळखत असल्याने ती त्यांच्या सोबत गेली.
रेप केल्यावर मारून टाकण्याची धमकी
विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, ते अंगूरीबाग येथील गोकुळ गेस्ट हाऊस मध्ये पोहोचले. तिथे वंश चौधरी, सारिक आणि विनयने तिच्यावर बलात्कार केला. विरोध केल्यावर त्यांनी तिला धमकावले की, जर कोणाला सांगितले तर तिला मारून टाकतील. ती घाबरली. घरी परतल्यानंतर वंशचा पुन्हा फोन आला.
त्याने धमकावून तिला भेटण्यासाठी बोलावले. ती घाबरून गेली. ते तिला बनवीरपूर येथील गॅरेजमध्ये घेऊन गेले.
तिथे वंशने तिच्यावर बलात्कार केला. विनय आणि शिवाने तिच्याशी छेडछाड करत विनयभंग केला.
कारमध्ये विनयभंग, वाहन डिव्हायडरला धडकले
विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर वंश चौधरी आणि शिवा तिला विनयच्या घरी घेऊन गेले. विनयने तिला बंधक बनवले.
१८ ऑगस्टच्या सकाळी ११ वाजता तिला देवकाली बायपासजवळ सोडले. ती घाबरली होती.२-३ दिवसांनी ती परत सफाईच्या कामावर परतली.
आरोपींविरुद्ध कडक कारवाई व्हावी – पवन पांडे
सपा नेते पवन पांडे म्हणाले- “हे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर काळा डाग आहे. मुख्यमंत्री म्हणतात की सर्व गुन्हेगार यूपी सोडून गेले आहेत. मग हे गुन्हेगार कोण आहेत? ज्यांनी पीडितेशी वाईट वर्तन केले, त्यांच्याविरुद्ध चौकशी करून कठोर कारवाई केली जावी.”
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 21,2024 | 08:59 AM
WebTitle – Ayodhya gang-rape victim meets Akhilesh Yadav, says pressure is being put on to withdraw FIR