नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहदरा परिसरातून दरोड्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. स्कूटीवरील जोडप्याला लुटण्यासाठी दोन दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला.त्यांनी जोडप्याला त्यांच्याकडील किंमती वस्तु मुद्देमाल काढण्यास सांगितला.प्रथम त्यांनी महिलेला दागिने काढण्यास सांगितले,चोरांनी दागिने तपासले असता ते खोटे निघाले,त्यांनंतर त्यांनी महिलेसह तिच्यासोबतच्या व्यक्तीची तपासणी केली.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. धमकी दिल्यानंतर दोघांकडून 20 रुपयांपेक्षा जास्त काहीच मिळालं नाही.यानंतर जे घडलं त्यावर हसावं की रडावं अशी परिस्थिती उद्भवली,20 रु.पाहून लुटारूंचे मन द्रवले असावे. दया येऊन लुटारूनी या दाम्पत्याला चक्क 100 रुपये दिले अन निघून गेले.

ही घटना 21 जूनच्या रात्रीची आहे. पोलिसांनी दोन्ही दरोडेखोरांना पकडले आहे. दोघांचीही ओळख पटली. एकाचे नाव हर्ष राजपूत आणि दुसरे नाव देव वर्मा असं आहे.या घटना घडल्या तेव्हा दिल्ली पोलिसांना या भागातून तीन वेगवेगळे कॉल आले होते. ज्यामध्ये पोलिसांना एका ठिकाणी पिस्तुल दाखवून मोबाईल लुटण्याचा आणि अन्य ठिकाणी दागिने हिसकावण्याचा फोन आला होता.डीसीपी शाहदरा रोहित मीना यांनी सांगितले की, 21 जून रोजी संध्याकाळी पोलिसांना तीन घटनांची माहिती मिळाली. जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न दाम्पत्याकडून दागिने हिसकावण्याचा पहिला कॉल, दुसरा मोबाइल हिसकावून तिसरा पिस्तुलचा धाक दाखवण्याचा कॉल आला. हे सर्व कॉल्स एकाच भागातील होते. त्यानंतर पोलीस पथक सक्रिय झाले. संपूर्ण परिसरातील 200 सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले.
रोहित मीना यांनी सांगितले की, दरोडेखोर दारूच्या नशेत होते.सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चित्रीकरणावरून दिसून येते की आरोपींनी पिस्तुलचा धाक दाखवत दागिने काढून घेतले मात्र ते खोटे निघाले. मग जोडप्याला धमकी देत इतर गोष्टी तपासल्या असता दोघांकडून 20 रुपयांपेक्षा जास्त काहीच मिळालं नाही.यानंतर लुटारूनी या दाम्पत्याला 100 रुपये दिले अन निघून गेले.यामध्ये एक आरोपी हर्ष राजपूत मोबाईल च्या दुकानावर कामाला आहे, तर दुसरा देव वर्मा हा नीरज बवानिया टोळीचा प्रभावाखाली आहे. पिस्तूल, स्कूटी, मोबाईल जप्त करण्यात आला असून चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्रगती मैदान बोगद्यातील दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे
24 जून रोजी घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत दरोडेखोरांनी यशस्वी दरोडा टाकला आहे.ही घटना सुद्धा दिल्लीतील असून
प्रगती मैदान बोगद्यातील दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
24 जून रोजी प्रगती मैदान बोगद्याच्या आत एक डिलिव्हरी एजंट आणि त्याच्या सहकाऱ्याकडून 1.5 ते 2 लाख रुपयांची रोकड
अज्ञात हल्लेखोरांनी लुटली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत:
अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी एलजी चा मागितला राजीनामा
दिल्लीतील लोकांना सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करू शकतील अशा व्यक्तीसाठी मार्ग मोकळा करा असं म्हणत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रगती मैदान बोगद्यावरील दरोड्याचा
सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर Delhi LG च्या राजीनाम्याची मागणी केली.
वाचकांच्या माहितीसाठी – दिल्लीतील पोलिस प्रशासन हे केंद्रसरकार,एलजी यांच्या नियंत्रणात असते.दिल्ली राज्यसरकारच्या नसते.

पुन्हा रेल्वे अपघात,प.बंगाल मध्ये एकाच रुळावर दोन गाड्या येऊन आदळल्या, रेल्वेचे कामकाज ठप्प
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
मोदी सरकार आल्यापासून महिलांची उंची वाढली: भाजप नेता
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 26 JUN 2023, 12:05 PM
WebTitle – Attempted to rob a couple at gunpoint, got only 20 rupees, robber gave 100 note