श्रीनगर: काश्मीरच्या यूट्यूबर फैजल वाणी याला जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्यावर नूपुर शर्मा चा आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप आहे. फैजल वाणी विरुद्ध कलम ५०५ आणि ५०६ अंतर्गत सफा कदल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा चा व्हिडिओ बनवल्याबद्दल फैजल वानी यांनी शनिवारी माफी मागितली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सकाळी ग्राफिक व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आणि YouTuber फैजल वानी विरुद्ध एफआयआर नोंदवला.
अपलोड केलेल्या व्हिडिओ मध्ये नुपूर शर्मा चा पुतळा दिसत आहे, ज्याचे डोके शरीरापासून वेगळे केले जात आहे. युट्युबर फैसल वानी (Youtuber Faisal Wani) यांनी आज माफी मागितली, ‘काल मी नुपूर शर्माचा व्हिडिओ बनवला जो संपूर्ण भारतात व्हायरल झाला. आणि माझ्यासारखा निष्पाप माणूस वादात सापडला.असं वाणी ने म्हटलंय.
माफीचा व्हिडिओ व्हायरल करण्याची विनंती
माफीनाम्याच्या व्हिडिओमध्ये वानी (Youtuber Faisal Wani) यांनी म्हटले आहे की, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. YouTuber ने पुढे स्पष्ट केले की त्याने त्याच्या चॅनलवर पोस्ट केलेला मूळ व्हिडिओ हटवला आहे.या माफीनाम्यात वाणीने आवाहन केले आहे की, ‘जसे तुम्हाला माझे अन्य व्हिडिओ लाईक करता आणि शेअर करता तसेच हा माफीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल करा, शेअर करा, लोकांना कळेल की मी केलेल्या कृत्याबद्दल मला खेद वाटतो.
असं आहे संपूर्ण प्रकरण
या महिन्याच्या सुरुवातीला भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना दिल्ली भाजपच्या मीडिया युनिटमधून निलंबित केले होते.त्यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.यावरून शुक्रवारी देशाच्या अनेक भागात मोठा गदारोळ झाला. उत्तर प्रदेश, दिल्ली, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने आणि हिंसाचार उसळला. यापूर्वी आखाती देशांनी यावर तीव्र आक्षेप घेत माफी मागितली होती. याशिवाय भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरही बहिष्कार टाकण्यात आला. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात वेगवेगळ्या राज्यात अनेक एफआयआर नोंदवण्यात आले होते.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
Prophet Muhammad Protest:हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू,अनेक पोलिसही जखमी
राज्यसभा निवडणूक,आघाडीची मते फुटली – फडणवीसांची स्ट्रेटेजी यशस्वी
नूपुर शर्मा च्या अटकेच्या मागणीवरून हिंसाचार, रांचीमध्ये संचारबंदी
भीमा कोरेगाव चौकशी समितीचे मुख्यमंत्र्यांसह 6 राजकीय पक्षांना समन्स
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 11 2022, 17 : 06 PM
WebTitle – An offensive video of Nupur Sharma was posted,YouTuber Faisal Wani arrested