केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ता शंतनू सिन्हा यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सिन्हा यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून अमित मालवीय यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, अमित मालवीय यांनी आता शंतनू सिन्हा यांना 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे.
प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेही या आरोपांवरून संताप व्यक्त केला असून अमित मालवीय यांना पदावरून हटवून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी अमित मालवीय यांच्यावर निशाणा साधत महिला आयोगाने अद्याप या प्रकरणाची दखल का घेतली नाही, असा सवाल केला आहे.
शंतनूने काय लिहिले?
शंतनू सिन्हा यांनी दोन दिवसांपूर्वी बंगाली भाषेत ट्विट केले होते, “बंगाल नेतृत्व सुंदर मुली कधी पुरवेल हे जाणून घेण्यासाठी अमित मालवीय अजूनही कोलकाता येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये वाट पाहत आहेत का?” त्यांनी पुढे लिहिले की, “सौंदर्यवती पुरवून अध्यक्षपद कोणाला मिळेल याची स्पर्धा आता थांबली आहे का?” अमित मालवीय यांनी केवळ पंचतारांकित हॉटेलमध्येच नाही तर भाजपच्या पक्ष कार्यालयातही महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. असे खळबळजनक आरो शंतनूने आपल्या ट्विटमध्ये केले आहेत.
काँग्रेसने वादात उडी घेतली
आता अमित मालवीय यांच्यावरील या आरोपांवर काँग्रेसनेही उडी घेतली आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, “बंगालचे भाजप नेते राहुल सिन्हा यांचा भाऊ आणि संघ कार्यकर्ता यांचे आरोप गंभीर आहेत.श्रीनेत यांनी म्हटले की , “…भाजप नेते आणि आरएसएस सदस्य शंतनू सिन्हा यांनी म्हटले आहे की, भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय हे नापाक कारवायांमध्ये गुंतले आहेत. ते महिलांचे लैंगिक शोषण करत आहेत. केवळ पंचतारांकित हॉटेलमध्येच नाही. आम्ही पश्चिम बंगालमध्येही भाजपच्या कार्यालयात अशी कृत्ये करत आहोत, आमची भाजप पक्षाकडून एवढीच मागणी आहे की महिलांना न्याय मिळायला हवा.
सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, “वास्तविक गोष्ट अशी आहे की प्रधानमंत्री मोदींनी शपथ घेतल्याच्या २४ तासांच्या आत भाजपच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे अमित मालवीय यांना तात्काळ हटवण्याची आमची मागणी आहे, कारण हे एक अतिशय गंभीर आहे. प्रभावशाली आणि शक्तिशाली पदावरून त्यांना हटवले नाही तर या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होऊ शकत नाही.
अमित मालवीय यांनी मानहानीची नोटीस पाठवली
दुसरीकडे, अमित मालवीय यांच्या कायदेशीर टीमने याप्रकरणी शंतनू सिन्हा यांना ८ जून रोजी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
मालवीय यांच्या वकिलाने नोटीसमध्ये लिहिले की,
“कथित लैंगिक गैरवर्तनाच्या खोट्या आरोपांचे स्वरूप अत्यंत आक्षेपार्ह आहे, जे माझ्या अशिलाच्या सन्मान आणि प्रतिष्ठेचा अपमान करणारे आहे.
ते एक व्यावसायिक आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्याने या आरोपांवर तीन दिवसाच्या अंत स्पष्टीकरण देण्यात यावे “
अमित मालवीय यांनी या प्रकरणी म्हटले आहे की, तीन दिवसांचा नोटीस कालावधी ११ जून रोजी संपत आहे.
त्यानंतर ते याप्रकरणी योग्य ती कारवाई करतील. ..
संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांनी मालवीय यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे केवळ भाजपमध्येच नाही तर पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 11,2024 | 21:46 PM
WebTitle – Amit Malviya accused of sexually abusing women by a person associated with RSS