कर्नाटक : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय घटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविल्यानंतर कर्नाटक मधील सामाजिक आणि राजकीय वातावरण कमालीचे तापले. रायचूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी हे चित्र काढून टाकल्याचा आरोप असल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी करत शनिवारी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यातील दलित संघर्ष समिती (DSS) च्या नेत्यांनी आणि पुरोगामी विचारवंतांनी एका मोठ्या जनआंदोलन निषेध रॅलीचे आयोजन केले.आंबेडकरांची प्रतिमा हटवलीमुळे नाराजी व्यक्त करत प्रचंड मोठ्या जनआंदोलन निषेध रॅलीत कर्नाटक राज्यातील अनेक दलित संघटना सहभागी झाल्या आहेत.
डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्याचे प्रकरण काय आहे ?
कर्नाटक येथील रायचूरमध्ये ध्वजारोहणादरम्यान गांधींच्या शेजारी लावलेली डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा हटवली, त्यामुळे दलित संघटना संतापल्या,जाणून घ्या नेमकं कारण
२६ जानेवारी रोजी बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण झाले. दरम्यान, कर्नाटकातील रायचूर जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकवण्याआधी वाद निर्माण झाला.भारतीय संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेवरुन हा वाद झाला. वास्तविक येथे जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या हस्ते ध्वजारोहण करायचे होते. ते पोहोचले पण महात्मा गांधींच्या फोटोशेजारी डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो पाहून त्यांना राग आला. न्यायमूर्तींनी येथून डॉ. आंबेडकरांचे चित्र काढून टाकण्यास सांगितले आणि त्यानंतरच ध्वजारोहण केले.
वकिलांच्या एका वर्गाने या प्रकरणाचा निषेध केला आहे. ते म्हणतात की,
जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना फोटो काढून टाकण्याची सूचना केली,
त्यानंतरच ध्वजारोहण करण्यात आलं.डॉ.आंबेडकरांची काढल्यावरच त्यांनी तिरंगा फडकवला.
या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यावर न्यायाधीश कशी नाराजी व्यक्त करत आहेत,हे यातून दिसत आहे.
फोटो काढण्यावरून काही काळ वातावरण तापले होते.
कर्नाटक उच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे,केवळ बापूंचाच फोटो असावा?
कर्नाटकातील काही ज्येष्ठ वकिलांचे म्हणणे आहे की,
ध्वजारोहणाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाचे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
त्यानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात केवळ महात्मा गांधींचेच चित्र लावण्याचे निर्देश न्यायालयांना देण्यात आले आहेत.
हा प्रोटोकॉल लक्षात घेऊन डॉ.आंबेडकरांचे चित्र काढण्यात आल्याचे काही वकिलांचे म्हणणे आहे.
मागील प्रजासत्ताक दिनीही हा मुद्दा उठवला गेला
या प्रकरणाला विरोध करणाऱ्या वकिलांनी सांगितले की, गेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात हा मुद्दा गाजला होता.
रायचूर बार असोसिएशनने उच्च न्यायालयाला पत्र लिहून प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात महात्मा गांधी यांच्यासोबत
डॉ.आंबेडकरांची प्रतिमा लावण्याची परवानगी मागितली आहे.
शहरातील सिटी रेल्वे समोर जमलेल्या हजारो आंदोलकांनी संविधान संरक्षण महाओकुटाच्या (Samvidhana Samrakshana Maha Okkuta,) संघटनेच्या नेतृत्वाखाली ‘विधान सौधा चलो’ विधान सभा चलो (Vidhana Soudha Chalo) आणि (High Court Chalo) ‘हायकोर्ट चलो’च्या घोषणा देत हा महामोर्चा काढला.
घटनाविरोधी कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना योग्य धडा शिकवला गेला पाहिजे
आंदोलकाला संबोधित करताना, म्हैसूर उरीलिंगा मठाचे ज्ञान प्रकाश स्वामीजी म्हणाले,
“डॉ बीआर आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा अपमान करण्यामागे एक मोठे षड्यंत्र आहे.
कोणत्याही घटनाविरोधी कृत्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि गुन्हेगारांना योग्य धडा शिकवला गेला पाहिजे.”
बसपचे प्रदेशाध्यक्ष एम कृष्णमूर्ती म्हणाले, “आंबेडकरांच्या नावावर निवडणूक जिंकणारे अनेक जण मनुवादाचे गुलाम बनून काम करत आहेत, हे निंदनीय आहे. यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत ज्यात डॉ बीआर आंबेडकरांचा उघडपणे अपमान करण्यात आला होता. न्यायमूर्ती मल्लिकार्जुन गौडा यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
DSS नेते मवल्ली शंकर म्हणाले, “लोक मल्लिकार्जुन गौडा यांना ‘न्यायमूर्ती’ म्हणून बघत आहेत. पण त्यांची जातियवादी मानसिकता दिसून आली आहे. बसवण्णांसारख्या थोर समाजसुधारकाच्या आणि कुवेंपूसारख्या कवीच्या भूमीत मल्लिकार्जुनासारख्या जातीयवादी विचारसरणीच्या व्यक्ती न्यायदानास बसने हे खरोखरच अपमानास्पद आहे. गौडा हे न्यायाधीशाच्या पदावर बसले आहेत.अशा जातीयवादी न्यायाधीशांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.त्यांची बदली करणे म्हणजे शिक्षा होत नाही.त्याना शिक्षा व्हावी,अशी आमची मागणी आहे.सरकारने अनेक परिपत्रके पाठवली असली तरी त्यांनी आंबेडकरांचा फोटो काढून टाकला. समाज अशा सामाजिक गटांच्या पायावर उभा आहे त्याला न्यायव्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.
विचारवंत आणि अभिनेते चेतन म्हणाले, “आम्ही भाजप किंवा काँग्रेस या दोघांनाही पाठिंबा देत नाही. आम्ही पर्यायी शक्ती आहोत. आता हिजाब आणि शालचा मोठा मुद्दा सुरू आहे. पण आम्ही निळी शाल घालतो. बदल हाच पर्याय आहे. आमची ही हाक देशाच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे.
न्यायाधीशांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले
या विषयावर आपले मत मांडताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “डॉ बीआर आंबेडकरांचा फोटो काढून टाकणे आणि नंतर आपल्या राज्यघटनेच्या शिल्पकाराचा अपमान करणे या प्रकरणाने माझे तर डोळे उघडले आहेत. या कृत्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.” फ्रीडम पार्क येथील आंदोलकांच्या सभेला संबोधित करताना बोम्मई म्हणाले, “डॉ बी आर आंबेडकर यांचे छायाचित्र काढून टाकल्याच्या घटनेबाबत दलित समाजाच्या नेत्यांनी मला सविस्तर समजावून सांगितले आहे. याबाबत मी संबंधितांशी चर्चा करून लवकरच पत्र लिहीन.
“डॉ. आंबेडकरांचा झालेला अपमान निंदनीय आहे. आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्याचा अपमान करणारे कोणतेही कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. डॉ. आंबेडकरांची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्यासाठी आम्ही आघाडीवर आहोत. संविधानानुसार आम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ. ,” असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
निषेध मोर्चामुळे केआर सर्कल आणि मॅजेस्टिक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, 11 एसीपी, 30 निरीक्षक, 1030 महिला आणि पुरुष पोलिस कर्मचारी, केएसआरपीच्या 10 कंपन्या, दोन वॉटर जेट्स आणि दोन फायर सर्व्हिस इंजिने असा कडक बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता.
इतर वाचनीय लेख/बातम्या
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
Bhima Koregaon Commission:रश्मी शुक्ला यांचे प्रतिज्ञापत्र सादर
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 20, 2022 16:09 PM
WebTitle – Ambedkar’s image removed, Dalit organizations in the state of Karnataka have joined the massive protest rally