विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतासह जगभरात साजरी होत असते.तसेच जगातील अनेक देश त्यांच्या कार्याचा आढावा घेत विविध प्रकारे सन्मान करत असतात.या पार्श्वभूमीवर ऍरिझोना राज्याचा राजधानीत येथे राज्यपाल केटी हॉब्ज यांनी 13 एप्रिल ते 20 एप्रिल हा आठवडा समता दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
14 एप्रिल हा दिवस ‘डॉ बी आर आंबेडकर समता दिन’ (Dr. B. R. Ambedkar Equality Day) जाहीर केला होता.तो दरवर्षी आता साजरा केला जातो.आणि आता अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात सुद्धा 14 एप्रिल हा दिवस ‘डॉ बी आर आंबेडकर समता दिन’ (Dr. B. R. Ambedkar Equality Day ) म्हणून साजरा केला जातो. (Dr. B. R. Ambedkar Equality Day in Colorado US)
14 एप्रिल 1891 रोजी भारतात जन्म झालेले डॉ. बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर हे “भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार” आहेत, स्वतंत्र भारतातील समता, न्याय, सन्मान आणि बंधुत्वाचे समर्थन करणारे ते प्रगल्भ समाजसुधारक, मानवतावादी, राष्ट्रनिर्माते, तसेच एक प्रख्यात घटनात्मक वकील, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कायदा निर्माता, पर्यावरणवादी, राजकारणी आणि लाखो करोडो दलितांची मुक्तता करणारे होते; ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री सुद्धा होते.
ऍरिझोना राज्याच्या राजधानीत साजरी होतेय आंबेडकर जयंती

डॉ. आंबेडकर यांनी आधुनिक भारताच्या विकासात बहुआयामी योगदान दिले आणि त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात आले; अस्पृश्य जातीत जन्मलेले डॉ. बी.आर. आंबेडकर हे पहिले उच्चशिक्षित, राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तिमत्व होते ज्यांनी आयुष्यभर उपेक्षित घटकांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यांनी पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. 1927 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात, आणि 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डीएससी प्राप्त केली. त्यांना कोलंबिया विद्यापीठाने 1952 मध्ये “महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचे शूर समर्थक” म्हणून सन्मानित केले.
समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या समाजासाठी निर्मिती करुणा आणि अहिंसेची तत्त्वे आत्मसात करत
आधुनिक भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठीही त्यांची ओळख आहे;
डॉ. बी.आर. आंबेडकर इक्विटी दिन म्हणजेच समता दिन हा समता, सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि प्रतिष्ठेच्या त्यांच्या समर्पणाच्या वारशाचे स्मरण
आणि सन्मान करण्याची संधी आहे, जी ऍरिझोना राज्याच्या राजधानीत आणि जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे.

ऍरिझोना राज्याच्या राजधानीत आंबेडकर जयंती निमित्त समता आठवडा

म्हणून, मी, ऍरिझोना राज्याची गव्हर्नर म्हणून, ऍरिझोना राज्याच्या राजधानीत समता दिन आठवडा ,
याद्वारे 13 एप्रिल 2024 ते 20 एप्रिल डॉ. बी.आर. आंबेडकर समता दिन म्हणून घोषित करत आहे.
अशी घोषणा पत्रक काढून ऍरिझोना राज्याच्या राजधानीत येथे राज्यपाल केटी हॉब्ज यांनी देत जाहीर केले.
भारताच्या सुपुत्राचा जगभरात होणारा गौरव सन्मान हा तमाम भारतीय नागरिकांच्या मनात आनंद आणि अभिमान फुलवणारा आहे.
भारताची राज्यघटना लिहून भारतातील प्रत्येक घटकास नागरिकास समता आणि स्वातंत्र्य बहाल करणाऱ्या
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टीम जागल्या भारत विनम्र अभिवादन करत आहे.
ही बातमी भारतातील कोणत्याही प्रसार माध्यमात दिली जात नाही,केवळ आपणच ही बातमी दरवर्षी देत असतो त्यामुळे जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 05,2024 | 14:40 PM
WebTitle – Ambedkar Jayanti is being celebrated in the state capital of Arizona