अंतराळ प्रवासाचा आज एक नवा इतिहास रचला गेला आहे.अमेझोन चे फाऊंडर जेफ बेजोस यांची अंतराळ कंपनी ब्लू ओरिजिन ची निर्मिती असणारे रॉकेट न्यू शेपर्ड जेफ बेजोस त्यांचा भाऊ आणि इतर दोन प्रवाशांसह अंतराळात झेपावले.न्यू शेपर्ड रॉकेटचे हे सोळावे उड्डाण होते.
जेफ बेजोस यांनी Amazon.com चे सीईओ पद सोडल्याच्या जवळपास दोन आठवड्यानंतर २० जुलै रोजी ही अंतराळ मोहीम आयोजित करण्यात आली होती.जेफ बेजोस यांनी सोशल मीडियावर आपल्या अंतराळ प्रवासाबद्दल घोषणा करताना लिहिले होते की, मी फक्त ५ वर्षाचा असल्यापासून माझे अंतराळात जाण्याचे स्वप्न होते. २० जुलै रोजी मी माझ्या भावासोबत हे स्वप्न साकार करणार आहे आणि हे माझ्या चांगल्या मित्रासोबतचे सर्वात खास क्षण असणार आहे.
3, 2, 1 🚀#BlueOrigin’s New Shepard blasts off carrying Jeff Bezos and crew on a suborbital trip into space pic.twitter.com/60QWObdZ1L
— Bloomberg Originals (@bbgoriginals) July 20, 2021
वेस्ट टेक्सास मधील ब्लू ओरिजिन च्या लॉन्च साइट वन वरून आज संध्याकाळी 6.45 वाजता या रॉकेट चे लॉंचिंग करण्यात आले.
कॅप्सूल च्या आतमध्ये असणाऱ्या चार अंतराळवीरांना सुमारे चार मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षणाचा आनंद घेता आला.
Jeff Bezos and three passengers return to Earth after historic flight to edge of space. https://t.co/A0eR1oJLjm pic.twitter.com/mDns7rQbkQ
— ABC News (@ABC) July 20, 2021
त्यानंतर हे कॅप्सूल पॅराशूट च्या सहाय्याने खाली उतरू लागले.संध्याकाळी 6.52 वाजता अंतराळ प्रवास करून जेफ बेजोस आणि त्यांचे पथक सुखरूप पृथ्वीवर परतले.
WATCH: Jeff Bezos, Mark Bezos, Wally Funk, and Oliver Daemen emerge from Blue Origin capsule after successful launch to the edge of space. https://t.co/ggHEckNP6S pic.twitter.com/5JQFSLKqzb
— NBC News (@NBCNews) July 20, 2021
न्यू शेफर्ड रॉकेट चे लाँचिंग पूर्णपणे स्वयंचलित आहे.
त्याच्या प्रक्षेपणपासून ते लँडिंगपर्यंत अंतराळवीरांना कोणत्याही प्रकारच्या कन्सोलवर कोणतेही काम करावे लागले नाही.प्रथमच एखाद्या स्पेसशी संबंधित लाँच पूर्णपणे स्वयंचलित आहे.
भारत ही मानव निर्मित यान सोडण्याच्या तयारीत
भारतही दीर्घ काळापासून अंतराळात मानवनिर्मित यान पाठविण्याची तयारी करत आहे, ज्याला भारताने गगनयान मिशन असे नाव दिले आहे.
डॉ.जयंत नारळीकर : प्रेषीत विज्ञानाचा, जाणून घ्या
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 20, 2021 20:00 PM
WebTitle – Amazon founder Jeff Bezos returned to the Earth’s surface safely 2021-07-20