20 मार्च 2025 | उत्तरप्रदेश : आलाहाबाद हायकोर्टने एका खटल्यात टिप्पणी करताना म्हटले आहे की , “स्तन पकडणे, पायजाम्याचा नाडा तोडणे आणि पुलाखाली ओढण्याचा प्रयत्न करणे… हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न म्हणून आरोप ठेवण्यासाठी पुरेसे नाही.” कोर्टाने ‘गुन्हा करण्याची तयारी’ आणि ‘वास्तविक गुन्हा करण्याचा प्रयत्न’ यातील फरक स्पष्ट केला आहे.
खटल्याची पार्श्वभूमी
हायकोर्टने दोन आरोपींवर खालच्या न्यायालयाने लावलेल्या आरोपांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले आहेत. पवन आणि आकाश नावाच्या आरोपींवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. कासगंज येथील न्यायालयाने त्यांना भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३७६ (बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या (POCSO) कलम १८ अंतर्गत समन्स जारी केले होते.
“स्तन पकडणे, पायजाम्याचा नाडा तोडणे…हा बलात्काराचा प्रयत्न नाही”

घटना २०२१ सालची आहे. आरोपींनी अकरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा केला आणि नंतर बलात्काराचा प्रयत्न केला. एकाने तिचे स्तन पकडले आणि एकाने पायजम्याची नाडी सोडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही लोकांच्या नजरेस ही घटना दिसून आली त्यांनी अल्पवयीन मुलीला वाचवले, मात्र आरोपी पळून गेले. पीडितेच्या कुटुंबियांनी त्यावेळी तक्रार नोंदवली होती.
हायकोर्टचे निर्णय
आरोपींनी खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टमध्ये आव्हान दिले होते. त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की,
IPC च्या कलम ३७६ अंतर्गत कोणताही गुन्हा झाला नाही. त्यांनी असेही म्हटले की,
त्यांच्याविरुद्धची तक्रार IPC च्या कलम ३५४ आणि ३५४(B) (निर्वस्त्र करण्याच्या हेतूने हल्ला किंवा अपराधिक शक्तीचा वापर)
आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित तरतुदींच्या पलीकडे जात नाही.
बलात्काराचा प्रयत्न सिद्ध करावा लागेल
हायकोर्टने या युक्तिवादाला मान्यता दिली. १७ मार्च २०२५ रोजी दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी स्पष्ट केले की,

“बलात्काराचा प्रयत्न म्हणून आरोप ठेवण्यासाठी हे सिद्ध करावे लागेल की,
ही घटना तयारीच्या टप्प्यापेक्षा पुढे गेली होती. गुन्हा करण्याची तयारी आणि वास्तविक प्रयत्न यात फरक असतो.”
न्यायालयाने नमूद केले की, आरोपी आकाशवर पीडितेला पुलाखाली ओढण्याचा आणि तिच्या पायजाम्याचा नाडा तोडण्याचा आरोप आहे.
“साक्षीदारांनी त्यांच्या जबानीत असे स्पष्ट सांगितले नाही की, आरोपीच्या या कृत्यामुळे पीडिता निर्वस्त्र झाली किंवा तिचे कपडे उतरले.
असे कोणतेही आरोप नाहीत की, आरोपीने पीडितेच्या यौन उत्पीडनाचा प्रयत्न केला.”
“स्तन पकडणे, पायजाम्याचा नाडा तोडणे आणि पुलाखाली ओढण्याचा प्रयत्न करणे… हे बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न म्हणून आरोप ठेवण्यासाठी पुरेसे नाही.” त्यानंतर, कोर्टने आदेश दिला की, आरोपींवर IPC च्या कलम ३५४(B) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ९ आणि १० (गंभीर यौन हल्ला) अंतर्गत खटला चालवला जावा.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 20,2024 | 15:18 PM
WebTitle – Allahabad High Court Ruling, Rape Attempt Case, POCSO Act, Indian Penal Code, Judicial Controversy.