सोमालिया : सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या मध्यभागी असलेल्या हयात हॉटेलवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला. हसन शेख मोहम्मद नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सोमालियातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. अल-कायदा शी (Al-Qaeda) संबंधित अल-शबाब गटाने राजधानी मोगादिशूमधील ‘हॉटेल हयात’ ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांनी सर्वांना गोळ्या घालण्यास सांगितले आहे.
नवे राष्ट्रपती निवडल्यानंतर घडला मोठा हल्ला
अल-कायदा शी (Al-Qaeda) संबंधित अल-शबाब (The militant group Al-Shabab) या दहशतवादी संघटनेने सोमालिया ची राजधानी मोगादिशूच्या मध्यभागी असलेल्या ‘हयात’ हॉटेलवर कब्जा केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांनी इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी हॉटेलच्या बाहेर दोन स्फोटकांचा स्फोट केला आणि आग लावली. एका निवेदनात, इस्लामिक गटाने कंपाऊंडवर नियंत्रण असल्याचा दावा केला आणि सांगितले की ते सर्वांना गोळ्या घालत आहेत. फेडरल सरकारी कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी हयात हे एक लोकप्रिय ठिकाण असल्याचे म्हटले जाते.
सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले की, अनेक जण जखमी झाले आहेत. दहशतवादी आणि पोलीस,सैन्यदलासोबतच्या चकमकींचा गोळीबार ऐकू येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हीडिओज आणि छायाचित्रांमध्ये हॉटेलमधून ओरडण्याच्या आवाजासह धूर निघताना दिसत होता. मात्र हे फुटेज अन फोटो खात्रीशीर असल्याचा पुरावा समोर आला नाही,कारण अन व्हेरीफाईड हँडलवरून या गोष्टी शेअर करण्यात आल्या आहेत.दरम्यान,मोठा स्फोटही ऐकू आला. एका पोलीस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले, “हॉटेल हयातला दोन कार बॉम्बने धडक दिली. एक कार हॉटेलजवळील बॅरिकेट्सवर आदळली. त्यानंतर दुसरी हॉटेलच्या गेटवर आदळली. आम्हाला वाटते की दहशतवादी हॉटेलच्या आत आहेत.”
फेडरल सरकारशी दीर्घकाळ संघर्ष
अल-कायदाचा सहयोगी, अल-शबाब फेडरल सरकारशी दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात गुंतलेला आहे. हा गट दक्षिण आणि मध्य सोमालियाच्या बर्याच भागावर नियंत्रण ठेवतो, परंतु मोगादिशू येथील सरकारी-नियंत्रित भागात त्याचा प्रभाव वाढविण्यात सक्षम झाले आहेत.अल-शबाबच्या संभाव्य नवीन रणनीतीबद्दल चिंता वाढवत, अलीकडच्या आठवड्यात या गटाशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांनी सोमालिया-इथिओपिया सीमेवरील केंद्रांवर हल्ले केले आहेत. सोमालियाचे नवे अध्यक्ष हसन शेख महमूद यांची मे महिन्यात निवड झाल्यानंतर शुक्रवारचा हल्ला हा राजधानीतील गटाचा पहिला हल्ला आहे.
हे ही जाणून घ्या
KM4 जंक्शन येथील लोकप्रिय हयात हॉटेलमध्ये खासदार आणि इतर सरकारी अधिकारी वारंवार येत असतात.
सुरक्षा अधिकारी अब्दुकादिर हसन यांनी सांगितले की,
हयात हॉटेलवरील हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि जिहादी गटाच्या सशस्त्र दशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.
दहशतवादी हॉटेलच्या आत आहेत. मोहम्मद सलाद या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की,
“या भागाला आता वेढा घातला गेला आहे आणि सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे.”
सरकारी यंत्रणांचे हॉटेल हयात वर अखेर नियंत्रण
मोगादिशूमधील हयात हॉटेलवर ताबा मिळवण्यासाठी सरकारी सुरक्षा यंत्रणेने यश मिळवले असल्याचे जाहीर केलेय.सैन्याने बहुतेक ऑपरेशन संपवत असल्याचे जाहीर केले असून ते वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले असल्याचे कळवले आहे, जिथे सशस्त्र दहशतवादी रात्रीच्या वेळी गोळीबार करत होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 10 लोकांचा बळी गेला आहे.सुरक्षा यंतरणेचे क्लिअरन्स ऑपरेशन सुरू आहे
जम्मू काश्मीर मध्ये 25 लाख मतदार अचानक कसे वाढले? समजून घ्या
‘अफजल’ बनून ‘विष्णू’ ने दिली मुकेश अंबानी ना जीवे मारण्याची धमकी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 20,2022, 11:45 AM
WebTitle – Al Qaeda-linked terrorists take over the Hyatt Hotel in Somalia