पंजाबमध्ये अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी बाकांवरील शिरोमणी अकाली दलाने तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अकाली दल आणि बसपा बहुजन समाज पार्टीने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
अकाली दल शेतकरी कायद्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि एनडीएतून बाहेर पडला असून, विधानसभा निवडणूक आता बसप सोबत लढणार आहे. त्यामुळे गटबाजीचा सामना करणाऱ्या काँग्रेसला येत्या निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे.
अकाली दलाने बसपाला १८ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.बसपाचे महासचिव सतिश मिश्रा आणि अकालीदला चे नेते सुखबिर सिंग बादल हे आज युतीची घोषणा करणार आहेत.
यापूर्वी 1996 साली बसपा आणि अकाली दलने एकत्रित निवडणूक लढवली होती.
यावेळी बसपा नेते कांशीराम हे विजयी झाले होते.पंजाब मध्ये 33% टक्के वोटबँक ही मागासवर्गीय समाजाची आहे,
त्यामुळे ती महत्वाची मानली जाते.
गेल्या निवडणुकीत अकाली-भाजपाच्या दहा वर्षांच्या कारभारामुळे उद्भवलेल्या सत्ताविरोधी भावनेचा फायदा कॉंग्रेस आणि आप ला झाला.
आता कॉंग्रेसमध्येच मुख्यमंत्र्यांविरूद्ध असंतोष लक्षात घेता जनभावनेचे आकलन करणे कठीण झाले असून
अशा परिस्थितीत कॉंग्रेसच्या राजवटीमुळे निराश झालेल्या मतदारांचा आत्मविश्वास कोणता पक्ष
आणि नेता जिंकू शकतील हा नैसर्गिक प्रश्न आहे.
अकाली दल -बसपा एकत्र ; सत्तेची गणितं जुळणार का?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)