गणेश विसर्जन च्या दिवशी अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या असून यात अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.यावर्षी कोरोनाच्या निर्बंधानंतर गणेश उत्सवात मोठा उत्साह पाहायला मिळाला होता.निर्बंध नागरिकांच्या आरोग्याची जीवताच्या दृष्टीने गरजेचे असले तरी काही राजकीय नेत्यांनी मात्र त्याला वेगळेच स्वरूप देण्याचा प्रयत्न केला,या पार्श्वभूमीवर काल अनेक ठिकाणी गणेश विसर्जन च्या वेळी काही दुर्घटना घडल्याचे समोर आले.यात अनेकांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी झाले आहेत.
गणेश विसर्जन करतेवेळी पुणे येथे मृत्यू
पुणे येथील दौंड तालुक्यातील बोरींडी गावात काल गणपती विसर्जन दरम्यान दुर्घटना घडली,गणपती विसर्जन करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव संकेत सहदेव मेहेत्रे असं असून चार तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह सापडला अशी माहिती समोर आली आहे. मयत तरुण त्याच्या पाच-सहा मित्रांसह गणपती विसर्जन करण्यासाठी विहिरीत उतरला होता.संकेत सहदेव मेहेत्रे चा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
यवतमाळ मध्ये दोन मुलांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महागाव येथील गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या
दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून
संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान बबनराव गावंडे अशी मृत मुलांची नावं आहेत.
गणेश विसर्जन करतेवेळी हरियाणा येथे मृत्यू
हरियाणा मध्ये काल गणेश मूर्ती विसर्जन च्या वेळी झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 7 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सोनीपतमध्ये विसर्जनादरम्यान बुडून 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महेंद्रगडमध्ये गणेश मूर्ती विसर्जन च्या वेळी चार जणांना जीव गमवावा लागला. जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या बुडून झालेल्या अपघातांवर शोक व्यक्त केला आहे.
गणेश विसर्जनाच्यावेळी बुलढाणा येथे मृत्यू
देऊळगाव राजा बुलढाणा येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा खडकपूर्णा धरणाच्या बॅक वाॅटर मध्ये
पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव बळीराम विनायक बाेबडे असून
ही दुर्दैवी घटना ९ सप्टेंबर राेजी घडली़ व १० सप्टेंबर राेजी सकाळी या युवकाचा मृतदेह सापडून आला.
यूपीमध्येही गणेश विसर्जनाच्या वेळी अनेकांचा बुडून मृत्यू
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपीमध्येही गणेश विसर्जन करताना अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
विविध जिल्ह्यात विसर्जनाच्या वेळी 8 जणांचा मृत्यू झाला. संत कबीर नगरमध्ये 4 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी आहे.
विशेष म्हणजे हे चौघेही भावंडे होते. या सर्वांचे मृतदेह शोधकार्य करून बाहेर काढण्यात आले आहेत.
दुसरीकडे ललितपूर आणि उन्नावमध्ये विसर्जनादरम्यान बुडून प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी ११ जणांना विजेचा धक्का
पनवेल येथील कोळीवाडा गणेश विसर्जन घाटावर जनरेटरमधील वायर तुटून तब्बल 11 जणांना विजेचा धक्का बसला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पनवेलच्या लाईफ लाईन आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.यात एका 9 वर्षाच्या चिमूरडीचाही समावेश आहे.घटनेतील जखमींमध्ये दिलीप पनवेलकर (65),रितेश पनवेलकर (38),दर्शना शिवशिवकर (36),रुपाली पनवेलकर (35),हर्षद पनवेलकर (32), दिपाली पनवेलकर (24), वेदांत कुंभार (18),मानस कुंभार (17),सर्वेम पनवेलकर (15),निहाल चोणकर (5), आणि तनिष्का पनवेलकर (9 महिने) यांचा समावेश आहे.
सरकारी रेशन घेण्यासाठी आणली मर्सिडीज;व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 10,2022, 14:15 PM
WebTitle – Accidents at many places during Ganesha immersion; some people died