मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील माधवगंज पोलीस ठाण्याच्या गुडागुडी नाक्याजवळील टेकडीवर एका महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला एका ऑटोने बाजारातून तिच्या घरी जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाटेत ऑटो थांबवल्यानंतर स्कॉर्पिओमध्ये आलेल्या लोकांनी तिला ओढत गाडीत नेले आणि टेकडीवर नेल्यानंतर तिघांनी बंदुकीच्या धाकावर सामूहिक बलात्कार केला.यासोबतच आरोपींनी महिलेचा न्यूड व्हिडीओही बनवला आणि ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, माधवगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडा गुडी का नाकाजवळ सायंकाळी ७ वाजता ही महिला महाराज वाड्यातून आपल्या घराकडे जात होती. ऑटोमध्ये बसलेली महिला घराजवळील निर्जन भागात पोहोचली असता, स्कॉर्पिओ मधून आलेल्या तीन आरोपींनी ऑटोसमोर कार घेऊन महिलेला ऑटोमधून ओढले आणि स्कॉर्पिओमध्ये बसवले. यानंतर महिलेला कैसर टेकडीवर नेल्यानंतर तिघा आरोपींनी बंदुकीच्या धाकावर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घरी गेल्यानंतर महिलेने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला
या घटनेनंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महिलेने घरी पोहोचून संपूर्ण घटना कुटुंबीयांना सांगितली.
त्यानंतर महिला आणि कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पीडित महिलेने आरोपीला ओळखले आहे, त्या आधारे पोलिसांनी रवी गुर्जर,
त्याचा साथीदार कुलदीप गुर्जर आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर पीडित महिला ही काही काळापूर्वी माधौगंज परिसरात आरोपी रवी गुर्जर नावाच्या व्यक्तीच्या घरात भाड्याने राहत होती.रवीचा स्वभाव आणि घाणेरडा हेतू कळताच तिने हे घर सोडले होते. तिच्या म्हणण्यानुसार, “29 मे च्या रात्री मी मुलासाठी कपडे आणण्यासाठी बाजारात जात होतो. रवी गुर्जर आपल्या दोन साथीदारांसह तेथे पोहोचला आणि नंतर कट्टा दाखवून जबरदस्तीने मला स्कॉर्पिओमध्ये बसवले. तिन्ही आरोपी मला कैसर टेकडीवर घेऊन गेले. याठिकाणी चाकू ठेवून तिघांनी तिच्यावर आलटून-पालटून बलात्कार केला.” याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
ग्वाल्हेर जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनेत प्रचंड वाढ झाली असून कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.यामुळे महिला वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
भीमा कोरेगाव चौकशी समितीचे मुख्यमंत्र्यांसह 6 राजकीय पक्षांना समन्स
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 10 2022, 13 : 20 PM
WebTitle – A woman was pulled out of a auto and gang-raped at gunpoint in Madhya Pradesh