उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली.दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस हायवेवर मंगळवारी पुन्हा अपघात झाला.अपघातात शाळेची बस चालकाची चूक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झालाय.दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर एक स्कूल बस भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येत होती. यादरम्यान त्यांची समोरून येणाऱ्या कारला धडक बसली. या अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ वर्षांच्या चिमुकल्यासह दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस स्टेशन परिसरातील आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचले असून मदत कार्य सुरू करण्यात आले.
शाळेची बस मेरठ एक्सप्रेस हायवेवर शाळेची बस रॉंगसाइडने सुसाट येत असल्याचे घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. कार मेरठकडून येत असताना. त्यानंतर दोघांची टक्कर होते. बसमध्ये सीएनजी भरून स्कूल बस चालकाने काही किलोमीटरचा प्रवास वाचवण्यासाठी बस 8 किलोमीटर राँग साइडने चालवली असल्याचे सांगण्यात येत आहे.पण चुकीच्या बाजूने रॉंगसाइडने दिल्ली-मेरठसारख्या मुख्य आणि वर्दळीच्या एक्स्प्रेस वेवर प्रवेश करत असताना बस चालकाला का थांबवण्यात आले नाही, हा प्रश्न आहे. एवढेच नाही तर बसचालक 8 किलोमीटर राँग साईडने चालत राहिला, तरीही एक्स्प्रेस वेवर तैनात असलेल्या पोलिसांना तो का दिसला नाही? असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
बस चालकाला ताब्यात घेण्यात आले
एडीसीपी ट्रॅफिक रामानंद कुशवाह यांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात सकाळी 6-7 च्या दरम्यान झाला. या भीषण अपघातानंतर स्कूलबस चालकास पोलिसांनी अटक केलीय. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून पोलीसांकडून या घटनेचा शोध घेतला जात आहे. अपघाताच्या वेळी स्कूल बस रिकामी होती असे सांगण्यात येत आहे.
हे कुटुंब खाटू श्याम च्या दर्शनाला चालले होते
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या मवाना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणारे कुटुंब खाटू श्याम च्या दर्शनाला चालले होते.
TUV वाहनात 4 प्रौढ आणि 4 मुले होती. दिल्ली मेरठ द्रुतगती मार्गावरील विजय नगर उड्डाणपुलावर
चुकीच्या दिशेने येणाऱ्या स्कूल बसला धडक बसली.या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर गाझियाबादमध्ये मंगळवारी हा अपघात झाला. गाझियाबादमधील विजय चौकाजवळ TUV 300 कार आणि स्कूल बसची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन कारमध्ये बसलेल्या ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 वर्षांच्या मुलासह दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे कारचा चक्काचूर झाल्याने कारच्या गेटला अक्षरश: कटरच्या सहाय्याने कापत मृतदेह बाहेर काढण्यात आले.
बुलढाणा समृद्धी महामार्ग बसचा भीषण अपघात 26 जणांचा होरपळून मृत्यू
रॉंगसाइड वाहने चालवणे रोजचेच
अमित गुप्ता यांनी अलिकडचाच एक व्हिडिओ शेअर करत हा प्रश्न किती गंभीर आहे याकडे लक्ष्य वेधले.व्हिडिओ शेअर करत ते म्हणाले,” नोएडा गाझियाबादमध्ये चुकीच्या बाजूने गाडी चालवणे हे नविन थोडेच आहे, उलटे चालणे हा आपला हक्क आहे, हा फोटो आहे 2 दिवसांपूर्वी, सेक्टर 76 मधील पोलीस चौकीसमोर, मुसळधार पावसातही भाऊ रॉंगसाइड जात होते.
ता.क. : मोबाईल माझ्या हातात नव्हता सर डॅशबोर्डवर होता”
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 11,2023 14:20 PM
WebTitle – A school bus on the Meerut Express Highway on the wrong side; 6 people died