महाराष्ट्रातील बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 32 प्रवाशांना घेऊन नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एसी बसला आग लागली. हा बसचा अपघात इतका भीषण होता की यात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. इतर जखमींची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे समजते आहे. Buldhana Samriddhi Highway bus accident, 26 people died डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर लगेचच बुलढाणा पोलिस उपायुक्त बाबुराव महामुनी म्हणाले, “बसमधून 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमध्ये एकूण 32 लोक होते. 6-8 जण जखमी आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना बुलढाणा मधिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ” मात्र आता मृतांची संख्या ही 26 इतकी झाली आहे.
मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार,बुलढाणा येथील बसचा हा भीषण अपघात पहाटे 2 च्या सुमारास घडला असून.खाजगी विदर्भ ट्रॅव्हल्सची एसी बस पुणे येथे जात असताना पुलावर आदळल्याने बस पलटली त्यामुळे डिझेल ची टाकी फुटून आग लागून हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आलीय. बसचा चालक सुखरूप असल्याचे कळते.
मुख्यमंत्र्यांनी दिले घटनेच्या चौकशीचे आदेश
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, “बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजाजवळ महामार्गावर खासगी बसला लागलेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देत जखमींवर शासकीय खर्चात तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक
तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले.
चंद्रशेखर ला भेटण्यासाठी बजरंग पुनिया, साक्षी मलिक ने बांधला काळा धागा
CCTV footage भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद वर प्राणघातक हल्ला, गोळीबार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 01 JULY 2023, 10:26 AM
WebTitle – Buldhana Samriddhi Highway bus accident, 26 people died