रेल्वे तिकीट खरेदी करताना प्रवाशांचे वरचे सुट्टे पैसे ढापण्याचे अनेकदा प्रकार होत असतात,अनेकदा सुट्टे पैसे देण्यावरून भांडण होते तर काही वेळेस प्रवासी घाईत असल्याने वाद घालणे सोडून देतात,तर कधी पैसे घेणेच विसरून जातात त्यामुळे अशा रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्क लोकांचे फावते.असं तुमच्या सोबत देखील कधीतरी घडलं असेल.अशीच एक रोचक घटना समोर आलीय.दक्षता पथकाच्या सूचनेवरून बनावट प्रवासी म्हणून तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या आरपीएफ जवानाकडून रेल्वे तिकीट भाडे घेताना 6 रुपये परत न केल्याने रेल्वेच्या बुकिंग क्लार्कची नोकरी गमवावी लागली आहे. प्रवाशांकडून जास्त भाडे आकारल्याप्रकरणी नोकरीवरून काढण्यात आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्क ला 6 रु. का गमवावी लागली नोकरी जाणून घ्या
न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एस.व्ही. मारन यांच्या खंडपीठाने असं निरीक्षण नोंदवले की, उरलेले सुट्टे पैसे देण्यास नसल्याने प्रवाशाला पैसे परत केले नाहीत, असा युक्तिवाद बडतर्फ केलेल्या लिपिकाने केला. जर हे खरं असेल, तर लिपिकाने प्रवाशाला खिडकीजवळ थांबण्याची विनंती करायला हवी होती जेणेकरुन तो थकित (उरलेले) 6 रुपये परत करू शकला असता.मात्र रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्क ने प्रवाशाला उरलेले पैसे देण्यासाठी थांबण्याची विनंती केली. हे इतर कुणीही ऐकले नव्हते.तसे आढळून आले नाही. 7 ऑगस्ट रोजी उपलब्ध झालेल्या आदेशात खंडपीठाने म्हटले आहे की, लिपिकाने 6 रुपये परत करण्याचा हेतू दर्शविणारा कोणताही पुरावा आमच्यासमोर आलेला नाही. त्यामुळे सबळ पुराव्याच्या आधारे लिपिकाविरुद्धचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्क ला दिलासा न देणारा एप्रिल, 2004 चा CAT आदेश कायम ठेवण्यात आला आहे आणि याचिका फेटाळण्यात आली आहे.
ऑफिसच्या कपाटात 450 रु
हे प्रकरण 31 जुलै 1995 रोजी कमर्शियल लिपिक म्हणून नियुक्त राजेश वर्मा यांच्याशी संबंधित आहे. वर्मा, कुर्ला टर्मिनस येथे तैनात होता, 31 जानेवारी 2002 रोजी रेल्वे प्रशासनाच्या शिस्तपालन प्राधिकरणाने प्रवाशांकडून जादा शुल्क आकारल्याच्या आरोपाखाली चौकशी केल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते.यापूर्वी 30 ऑगस्ट 1997 रोजी रेल्वेच्या दक्षता पथकाने दोन आरपीएफ हवालदारांना प्रवासी असल्याचे भासवून तिकीट खरेदीसाठी पाठवले होते. एका हवालदाराने वर्मा यांना ५०० रुपये दिले आणि कुर्ला ते आरा चे तिकीट मागितले. तिकीटाची किंमत 214 रुपये होती, मात्र वर्मा यांनी 286 रुपयांऐवजी 280 रुपये कॉन्स्टेबलला परत केले. म्हणजे 6 रुपये कमी दिले. यानंतर दक्षता पथकाने छापा टाकला. यावेळी वर्माजवळील कपाटात येथून 450 रुपये सापडून आले मात्र त्याच्याकडे रेल्वेच्या हिशेबात 58 रुपये कमी असल्याचे देखील आढळून आहे.
या प्रकरणी वर्मा याला रेल्वे प्राधिकरणाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने त्याने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) अर्ज केला. कॅटने वर्मा यांना कोणताही दिलासा न दिल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.खंडपीठाने सांगितले की जेव्हा याचिकाकर्त्याने (वर्मा) रेल्वे प्राधिकरणाकडे दयेचा अर्ज केला तेव्हा त्याने नव्याने नोकरीसाठी विनंती केली. हे एक प्रकारे याचिकाकर्त्याने आपली चूक मान्य केल्याचे सूचित करते.वर्मा यास याप्रकरणी त्याची बाजू मांडण्याची संधीदेण्यात आली होती. त्यावेळी बोगस प्रवासी म्हणून हवालदार उभे करण्याबाबत याचिकाकर्त्याने प्रश्न उपस्थित केले
बचाव पक्षाचे युक्तिवाद
सुनावणीदरम्यान वर्मा यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मिहिर देसाई म्हणाले की, दक्षता पथकाने नियमांचे पालन केले नाही.
रेल्वेच्या दक्षता नियमावलीनुसार राजपत्रित अधिकाऱ्यालाच बनावट प्रवासी म्हणून पाठवले जाऊ शकते,
मात्र या प्रकरणात हवालदाराची मदत घेण्यात आली आहे.ज्या कपाटात पैसे सापडले होते त्यावर एकट्या याचिकाकर्त्याचे नियंत्रण नव्हते.
या प्रकरणात रेल्वे प्राधिकरणाने अंदाजाच्या आधारे सर्व निष्कर्ष काढले आहेत.
उरलेले सुट्टे पैसे देण्यास न मिळाल्याने माझ्या क्लायंटने पैसे परत केले नाहीत.
मात्र त्याने प्रवाशाला थांबण्यास सांगितले, पण तो थांबला नाही.
दुसरीकडे, रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी कॅटचा आदेश कायम ठेवण्याची विनंती केली.
अशीच एक घटना एक महिन्यापूर्वी आमच्यासोबतच घडली आहे.
प्रथम दर्जाचा मासिक पास काढत असताना रेल्वे तिकीट बुकिंग क्लार्क महिलेने वीस रुपये कमी दिले होते,
काउंटर सोडून पुढे आल्यावर आमच्या लक्षात ही बाब आली,आणि आम्ही काउंटरकडे धाव घेतली.
तेव्हा तिकीट बुकिंग क्लार्क महिला तिची बाजू सावरत म्हणाली की मी आवाज देत होते पण तुम्ही लक्ष दिले नाही,
आणि तीने वीस रुपये परत केले. मात्र आमच्यासोबत इतर प्रवासी होते,
आणि आमचे सहकारी या सर्वांना हे माहित होतं की तिकीट बुकिंग क्लार्क महिलेने कोणत्याही प्रकारे आवाज दिला नव्हता,
मुळातच पैसे देतानाच पूर्ण पैसे रिटर्न देणे अपेक्षित होते,वीस रुपये बाजूला ठेवणे,किंवा न देणे हा प्रकार कसा घडू शकतो?
हे चुकीने किंवा अनावधानाने घडलं नसून जाणूनबूझून असे प्रकार केले जातात,
आणि आपण घाईत असल्याने वरचे दहा वीस किंवा सुट्टे पैसे विसरून जातो,
रेल्वेने यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.जेणेकरून प्रवाशांची फसवणूक होणार नाही.
अक्षय कुमार ला मिळाले भारताचे नागरिकत्व, पुरावा शेअर करत लिहिले- मन आणि नागरिकत्व, दोघेही भारतीय
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 16,2023 | 12:15 PM
WebTitle – A railway ticket booking clerk lost his job for Rs 6.