बदायूं मध्ये फटाक्यांमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय. दिवाळीत वाजवले जाणारे फटाके जीवघेणे ठरले आहेत.सदर घटना ही झरीफनगर भागातील मौरुबाला गावातील असून येथे रहदारीच्या रस्त्यावर एका ग्लासात फटाके पेटवताना तिथून जाणाऱ्या एका प्रवाशाला त्याच्या स्फोटाची झळ बसली,स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की यामुळे सदर व्यक्तीचा या स्फोटामुळे मृत्यू झाला आहे.
ग्लास खाली लावलेला बॉम्ब फुटला एकाचा मृत्यू
दैनिक जागरण ने दिलेल्या माहिती नुसार,झरीफनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौरुबाला गावात धीरेंद्र दिवाळीला बाहेर काचेच्या ग्लासमध्ये फटाके फोडत होते. त्याचवेळी ग्लास मध्ये लावलेल्या बॉम्ब च्या फटाक्यांच्या स्फोटाने काचेचा मोठा स्फोट होऊन त्याचे तुकडे उडाले.त्याच वाटेने जाणाऱ्या गावातील छत्रपाल यांच्या गळ्यात हा काचेचा तुकडा घुसला. रक्तस्त्राव होऊन ते तिथेच पडले.नंतर नातेवाइकांनी त्याना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे त्याची प्रकृती चिंताजनक असताना त्याना अलीगडला नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कुटुंबीयांच्या आनंदावर शोककळा पसरली. मृताच्या नातेवाइकांनी गावातील धीरेंद्रविरुद्ध जरीफनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात फटाके फोडताना मुलं जखमी
सोशल मिडियात अॅक्टिव असणारे डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांच्या क्लिनिकमध्ये काल दोन जखमी मुलांवर उपचार करण्यात आले.
बिल्डिंग मध्ये रॉकेट सोडणारा व्हिडिओ व्हायरल
उल्हासनगरमध्ये एका तरुणाने रॉकेट फटाके उडवून बिल्डिंग मधिल रहिवाशांच्या खिडकीत सोडल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दुसरीकडे आजतक चे पत्रकार अभिषेक आनंद यांनी दिवाळीतील फटक्यांच्या वायु प्रदूषणाने त्यांच्या मुलाचाच व्हिडिओ शेअर करून आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्या मुलाला वायु प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिलं “हा अभिनंदन माधवेंद्र सिंग, 4 वर्षांचा माझा एकुलता एक मुलगा आणि आमच्या जीवनाचा प्रकाश आहे. काल रात्रीपासून तो अस्वस्थ आहे.कुणी शेतातील तणकट जाळत असेल फटाके फोडत असेल त्यांना रोखणारा मी कोण आहे? मी फक्त आणखी एक असहाय्य पिता आहे. मी प्रार्थना करतो श्री राम इतर कुणाला कधीही अशा परिस्थितीला सामोरे जाऊ देऊ नका.
डॉलर;उपासमार व बेरोजगारी च्या समस्येवर तोडगा काढणे याला प्राधान्य हवे
त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 26,2022, 13:05 PM
WebTitle – A bomb placed under the glass exploded killing one