मुंबई:BJP MLA Nitesh Rane : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळून लावला. नीतेश राणे यांचा मोबाईल ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. आता यावरून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.’नितेश राणे हरवलेत, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस’ असा मजकूर असणारी बॅनरबाजी मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी मिळालेल्या कॉल रेकॉर्ड्सवरुन त्याची चौकशी समोरसमोर झाली पाहिजे आणि त्यासाठी आरोपींचा ताबा हवा तसेच वडील केंद्रीय मंत्री आणि मुलगा आमदार अशी स्थिती असल्यास पोलीस आणि तपासावर दबाव येऊ शकतो, अशी बाजू न्यायालयात मांडली गेली.ती न्यायालयाने ग्राह्य धरली आहे.
आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात अटक टाळण्यासाठी
सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी (28 डिसेंबर) अर्ज दाखल केला होता.
दरम्यान,नितेश राणे यांच्या फोटोसह मुंबईतील चर्चगेट या रेल्वेस्थानकाबाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे.
या बॅनरवर नितेश राणे हरवले असल्याचं म्हटलं आहे.त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून देण्यात येईल,
असंही बॅनरवर नमूद करण्यात आलंय.मात्र, हे बॅनर कोणी लावले आहे, याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे बॅनर कोणी लावले असेल, याची जोरदार चर्चा शहरात करण्यात येत आहे.
शिवसैनिकांनी न्यायालयाबाहेर फोडले फटाके
भाजप आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर शिवसैनिकांनी न्यायालयाबाहेर फटाके फोडले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरापासून काही अंतरावरच शिवसैनिकांनी हा जल्लोष केला. दुसरीकडे मुंबईतही शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.
हेही वाचा समीर वानखेडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 31, 2021 11:23 AM
WebTitle – ‘Nitesh Rane missing, chicken reward to informant’; Banner hoisting in Mumbai