मुहम्मद सिनेमा बंदी आणि मुस्लिम समाजाची आधुनिकता (?)
कोणत्याही कलाकृतीच्या संदर्भातील बंदी बद्दल माझं वेगळं मत आहे.
मूळ सत्य काय आहे?
मूळ सत्य काय आहे?
हा माझा मुद्दा कायम असतो,असेल.
त्याला सिनेमॅटिक लिबर्टी मी मान्य करत नाही.स्टारप्रवाहवर सुरु असलेल्या डॉ.आंबेडकर सिरीयल मध्ये जे चुकीचं चित्रण केलं गेलं त्याला म्हणून मी विरोध केला होता.जीथं सत्याचा विपर्यास होतो तीथे भूमिका घेणे अनिवार्य.
हे मुद्दे इतिहास ऐतिहासिक पात्र यांच्याशी निगडीत आहेत.
बाकी त्यात काही कौटुंबिक प्रेमाचे प्रसंग आले तरी मी हरकत घेणार नाही, कारण तेही मानव आहेत,त्यांना भाव भावना आहेत.त्याची लिबर्टी घेता येईल.याबाबतीत हवे पंख नवे हे प्रेमानंद गज्वी यांचे नाटक वेगळं ठरतं. असो
बाकी इतर जनरल गोष्टीत,गोष्ट सांगताना सिनेमॅटिक लिबर्टी मला मान्य आहे.फिक्शन किंवा इतर गोष्टीत तसेही सहसा कुणी आक्षेप घेत नाहीत, मुद्दा – इतिहास चुकीचा लादला जाण्याचा धोका असतो.
लिबर्टी घेताना मूळ सत्य बदललं जाता कामानये.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशा ठेवत नसत.त्यामुळे त्यांना मिशा काढणे हा आचरटपणा ठरतो.असाच एक फोटो मी पाहिला.ज्यात त्यांच्या मुखामध्ये सिगारेट अन डोक्यावर हॅट अन मिशा आहेत.ठगलाईफ मिम (Thug life meme) मध्ये ते रूपांतरण आहे.
लिबर्टीच्या नावाखाली उद्या वाट्टेल ते दाखवलं जाऊ शकतं,उद्या दारूची बाटली देतील हा धोका लक्षात घेतला पाहिजे.भारतात सर्वात जास्त द्वेष आणि विटंबना ही भारतीय घटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचीच होते,म्हणून काळ सोकावू देता कामा नये.
सिनेमॅटिक लिबर्टी कोण कुठे किती आणि कसा वापरतो हाही मुद्दा आहे.लिबर्टी घेताना मूळ सत्य बदललं जाता कामानये.
आता पोस्टचा मूळ मुद्दा – मजिद माजीदीचा मुहम्मद सिनेमा
हा चित्रपट जस्ट पाहिला मी.मला त्यात आक्षेपार्ह काहीच दिसलेलं नाही.या उलट मुहम्मद या व्यक्तिरेखाला लार्जर दॅन लाईफ दाखवत इस्लामचा प्रसार केल्याचे दिसतेय,मॅसेंजर ऑफ गॉड म्हणजे देवाचा दूत.हे सांगणारा हा चित्रपट.नेमकी गोष्ट सांगतो.परंतु चित्रपटात कुठेही विटंबना होतेय. चुकीचे काही दाखवले जातेय असे दिसत नाही,याबदल मी एका मुस्लिम पत्रकार मित्राला सुद्धा खात्री करून कन्फर्म केलं.समीर शेख यांना.
मजिद माजीदी आवडता दिग्दर्शक आहे.मूळचा इराणी दिग्दर्शक.
हा मुहम्मद सिनेमा रिलीज झाला 2015 मध्ये.भारतात तो त्यावेळीही प्रदर्शित होऊ दिला नाही असे समजते.आता २१ जुलैपासून भारतात तो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जातोय,म्हणून त्यावर बंदी घालावी अशी मागणी रझा अकादमीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली, गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला तातडीने पत्र लिहीत या सिनेमाच्या ऑनलाईन प्रदर्शनावावर बंदी घालावी अशी विनंती केली आहे.
इस्लाममधील काही पंथांमध्ये पैगंबर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे चित्रण आज निषिद्ध मानले जाते
रझा अकदमीचा आक्षेप हा मुहम्मद यांची भूमिका एका जीवंत व्यक्तीने करणे यावर आहे.इस्लाममधील काही पंथांमध्ये पैगंबर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे चित्रण आज निषिद्ध मानले जाते. (आज शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण या सर्वांचे चित्रण केलेली अनेक चित्रं मुस्लिम कलाकारांनी काढली आहेत मध्ययुगात. ती सर्व ऑनलाईन उपलब्ध आहेत.) – समीर शेख
(समीर शेख यांनी या मुद्यावर पोस्ट लिहिली आहे.ती आपण सर्वांनी वाचली पाहिजे)
समीर शेख यांच्या मते मध्ययुगात या सर्वांची चित्रे काढण्यात आलेली आहेत.त्यामुळे अशा गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत असे काही दिसत नाही.चित्रपटात भूमिका करणारा कलाकार शेवटपर्यंत चेहरा दाखवत नाही.
याची काळजी मजिद माजीदीने घेतली आहे.मुहम्मदचा जन्म आणि किशोरवयीन कालखंड यात आलेला आहे.या चित्रीकरणातील दृश्य,घटना यावर कुणाचाही आक्षेप नाही.आक्षेप जीवंत व्यक्तीने भूमिका करू नये हा आहे.एकूणच ही मानसिकता कळण्यापलिकडची आहे.
काही चुकीच्या गोष्टी असत्य गोष्टी दाखवल्या असत्या तर बंदीचा मुद्दा समजून घेता येईल.परंतु तसे काही इथं दिसत नाही.
चार्ली हेब्दो
यावरून आणखी एक घटना आठवली.तिरकस लिखाण आणि व्यंगचित्रे यासाठी प्रसिद्ध असलेल्या
फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकाच्या कार्यालयात घुसून अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात १२ जणांना प्राणाला मुकावे लागले होते.
या हल्ल्यामध्ये १० जण जखमी झाले होते.प्रेषित मोहम्मदांचे व्यंगचित्र मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केल्यामुळे त्यावेळी हल्ला करण्यात आला होता.
आपल्या धार्मिक भावना ह्या एखाद्या जीवंत माणसाचं आयुष्य संपवणाऱ्या त्याचा जीव घेण्याइतपत कठोर असतात का?
आणि आपल्या धार्मिक भावना दुखावल्यावर त्या व्यक्तीचा जीव घेतला पाहिजे.असं आपल्या धर्माच्या पुस्तकात लिहिलं आहे का?
लिहिलं असेल तर तुमच्या धर्माचं पुस्तक कालबाह्य झालं असून ए अपडेट करणं गरजेचं आहे,
आणि लिहिलं नसेल तर तुम्ही स्वत:ही धर्माच्या विरोधात कृत्य करत आहात.
तुम्हाला सभ्य समाजातील कायदे कानून मान्य नाहीत असे म्हणावे लागते.
.
बदलत्या काळात मुस्लिम समाजाने आधुनिकीकरण स्विकारले पाहिजे अगदी धर्माच्या बाबतीतही,
आणि मला वाटतं अनुषंगाने सर्वानीच आधुनिकता आधुनिक विचार प्रामाणिकपणे स्विकारणे गरजेचे आहे.
एकीकडे आपण आधुनिकतेचे सर्व फायदे सोयी सुविधा उपभोगतो
आणि विचार मात्र मध्ययुगात अश्मयुगीनच अंगीकारत कुरवाळत बसतो.हा विरोधाभास बदलणे गरजेचे आहे.
अनेक सुशिक्षित मुस्लिम तरुणांनी या बंदीच्या विरोधात भूमिका घेतल्याने आशा करण्यास हरकत नाही.की उद्याचं भविष्य उज्वल असेल.
मधुबाला : भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने १०
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)