मुंबई:आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूक 2022 ची तयारी सुरू झाली असून राज्यातील राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने हालचाल सुरू केली आहे.या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन थेट युती बाबत घोषणा केली आहे.आगामी मुंबई महापालिका निवडणूका 2022 साठी तिसरी आघाडी म्हणून उतरण्याचा आमचा मानस असून यासोबतच आम्ही आणखी लोकाना सोबत घेण्याचा विचार करत आहोत,आम्ही दरवाजे उघडे ठेवले असून मुंबई महापालिकेच्या निवडणूकांबाबतची चर्चा सध्या अनेक सामाजिक संघटनांसोबत होते आहे.असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष शिवसेना यांच्यासोबतही युती बाबत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.आगामी काळात आणखी राजकीय पक्ष जोडले जाणार आहेत असेही अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय घटनेच्या विरोधात निर्णय देत असल्याचे वक्तव्य
निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते एका दृष्टीने घटनेच्या विरोधात आहे.जुनी कॉर्पोरेशन असेल जिल्हा परिषदा असेल पंचायत समित्या या बरखास्त होण्याअगोदर त्या ठिकाणी नविन सभागृह येणे आवश्यक आहे. वारंवार कोव्हिडच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे चुकीचं आहे.आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.त्यामुळे न्यायालयांनी लोकसभा विधानसभाच्या इलेक्शन च्या वेळेस जी भूमिका घेतली तीच भूमिका जिल्हापरिषद महानगर पालिका निवडणुकांच्यावेळेस सुद्धा घेतली पाहिजे अशी आमची न्यायालयांना आग्रहाची भूमिका आहे.
या तीन पक्षांसोबत युती जाहीर
मुंबई महानगरपालिका (BMC Election 2022) निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी (VBA) राष्ट्रीय जनता दल (RJD)
आणि मुस्लिम लीग (Muslim League) या तीन पक्षांच्या सोबत बैठका होऊन युतीचा निर्णय झाला असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कॉँग्रेस सोबत युतीसाठी तयारी
आम्ही मुंबईच्या पातळीवर एक पर्याय उभा करत आहोत.काँग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार आहोत.
आम्ही त्यांना सतत म्हटलं होत की, तुम्ही ज्या जागा सतत हरत आला आहात त्या हरलेल्या जागा आम्हाला द्या अशी मागणी केली आहे. मात्र काँग्रेसच्या मनात भीती आहे की हरलेल्या जागा हे जिंकतात त्यामुळे आपलं पुढं जाऊन काय होणार असा त्यांना प्रश्न सतावत आहे. त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत. म्हणूनच आम्हाला भाजपची बी टीम काँग्रेसने म्हटलं होतं.आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शिवसेना पक्षासोबत युती साठी वंचित अनुकूल
यावेळी एमयआयएम पक्ष युती मध्ये असणार का याप्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले “आम्ही धर्मवादी पद्धतीने राजकारण करावे असं आमचे अजिबात म्हणने नाही.आम्ही लोकसभेला युती केली होती मात्र तेव्हाही आम्ही दोघेही कॉँग्रेस सोबत युती करावी म्हणून आग्रही होतो.आजही आमची तीच भूमिका असून आम्ही पुढे जाऊन शिवसेने सोबत देखिल युती करण्यास तयार आहोत मात्र ते आमच्यासोबत युती करण्यास तयार आहेत का ?” हा प्रश्न आहे असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मांडले.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत तसेच राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय कंडारे, मुंबई अध्यक्ष अकबर अली खान, मुंबई युवा अध्यक्ष मुर्तुझा शेख, मुंबई युवा महासचिव सोहेल अन्सारी तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीगचे महाराष्ट्र महासचिव सी एच अब्दुल रहमान, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच प्रवक्ते अब्दुल रहमान, कॉल अब्दुल मुल्ला, खजिनदार डॉक्टर इब्राहीम कुट्टी हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
IMDb वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय 10 चित्रपटांमध्ये जयभीम ला स्थान
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 1, 2021 16: 33 PM
WebTitle – Vanchit Bahujan ready to form alliance with Shiv Sena in bmc election 2022
Savi संविधानाला वेशीवर टांगून ते पोट निवडणूक घेण्यात येत आहे मतदार यादी आधी प्रोग्राम पूर्ण होऊ न देता घाईघाईने पोटनिवडणूक ग्रामपंचायत घेण्यात येत आहेत तरी जर आधी अंतिम मतदार यादी तयार करून नंतर निवडणुका घेण्यात याव्यात ही विनंती