जातीयवाद हा भारतीय समाजाचा एक अतिशय लज्जास्पद आणि घृणास्पद अवगुण राहिला आहे.याच महिन्यात दहा दिवसांनी 15 ऑगस्ट या दिवशी आपण भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.आपण एका स्वतंत्र देशातील नागरिक म्हणून किती जबाबदार आणि आदर्शवत आहोत? याचं उत्तर काल ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर कपडे काढून जो हैदोस घालण्यात आला त्यातून मिळू शकेल.
खरंच आपण या स्वातंत्र्यासाठी लायक आहोत का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने निदान ७५ वर्षे साजरी करत असताना विचारला पाहिजे.आजही आपल्या मनातून आणि मेंदूतून जातियवादी कीड नष्ट होत नाही.याचा अनुभव नुकताच भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधार ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांना आला आहे.
घरबाहेर फटाके फोडत जातिवाचक शिवीगाळ
टोकियो ऑलिम्पिकमध्ये, संपूर्ण देश उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असताना, संघाच्या पराभवानंतर हरिद्वारमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडत होती.रोशनबादमध्ये संघाच्या कर्णधार असणाऱ्या वंदना कटारिया यांच्या घराबाहेर काही लोकांनी फटाके फोडल्याचा आणि वंदनाच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.संघात खूप दलित खेळाडू असल्यामुळे संघ हरला असेही या जातीयवादी गुंडांनी म्हटल्याचे वंदनाच्या कुटुंबाने टाईम्स ऑफ इंडिया शी बोलताना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.
हे जातीयवादी गुंड एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी नंतर कपडे काढून घरासमोर नाच सुरू केला.
या घटनेबाबत आम्ही एकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया यांची कारकीर्द
वंदना कटारिया ही भारताची पहिली महिलाहॉकी खेळाडू आहे जीने या स्पर्धेत हॅटट्रिक केली आहे.
भारताच्या महिला हॉकी संघाने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक नंतर प्रथमच टोकियो २०२० ऑलिम्पिक मध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
वंदना कटारियाला हॉकीपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे नव्हते.उत्तराखंडच्या रोशनाबाद गावात ती मोठी झाली.तीने तीचं हॉकीपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करावं असं तिच्या शेजाऱ्यांना देखिल वाटत नव्हत. तिच्या आजीचीही इच्छा होती की तीने घरकामात मदत करावी.
परंतु,तीचे वडील नाहर सिंह कटारिया जे की स्वत: एक कुस्तीपटू होते,ते पुढे आले आणि त्यांनी वंदनाला पाठिंबा दिला.तीला या खेळात पुढे नेण्यास मदत केली.
वंदना कटारियाने अर्जेंटीनाची सुपरस्टार (Luciana Amyar ) लुसियाना आयमार कडून तिच्या उत्कृष्ट कौशलयांसाठी आणि क्षमतेसाठी प्रेरणा घेतली.
भारताला कांस्य आणि रौप्य पदक मिळवून दिले
वंदना कटारिया च्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम फेरीत चीनला २-१ अशा फरकाने हरवून २०१६ ची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तिच्या प्रभावी कामगिरीसाठी तीला राष्ट्रीय संघाचे कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले.
२०१३ च्या महिला हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक मिळवलेल्या राष्ट्रीय संघात तिचा सहभाग होता.
या स्पर्धेत ५ गोलसह भारतासाठी सर्वोच्च गोल करणारी खेळाडू म्हणून ती उदयास आली.
२०१४ मध्ये,वंदना कटारिया ने भारतीय संघाला ११ गोल पूर्ण करून २०१४-१५ FIH हॉकी वर्ल्ड लीग जिंकण्यास मदत केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या आश्चर्यकारक कामगिरीसाठी तीला हॉकी इंडियाची सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.२०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१८ मध्ये तीने भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे.
देशासाठी पदक मिळविणाऱ्या खेळाडूस आपण जातीय मानसिकतेतून तीला
आणि तिच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास आणि आपमानजनक वागणूक देत कोणता आदर्श समोर ठेवतो आहोत?
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 05, 2021 14:51 PM
WebTitle – Goons throw casteist slurs at Olympic star Vandana Katariya’s family after team’s semis loss in Tokyo Olympic 2020