डॉ.जयंत नारळीकर :धर्मशास्त्र आणि विज्ञान मानवी जीवनावर एकाचवेळी प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या दोन गोष्टी. पण प्राचीन काळचा इतिहास तपासता कायम एकमेका विरोधी दंड थोपणारे दोन विचार. कधीकाळी जेव्हा धर्मसत्तेचे प्राबल्य होतं तेव्हा वैज्ञानिक व संशोधकाना कायम वेठीस धरले जाई.वैज्ञानिक विचार धर्मांधाना पेलवत नाहीत तर धर्मांदाची विचारधारा शास्त्रज्ञानां पचायला जड जाते.दोन्हीचा समतोल राखणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे.
विशेषत: भारता सारख्या प्राचीन परंपंरेचा पगडा असणाऱ्या लोकांना विज्ञानवादी दृष्टीकोण समजावून सांगणे तर अतिकठीणच जगभरातील धर्मसत्तेने अशा अनेक शास्त्रज्ञ, संशोधक व विचारवतांचे बळी घेतले आहेत.
भारतीय वैज्ञानिकांची परंपंरा तशी समृद्धच आहे पण याही परंपंरेला बहूतेकवेळा धार्मिकतेच्या चौकटीत बंदीस्त करण्यात आजही अनेकजण धन्यता मानतात.
अध्यात्म आणि खगोलशास्त्र यात एका गोष्टीचे कमालीचे साम्य आहे.
ते म्हणजे सर्वसामान्यांस समजण्यास दोन्हीही किचकटच.
खगोलशास्त्रापेक्षा आम्हाला फलज्योतिष्यात मात्र खूप रस असतो.वर्तमान कितीही चांगले वा वाईट असो आम्हाला वेध भविष्यकाळाचेच असतात.
खरं तर भूत आणि भविष्य याची उत्तम सांगड खगोलशास्त्रात आहे.
अध्यात्म किती तर्कसयंगत असते ते मला माहित नाही पण खगोलशास्त्राला तर्कशुद्ध विचार करावाच लागतो.
जगभरातील विविध धर्माच्या अध्यात्मात विश्वाच्या जन्माच्या कथा आहेत. खगोलशास्त्रातही आहेत फरक इतकाच की एकात जे काही सांगितले ते अंतीम मानले जाते तर दुसऱ्यात ते अंतीम कधीच नसते.
जगाभरातील खगोल शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनातुन विश्वाच्या उत्पत्तीचे सिद्धांत मांडले आहेत.
पैकी “विस्फोट विश्व” सिद्धांत जवळपास सर्व सुशिक्षितानां माहित असावा.
या सिद्धातां नुसार नवीन संशोधनानुसार आपले विश्व सुमारे १३.८ अब्ज वर्षे जुने आहे असे मानले जाते.
थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या मते विश्वाचा विस्तार वाढत आहे.
“विस्फोट विश्व” च्या सिद्धातांतील त्रुटी ज्या दोन महान गुरूशिष्य शास्त्रज्ञांनी तो मांडला त्यातील गुरू शास्त्रज्ञ म्हणजे सर फ्रेड हॉएल तर शिष्य शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. जयंत नारळीकर या दोघांनी जो सिद्धांत मांडला तो “ ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ ” या नावाने ओळखला जातो.
या सिद्धातासंनुसार विश्व ना प्रसरण पावते ना आकुचंन. या विश्वाला ना आदी आहे आहे ना अंत. विश्वाचा मूलाधार फक्त गुरूत्वाकर्षण हाच आहे. महान शास्त्रज्ञ स्टिफन् हॉकिंग आणि नारळीकर हे दोघेही केब्रींज विद्यापिठात एकाच वेळी शिकत होते.केब्रिंज विद्यापिठाद्वारे दर वर्षी दिला जाणारा गणितातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार ‘ऍडम पुरस्कार’ सन १९६६ मध्ये रॉजर पेनरोज आणि स्टिफन हॉकिंग यांच्या सोबत विभागुन डॉ. नारळीकरानांही मिळाला आहे.
डॉ. जयंत नारळीकर हे नुसतेच शास्त्रज्ञ नाहीत तर ते एक उत्तम लेखक आहेत आणि ही बाब किमान माझ्या सारख्या लाखो वाचकांसाठी खूप मोलाची आहे. विज्ञान अधिक सोपे करून समजून देण्यासाठी शास्त्रज्ञाची लेखणीही सामर्थवान असावी लागते.डॉ. नारळीकरांनी मराठीतुन सहजसोप्या भाषेत विज्ञान कथा आणल्या व वाचकप्रिय केल्या.
डॉ. नारळीकरानां मुले जेव्हा ऑटोग्राफची मागणी करत तेव्हा ते म्हणत की
“तुम्ही मला एक प्रश्न विचारा मी त्याचे उत्तर देईन आणि शेवटी सही करेन”
त्यांच्या या कृतीमुळे हजारो मुलांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली.
डॉ.जयंत नारळीकर या शास्त्रज्ञाचे मला भावलेले हे सर्वात सुंदर आणि लोभस रूप आहे.
ज्यानां प्रश्नच पडत नाहीत ते विचारच करू शकत नाहीत असे मला मना पासून वाटते.
सर्वाधिक प्रश्न शास्त्रज्ञ, संशोधक व विचारवंताना पडतात म्हणूनच ते सतत उत्तरे शोधू लागतात.
आणि या उत्तरातुनच आमचे जीवन समृद्ध होत जाते.त्यांच्या वैज्ञानिक संशोधना बद्दल मी सामान्य काय सांगणार?
त्यांच्या कर्तृत्वाची दखल जगाने घेतलेली आहेच.पण सद्य परिस्थितीत डॉ.जयंत नारळीकर सारख्या शास्त्रज्ञाची नितांत गरज आहे असे मला मना पासून वाटते.
भौतिक अर्थाने डॉ.जयंत नारळीकर यांनी वयाची ८३ वर्षे पार केली आहेत मात्र अशी व्यक्ती काळाच्या खूप पूढे असतात.आणि खगोलशास्त्रज्ञ तर टाईम ट्रॅव्हलर असतात.त्यानां निरोगी दीर्घायुष्य लाभो.
लेखन – दासू भगत
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 20 , 2021 16:30 PM
WebTitle – Dr. Jayant Narlikar 2021-07-20