महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टाप्लस व्हेरिअंटची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत, त्यांच्यापैकी एकालाही कोरोना लस देण्यात आली नव्हती. तसेच यापैकी तीन रुग्ण असे आहेत, जे १८ वर्षांपेक्षाही कमी वयाचे आहेत.त्यामुळे त्यांना लस देण्याचा सरकारी निकष नव्हता.त्यामुळे लस घेण्यास ते पात्र ठरले नाहीत.
त्यादिवशी (24-06-2021) सर्व प्रसार माध्यमात नरेंद्र मोदींची जाहिरात देण्यात आली.विक्रमी लसीकरण असा दावा करण्यात आला. तसेच मागील सरकारच्या काळातील लसीकरणाची तद्दन चुकीची अन दिशाभूल करणारी तुलना करण्यात आली.हा मोदी यांना क्रेडिट देण्याचा दावा दुसऱ्याच दिवशी सोशल मिडियातून उघड करण्यात आला. त्यातला फोलपणा समोर आला.
तर आणखी एक धक्कादायक माहिती अशी समोर आलीय की भाजपा सरकार जनतेसमोर एक दावा करत आहे आणि न्यायालयात मात्र वेगळीच माहिती देत आहे. दैनिक लोकमतच्या वृत्तानुसार तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेला डेल्टा व्हेरिएंट म्युटेट झाला आहे.अशा परिस्थितीत कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण अभियानाला गती देण्याची आवश्यकता असताना मोदी सरकारनं अचानक यू-टर्न घेतला आहे.
मे महिन्यात देशात कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती. त्यावेळी देशात लसींचा तुटवडा होता. ३१ डिसेंबरपर्यंत देशाला २१६ कोटींहून अधिक डोस मिळतील असा दावा त्यावेळी सरकारकडून करण्यात आला होता.आता मात्र मोदी सरकारनं स्वत:चा शब्द फिरवला आहे.डिसेंबरपर्यंत देशाला १३५ कोटी डोस मिळतील अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात सरकारनं शपथपत्रातून दिली आहे.
याचा अर्थ केंद्रानं या वर्षाच्या अखेरपर्यंत मिळणाऱ्या डोसची संख्या ८१ कोटींनी कमी केली आहे.
याचा नरेंद्र मोदी जनतेसमोर एक दावा करतात आणि न्यायालयात मात्र वेगळी माहिती देतात
आणि जाहिराती करून स्वत:ची प्रतिमा उजळून घेतात.वास्तवात हे सगळं खोटं असतं.
१८ वर्षांपेक्षाही कमी वयाच्या लोकांना डेल्टाप्लस ची लागण झाल्याने सरकारच्या लसीकरण धोरणाबद्दल आणि त्याच्या कार्यक्रमाबद्दल आता प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर सरकसकट लसीकरण केले असते तर १८ वर्षांपेक्षाही कमी वयाचे लोक यात बळी पडले नसते.
यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बेजबाबदार धोरण कारणीभूत नाही का?
Covovax : अठरा आणि त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी वॅक्सिनची पहिली बॅच सज्ज
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 27 , 2021 11: 10 AM
WebTitle – U-turn of government in court; Danger of Deltaplus, people’s lives in danger due to irresponsible Modi 2021-06-27