हिंदू कोड बिल
हिंदू कोड बिल नेमके आहे तरी काय? आज पासून च्या पुढच्या पोस्ट मध्ये आपल्याला माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे.स्त्रियांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हिंदू कोड बिलाचे वेगवेगळे भाग करून कायदे करण्यात आले ते खालील प्रमाणे आहेत.
१) सती प्रतिबंधक कायदा १८२६
२) हिंदू विधवा पुनर्विवाह उत्तेजनार्थ कायदा १८५६
३) धर्मांतर केलेल्या लोकांचा पूर्वीचा विवाह रद्द करणारा कायदा १८६६
४) भारतीय तलाक कायदा १८६६
५) ख्रिश्चन विवाह कायदा १८७२
६) विवाहित महिला संपत्ती संरक्षक कायदा १८७४
७) लेगल प्रॅक्टिशनर ( वुमन्स) कायदा १९२३
८) बालिका विवाह प्रतिबंधक (शारदा) कायदा १९२६
९) हिंदू उत्तराधिकार अधिनियम (संशोधित) कायदा १९२६
१०) पारसी विवाह आणि तलाक कायदा १९३६
११) हिंदू महिला संपत्ती अधिकार कायदा १९३७
१२) प्रसूती अवस्थेत मिळावयाचे हक्क यासंबंधीचा कायदा १९४३
१३) हिंदू विजोड विवाह प्रतिबंधक कायदा १९४६
१४) हिंदू विवाह वैधता कायदा १९४६
१५) विशेष विवाह कायदा १९५५
१६) हिंदू विवाह कायदा १९५५
१७) हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६
१८) हिंदू दत्तक ग्रहण आणि निर्वाह कायदा १९५६
१९) हिंदू दत्तक ग्रहण कायदा १९५८
२०) वेश्यावृत्ती उन्मूलन कायदा १९५८
वरील वरील सर्व कायदे हे बाबासाहेबांनी संहिती करण करून हिंदू कोड बिलामध्ये समाविष्ट केले होते.त्यावेळी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेत मांडले त्यावेळेला हे सर्व कायदे जसेच्या तसे स्वीकारण्यात आले नाहीत. नंतरच्या काळात संसदेत घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे यामध्ये बाबासाहेबांच्या पश्चात हिंदू कोड बिलामध्ये घटना दुरुस्ती करून समाविष्ट केले आहेत. वरील सर्व कायदे व त्यांच्या संकल्पना त्यामध्ये केलेले संहितीकरण हे खुद्द बाबासाहेबांनी केलेले आहे. त्यामध्ये असणारी कलमे ,उपकलमे ही बाबासाहेबांची आहेत.
बाबासाहेबांच्या पश्चात झालेले कायदे हे बाबासाहेबांच्या संकल्पनेतूनच आलेले आहेत
तसेच या सर्व कलमांची उत्पत्ती आणि त्यामागचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांच्या पश्चात झालेले कायदे हे बाबासाहेबांच्या संकल्पनेतूनच आलेले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतीय राज्यघटनेत एखाद्या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर घटना दुरुस्ती विधेयक असते, त्याद्वारे घटनेच्या मूळ कायद्यामध्ये विविध कलमे समाविष्ट करून तो कायदा अधिक प्रभावशाली बनवता येतो याचीही तरतूद बाबासाहेबांनी संविधानात केली आहे. त्याद्वारेच हिंदू कोड बिलाचे कायदे वेळोवेळी बदलले गेले आहेत हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
वरील दिलेल्या कायद्यांच्या समोर त्या कायद्यांचे साल लिहिले आहे ते वर्ष म्हणजे भारत पारतंत्र्यात असताना तत्कालीन कायदे मंडळाने (काही कायदे) पारित केलेले कायदे आहेत. ब्रिटिश काळातील कायद्यामध्ये बाबासाहेबांनी संशोधन करून ब्रिटिश काळातील कायद्यामध्ये बदल केले आहेत. या कायद्यामध्ये सर्वसमावेशक येण्यासाठी ते बदल आवश्यक होते.आणि त्या बदलास सहित हिंदू कोड बिल संसदेत मंजूर व्हावे यासाठी बाबासाहेब झटत होते हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्वातंत्र्यापूर्वीच्या कायद्याचे संहितीकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.त्यामध्ये आवश्यक ते बदल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहेत.
हिंदू कोड बिलाचे सुरुवातीचे ठराव
१) हिंदू कोड बिलाची व्याप्ती आणि सुरुवात
या कायद्याला हिंदू कायदा (हिंदू कोड) असे म्हणावे. हा कायदा भारतातील सर्व घटक राज्यांना लागू आहे.१९४९ जानेवारी च्या पहिल्या तारखेपासून हा कायदा लागू होईल.
२) कायदा लागू करणे
हा कायदा भारतातील सर्व घटक राज्यांना लागू होतो. सर्व हिंदूंना त्यामध्ये वीरशैव, लिंगायत, ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज हे घटक धरून हिंदू धर्माच्या पद्धतीमध्ये आणि हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांना हा कायदा लागू आहे.त्यामध्ये धर्माने बौद्ध, जैन, शीख यांनाही हा कायदा लागू आहे. ज्याचे आई-बाबांपैकी एक हिंदू आहे, त्या अनौरस किंवा औरस अशा कोणत्याही मुलास यात अट अशी की, असे मूल ज्यात असे आईबाप हिंदू असतात अगर होते अशा कुटुंब, समुदाय किंवा जमातीचे सभासद ज्यांना हिंदूप्रमाणे वाढवले आहे किंवा हिंदू धर्मात धर्मांतर करून आलेल्या सर्वांना हा कायदा लागू आहे.
हा कायदा जो धर्माने मुसलमान ख्रिस्ती पारशी किंवा ज्यू नाही अशा कोणत्याही व्यक्तीला हा कायदा लागू होतो.
सांगण्याचे तात्पर्य असे आहे की जे लोक हिंदू धर्म मानतात, जे लोक हिंदू आहेत, ज्या लोकांना हिंदू धर्म स्वीकारला आहे, ज्या लोकांचे आईबाप त्यांच्यापैकी एखादा जरी हिंदू असेल आणि ती व्यक्ती हिंदू धर्म मानत असेल अशा सर्वांना हा कायदा लागू होईल.हा कायदा जो धर्माने मुसलमान ख्रिस्ती पारशी किंवा ज्यू नाही अशा कोणत्याही व्यक्तीला हा कायदा लागू होतो.
भारताच्या कोणत्याही भागात हिंदू शब्दाचा अर्थ जणू काय घरी धर्माने हिंदू नाही तरी पण या कायद्याच्या तरतुदींनी नियंत्रीत केलेला आहे. ज्या लोकांना कोणताही धर्म नाही,कोणतेही जात नाही अशा लोकांचा समावेश हिंदू कोड बिलामध्ये केलेला आहे.असे लोक जे धर्म मानत नाहीत किंवा जात मानत नाहीत,अशा लोकांच्या विवाहविषयक आणि संपत्ती विषयक आणि महिला अधिकार विषयक बाबींमध्ये हिंदू कोड बिलाचे अंतर्गत येणारे कायदे त्या लोकांना लागू होतील अशा प्रकारचे अंतर्भाव या कायद्यात केलेले आहेत.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
2. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
3 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
4 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
5 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
6 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
7 हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 8
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 9
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 09 , 2021 07 : 00 AM
WebTitle – hindu code bill law dr b r ambedkar 2021-04-09