मुंबई- आज लॉक डाउनचं वर्ष श्राद्ध,आजच्या दिवशी संपूर्ण देशातील रस्ते थांबले.देशभरात अचानक लागू केलेल्या लॉक डाउनमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं,अनेकजण जीवाला मुकले.काही लोकांचा मृत्यू शेकडो मैल पायी चालत झाल्याने तर काहींचा अपघाताने झाला. देशभरातले छपाई व्यावसायिक लाॅकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘काळा दिवस’ पाळत आहेत.
इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.मिडिया रिपोर्ट्स नुसार कोरोनाचा कहर डिसेंबरच्या उत्तरार्धात जगभरात दिसू लागला.तो जानेवारीत सर्वच देशात पसरला फेब्रुवारीत त्याने रौद्र रूप धारण केले.तोपर्यंत चीन मध्ये 1500 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.व्हायरस वेगाने पसरू लागल्यानंतर भारत सरकारने हुआन येथे असणाऱ्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय लोकसत्ताच्या बातमीनुसार जानेवारीतच घेतल्याचे दिसते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/positive-case-of-novel-coronavirus-patient-kerala-china-wuhan-university-sgy-87-2072661/
अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषित केला
या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 24-25 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय फायदा पोहोचविण्यासाठी गुजरात मध्ये मोठा इव्हेंट घेण्यात आला.
तसेच 24 फेब्रुवारीला विधानसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची तारीख 25 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
त्यानंतर मात्र मार्च मध्ये तब्बल एक महिन्यानंतर अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषित केला.
हा लॉकडाउन लावताना कुणाशी चर्चा केली होती का? – याबाबतचा स्पेशल रिपोर्ट बीबीसीने तयार केला यात ही बाब स्पष्ट झाली आहे.
खालील प्रमाणे https://www.bbc.com/marathi/india-56477315
सरकारी यंत्रणांनाच त्याची माहिती नसेल तर ते नागरिकांची मदत कशी करणार?
केंद्र सरकारचे महत्त्वाचे विभाग, विशेषतः सार्वजनिक आरोग्य आणि अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित मंत्रालय यापैकी बहुतांश विभागांनी देशव्यापी लॉकडाऊन लागू होण्याआधी यासंबंधी पुरेशी माहिती नव्हती किंवा याविषयी संपर्कच करण्यात आला नव्हता, असं ऑन रेकॉर्ड मान्य केलं आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या ‘कोव्हिड-19 गव्हर्नमेंट रिस्पाँस ट्रॅकरने’ ज्याला जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन म्हटलं कारण असं की कठोर लॉकडाऊनमुळे ज्या घटकांवर परिणाम होणार होता, त्या घटकांची जबाबदारी असणाऱ्या सरकारी यंत्रणांनाच त्याची माहिती नसेल तर ते नागरिकांची मदत कशी करणार?
अचानक केलेल्या या लॉकडाऊन मुळे त्यानंतरच्या तिमाहीत भारताचा जीडीपी 24 टक्क्यांनी घसरला.
काळा दिवस
लॉकडाउनच्या आधी छपाईसाठी घेतलेली कामे लॉकडाउन घोषित झाल्याने रखडली होती.त्यानंतर या क्षेत्रात मंदीचे सावट आले.यागोष्टी एकीकडे दुसरीकडे केंद्र सरकारचं चुकीचं आयात निर्यात धोरण, छपाई व्यवसायाच्या नियमनाचा अभाव, सरकारं घेत असलेले आततायी निर्णय, कागद उत्पादकांची मनमानी भरमसाठ दरवाढ आणि कोविड संकटकाळातली मंदी याकडे सरकारचं दुर्लक्ष, यामुळे छपाई व्यावसायिक हवालदील झाले असून त्याचा परिणाम व्यावसायिक कामगार अशा सर्वांच्याच आयुष्यावर झाल्याने सरकारचं लक्ष आपल्यावरील संकटाकडे वेधून घेण्यासाठी आज देशभरातले छपाई व्यावसायिक लाॅकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘काळा दिवस’ पाळत आहेत.
खाजगी व्यावसायिक मनमानी पद्धतीने किमती वाढवत आहेत
या पार्श्वभूमीवर आमच्या टीमने काही व्यावसायिक लोकांशी थेट संवाद साधला असता याचे गांभीर्य लक्षात आले.भारतातील बहुतांश प्रिंटिंग प्रेस बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत अशी चिंता शैलेन्द्र पोपळे (अध्यक्ष डोंबिवली शहर मुद्रक संघ) यांनी व्यक्त केली.आणि यामागे सरकारचे डिजिटलायझेशन धोरण जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.विशेष म्हणजे एकीकडे सगळीकडे खाजगीकरण जोरात सुरू असताना खाजगी व्यवसाय करणारे अनुभवी लोक मात्र पेपर इंडस्ट्री व्यवसायात सरकारचा हस्तक्षेप असावा नियंत्रण असावे नियमन समिती असावी असे म्हणताना दिसतात.कारण असल्याचे शैलेन्द्र पोपळे म्हणतात.
देशभरात अडीच लाख प्रिंटिंग प्रेस असून जवळपास सव्वा तीन ते चार कोटी कामगार वर्ग आहे
या सगळ्यांवर परिणाम झालेला आहे.असं मत रमेश इनामदार ( सेक्रेटरी- डोंबिवली शहर मुद्रक संघ) यांनी व्यक्त केले.
हा विषय फक्त प्रिंटिंग प्रेस मालकांशी निगडीत नसून त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचा सुद्धा आहे.
त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका करोडो लोकाना बसताना दिसतो आहे.असे एकूण चित्र यातून समोर येत आहे.
- टीम जागल्या भारत आणि टीम मिडिया भारत
हे ही वाचा.. आक्रसलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न अपुरे
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 22, 2021 14 :19 PM
WebTitle – Why do printing professionals observe “black days”?