काही दिवसांपूर्वीच मुंबई मधिल प्रसिद्ध ‘कराची बेकरी’ बंद करण्यात येत असल्याच्या बातम्या माध्यमातून आल्या.‘मनसेच्या मागणीमुळे कराची बेकरी’ बंद झाली असा दावा मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी ट्वीट करून केला होता.मुंबईतून कराची बेकरीने आपला गाशा गुंडाळल्याचं देखील सांगितलं जात होतं. यावरून सोशल मिडियात सुद्धा उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या,काहींनी याचे समर्थन केले होते,तर काहींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.पण आताच्या माहितीनुसार कराची बेकरी मुंबईतून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘वांद्रे येथील ज्या जागेत कराची बेकरी सुरू होती, त्या जागेचा भाडेकरार संपल्यामुळेच आम्ही तिथलं आऊटलेट बंद केलं असून आता आम्ही दुसऱ्या जागेच्या शोधात आहोत. कोरोनाच्या काळात व्यवसाय घटल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे.आम्हाला नविन जागा मिळताच आम्ही बेकरी पुन्हा सुरू करू’, असं स्पष्टीकरण कराची बेकरीचे मालक राजेश रामनानी यांनी द प्रिंटशी बोलताना दिलं आहे. रामनानी हैदराबादमध्ये राहात असून त्यांनी ‘आमच्या ब्रँडचं नाव बदलण्याचा कधीही विचार करणार नाही’, असं देखील स्पष्ट केलं आहे.
मनसेने स्टोअर बंद केल्याचा केला होता दावा
बेकरी बंद झाल्यानंतर मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी ट्वीट करून “मनसेनं कराची बेकरीचं नाव बदलण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर अखेर बेकरीनं मुंबईतलं आपलं दुकान बंद केलं आहे”, असं म्हटलं होतं.
मनसेने अधिकृतपणे मात्र ही आमची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले
मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांच्या ट्विट खालीच रीप्लाय मध्ये मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे चे अधिकृत ट्विटर हँडल यावरून ही मनसेची भूमिका नसल्याचे ट्विट केले गेले.
ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत भूमिका नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. This is not at all an official stand of Maharashtra Navnirman Sena. So all the Twitterati kindly take a note of this.असे ट्विट करण्यात आले.
मुंबई कराची बेकरी चा इतिहास
फाळणी नंतर भारतात स्थलांतरित झालेल्या खानचंद रामनानी यांनी १९५३ मध्ये हैद्राबाद येथे कराची बेकरीची प्रथम स्थापना केली होती.त्यानंतर कराची बेकरीच्या देशभरात २० शाखा सुरू झाल्या.दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद या ५ शहरांमध्ये त्या विभागल्या आहेत. आता खानचंद रामनानी यांचे नातू आणि पणतू हा व्यवसाय सांभाळत आहेत.कराची हे ब्रॅंड नेम एका भारतीय माणसाने भारतीय कायद्याद्वारे स्थापित केले आहे.असेही रामनानी यांनी स्पष्ट केले आहे.
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 06, 2021 19:42 PM
WebTitle – karachi bakery not leaving mumbai not change name owner rajesh ramnani