मध्यप्रेदश – भोपाळ च्या (Bhopal) भाजप खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (MP Pragya Singh Thakur) यांची प्रकृती शनिवारी अचानक खालावली.त्यांना स्टेट प्लेनने उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांना मुंबईला हलविण्यात आले. (After complained of problem in breathing Bhopal MP Pragya Singh Thakur taken to mumbai)
गेल्या महिन्यातही प्रज्ञा सींह यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळीही त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्याने बैठकांवर बैठका घेत होत्या. त्यांना आजही दिशा समितीच्या जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका बैठकीत सहभागी व्हायचे होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली.
वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध
प्रज्ञा सिंह ठाकूर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात प्रसिद्ध आहेत, ‘हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला.’ असं आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या हौतात्म्याचा अपमान केला होता.
“ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं. कारण काय आहे, तर समजत नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य करत प्रज्ञा सींह ठाकूर ने वर्णव्यवस्थेचे समर्थन करण्याची चेष्टा केली होती.
Kshatriya ko kshatriya keh do, bura nahi lagta. Brahmin ko brahmin keh do, bura nahi laga. Vaishya ko vaishya keh do, bura nahi lagta. Shudra ko shudra keh do, bura lag jata hai. Kaaran kya hai?
कोण आहे भाजप खासदार प्रज्ञा सिंग?
संपूर्ण नाव – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
मूळ गाव – मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कछवाडा,रा. स्व. संघाच्या संपर्कात आल्यानंतर तिने संन्यास घेतला. अभिनव भारत संघटनेची सदस्य. मालेगाव बॉम्बस्फोटात ती आरोपी होती. स्फोटाच्या ठिकाणी तिची बाईक सापडली होती. त्यानंतर तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली एनआएने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये प्रज्ञा सिंहला दोषमुक्त ठरवण्यात आलं होतं. तिच्यावरील मोक्का हटवण्यात आला आणि प्रज्ञा ठाकूरवर करकरे यांनी केलेली कारवाई सुसंगत नव्हती, असं सांगण्यात आलं.संघ प्रचारक आणि समझोता एक्स्प्रेस स्फोटातील आरोपी सुनिल जोशी हत्याप्रकरणातही साध्वी प्रज्ञाचं नाव होतं. पण 2017 मध्ये मध्य प्रदेशातल्या देवास कोर्टाने प्रज्ञाला सुनील जोशी हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केलं होतं.जामिनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंग ला भाजपने पक्षात सामील करून घेत तिकीट दिले आणि सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत साध्वी प्रज्ञा ठाकूरने कॉँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचा पराभव केला.
टीम जागल्या भारत
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 06, 2021 18 :42 PM
WebTitle – mp pragya singh thakur taken to mumbai kokilaben hospital due to caused breathing problem