पत्रकार व लेखक मार्क टुली
विल्यम “मार्क” टुली, त्यांचा जन्म १९३६ मध्ये कलकत्ता येथे झाला ,त्यांचे वडील श्रीमंत इंग्रजी लेखापाल होते आपल्या बालपणाची पहिली दहा वर्षे त्यांनी भारतात घालवली ,त्यानंतर ते शालेय शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांचे शिक्षण ट्यफोर्ड स्कूल, मार्लबरो कॉलेज आणि ट्रिनिटी हॉल, केंब्रिज येथे झाले. केंब्रिजनंतर त्यांनी चर्च ऑफ इंग्लंडमध्ये पास्टर होण्याचा विचार केला परंतु लिंकन थिओलॉजिकल कॉलेजमध्ये केवळ दोन सत्रानंतर ती कल्पना सोडून दिली. ते भारत बीबीसी येथे नवी दिल्ली ब्युरोचे माजी अध्यक्ष आहेत. जुलै १९९४ पर्यत राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी बीबीसीमध्ये ३० वर्षे काम केले. व बीबीसीच्या दिल्ली ब्युरोमध्ये २० वर्षे काम केले. नंतर ते स्वतंत्र दिल्ली येथे स्वतंत्र पत्रकार आणि ब्रॉडकास्टर म्हणून काम करत आहेत.
ऑपरेशन ब्लू स्टार
मार्क टुली १९६४ मध्ये बीबीसीमध्ये सामील झाले आणि १९६५ मध्ये ते भारतीय वार्ताहर म्हणून काम करण्यासाठी आले
आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष, भोपाळ गॅस यासह दक्षिण आशियातील सर्व प्रमुख घटनांचा समावेश केला.
ऑपरेशन ब्लू स्टार (त्यानंतर इंदिरा गांधींची हत्या आणि शीखविरोधी दंगे), राजीव गांधी यांची हत्या
आणि बाबरी मशीद विध्वंस.इत्यादी घटनांचे अगदी जवळून वार्ताकंन केले.
१९८५मध्ये टुली यांना ‘ऑफिसर ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ पुरस्कार,
१९९२ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.२००५मध्ये पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले..
जिकडे तिकडे फक्त वांझोटा आरडाओरडा
मार्क टुली यांनी स्लो मोशन (गिलियन राईट यांचे सह-लेखक), नो फुल स्टॉप्स इन इंडिया,
द हार्ट ऑफ इंडिया, डिव्हिड अँड क्वाइट, लास्ट चिल्ड्रन ऑफ द राज, राज ते राजीव- ही पुस्तके भारतावर आधारित लिहीली आहेत.
भारताविषयी लिहीतांना मार्क टुली अत्यंत मार्मिक भाष्य करतात परिस्थितीची सखोल समज
आणि अंतदृष्ठी या सामर्थाच्या बळावर ते विसंगती दाखवून देणारे लेखन करतात.
आताच्या पत्रकारितेच्या बद्दल ते मत व्यक्त करतांना म्हणतात चर्चा व युक्तिवाद हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी असतो आणि योग्य वाटल्यास तडजोडीलाही महत्त्व आहे, परंतु आज या बाबीचा विसर पडलेला दिसतो. आज जिकडे तिकडे फक्त वांझोटा आरडाओरडा दिसतो, तो धडपणे कुणाचीही बाजू ऐकून घेण्यासाठी नसतो. पत्रकारितेचा माझा व्यावसायही गैरकृत्य करणार्या काही वाईट व्यावसायापैकीच एक आहे. दृक-श्राव्य वाहीन्यावरचे निर्माते त्याच्यां कार्यक्रमामध्ये मुद्दाम झुंज ठेवतात.त्यात भाग घ्यायला अशी माणसं निवडतात,ज्यांचे कधीच कुठल्याच बाबतीत एकमत होणे शक्य नाही.
आरोप -प्रत्यारोपांची दंगल
यातले सुत्रधार पंचांसारखे वागण्याऐवजी आग भडकण्यावर भर देतात,या कार्यक्रमाचे निर्माते या वांझोट्या वादविवांदाच्या आयोजनाबद्दल स्पष्टीकरण देताना सांगतात की ,त्यांना दोन्ही बाजूचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संतुलन साधायचे असते पण तो सगळा गोंगाट एवढा प्रचंड असतो, की कुणाचेही काहीही एकू जाणे शक्य नसते.
ते आणखी पुढे म्हणतात की, भारताच्या सार्वजनिक जीवनात जेव्हा जेव्हा धर्माचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा तर गोंगाट एवढा शिगेला पोहोचतो, की कसला युक्तीवाद अन् कसली चर्चा आरोप -प्रत्यारोपांची दंगल सुरू होते. एवढे मात्र निश्चित, की भाजपचे हिंदुत्व आणि काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव यांच्यात समझोता व्हावा, असे हे क्षेत्र आहे, नेहंरुच्या मनात या बाबत पुरेशी स्पष्टता होती, की अशी दोन टोके गाठण्याऐवजी दोन्हीमध्ये सुवर्णमध्य साधण्याची संधी होती.तिच्यामुळे सर्वधर्मसमभावाच्या मार्गाने प्रत्येकाच्या धर्माला आदराने वागवले गेले असते ते म्हणाले होते “आपण जेव्हा सर्वधर्मसमभाव असलेल्या राज्याबद्दल बोलतो, तेव्हा ती कल्पना नकारात्मक नसते, उलट प्रत्येक जाती -धर्माच्या स्त्री -पुरुषाला समानतेची संधी देण्याचा तो एक सकारात्मक मार्ग असतो.
गरिबांतल्या गरिबाचा फायदा
आपली सुरक्षितता व समृध्दी ही रोगांविरुध्द लढा ,चांगल्या विज्ञानाचा पुरस्कार आणि शिक्षणाच्या प्रसाराबाबत सामूहिक प्रयत्नावरच अवलंबून असते. त्या साठीच पायाभूत सुविधा उपलब्ध करून ,सुसंवाद साधत गरिबांतल्या गरिबाचा फायदा करून देण्यातच आपले सामूहिक हित असते. भारताला जर का आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर व्यक्ती आणि समष्टीचा संतुलितपणे विचार करूनच निरोगी वाढ साधता येईल आणि त्यासाठी तडजोड आवश्यक ठरते व शाब्दिक व शारीरिक हिंसा आणि विरोधाच्या या काळात संवाद या आशेच्या किरणाचीच तर खूप गरज आहे.असं प्रतिपादन पत्रकार लेखक मार्क टुली यांनी केले आहे.
हेही वाचा .. मी न्यायालयात जाणार नाही,तिथे न्याय मिळत नाही – माजी न्यायाधिशांचे धक्कादायक वक्तव्य
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)