प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या शब्दांवर विश्वास का ठेवता येत नाही?
2014 मध्ये सत्तेवर येताच RSS ने गॕसवर सबसिडी दिल्याचे आठवते का ?
आता सबसीडी कुठे गेली ?
(गरिबांसाठी सबसिडी सोडा असं अपील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या यूट्यूब व्हिडिओ मध्ये करताना दिसतात.मात्र आता कुणालाच सबसिडी मिळत नाही.)
वाहनचालक मन मानेल तसे भाडे
BSNL ला संपवण्यासाठी JIO वर कॉलींग आणि नेट फ्री दिले होते हे पण आठवण्याचा प्रयत्न करा.आज BSNL संपल्यानंतर JIO ची मनमानी चालू झाली आहे हे लक्षात घ्या.S.T. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी एखाद्या दिवशी संप पुकारला किंवा एखाद्या मार्गावर बसेस धावणे काही दिवसांसाठी बंद झाले तर त्या मार्गावरील खाजगी वाहतूक करणारे वाहनचालक मन मानेल तसे भाडे कसे आकारतात ? हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही.
मार्केट कमिट्या संपवण्यासाठी सुरुवातीला वर्षे – दोन वर्षे कमिटी पेक्षा जास्त भाव शेतकऱ्यांना अंबानी / अदानी देईलही मात्र एकदा कृषी उत्पन्न बाजार समिती संपताच कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या मालाला दिला जाईल तेव्हा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.आणि कमिट्या संपल्यानंतर अंबानी / अदानी चे धान्य न परवडणार्या दरात ग्राहकांना दिले जाईल तेव्हा सामान्य माणसाने काय करायचे ?
खाजगीकरणाचे आय.टी.सेल आणि मूर्ख भक्तांच्या माध्यमातून उदात्तीकरण चालू आहे.
BSNLआणि ST चे उदाहरण जाणीवपूर्वक दिलेले आहे.लॉकडाऊन मध्ये बंद केलेल्या सर्व सेवा पुर्ववत झाल्यात अपवाद फक्त भारतीय रेल ..रेल्वे चालू न करण्याचे कारण म्हणजे उद्योगपतींना ज्या ट्रेन विकलेल्या आहेत त्या विना अडथळा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी इतर सर्व लाखो ट्रेन चे टायमिंग अॕडजस्ट करण्याची जबाबदारी IIT पवई (मुंबई)) यांच्या कडे दिलेली आहे आणि त्यासाठी आय.आय. टीयन जंग जंग पछाडत आहेत.
यातून भविष्यात उद्योगपतींच्या ट्रेनसाठी इतर सर्व ट्रेन अनेक तासांपासून तर अनेक दिवसांच्या पर्यंत विलंबाने धावतील मग लोक खाजगी ट्रेन prefer करतील आणि आशियातील क्रमांक दोन चा नियोक्ता असलेल्या रेल्वेने त्यावेळी शेवटचा श्वास घेतलेला असेल.सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे घाऊक प्रमाणात खाजगीकरण या भाजपेयींनी चालू केले आहे आणि ते करत असलेल्या सर्व खाजगीकरणाचे आय.टी.सेल आणि मूर्ख भक्तांच्या माध्यमातून उदात्तीकरण चालू आहे.
छोटे व्यापारी आणि दुकानदार कायमचे संपलेत
देशाला भिकेला लावण्याची सुरुवात नोटाबंदी सारख्या शेखचिल्ली छाप निर्णयाने करुन
शेकडो नव्हे तर लाखो उद्योगधंदे बंद पाडले त्यावर अवलंबून असलेले करोडो लोक यानिमित्ताने बेरोजगार झाले
मात्र सरकारला याच्याशी काहीच सोयरेसुतक नाही.GST मध्ये साडे – तीनशे पेक्षा जास्त वेळा सुधारणा केल्यानंतर सुद्धा तो अजूनही व्यावहारिक पातळीवर यशस्वी होऊ शकलेला नाही त्यामूळे छोटे व्यापारी आणि दुकानदार कायमचे संपलेत. हे विसरुन कसे चालेल ?
अंबानी ची मर्जी संपादन करण्यासाठी
तरुणांच्या हातांना रोजगार द्यायचे सोडून , जे नोकरीत आहेत त्यांना सुद्धा घरी बसवण्याचा कार्यक्रम चालू आहे.जगभरात क्रुड आॕईल चे भाव निचांकी पातळीवर आहेत त्यामूळे अगदी 30 ते 35 रु.लिटर ने पेट्रोल आणि 25 ते 27 रु.नी डिझेल देणे शक्य असताना केवळ एका अंबानी ची मर्जी संपादन करण्यासाठी अव्वा च्या सव्वा इंधन वाढ लादलेली आहे आणि त्याच्याच मर्जीसाठी अद्यापही पेट्रोल /डिझेल GST च्या बाहेर आहे.मिडिया ला हाताशी धरुन अनेक षडयंत्रावर पडदा टाकण्याचे काम राजरोसपणे चालू आहे.
इतकं सगळं भवती – न – भवती होऊन देखील देश बरबाद होत नाही हे पाहून संघाने *माधव गोळवलकरच्या स्वप्नातील भारत* निर्माण करण्यासाठी म्हणजे संघ धार्जिण्या चार – दोन उद्योगपतींच्या हातात संपत्ती एकवटून आणि सामान्य लोकांना भुके – कंगाल करण्यासाठी शेवटचा हातोडा म्हणून शेती क्षेत्रावर कब्जा करण्यासाठी नवीन कायदा आणलेला आहे त्याला विरोध केला नाही तर तुमच्या शंभर पिढ्या गुलामी चं जीवन जगतील हे लिहून ठेवा.
लेखन – अनिल चव्हाण
हेही वाचा.. एमएसपी वा किमान आधारभूत मूल्य
.. ऊसतोड कामगार :प्रश्न की व्यथा ?
. सोपी गोष्ट : शेतकरी कायदा ; सहा प्रश्न
हेही वाचा..शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; झुकेरबर्ग झुकला,पेज सुरू