देव आनंद म्हणजे तरुणींचा लाडका चॉकलेट हिरो. असामान्य व्यक्तीमत्व, केसांची स्टाईल, आणी चेहऱ्यावरील सुंदर भाव याचे सर्वांगसुंदर मिश्रण म्हणजे देवआनंद .राज कपूर,दिलीपकुमार यांच्या सोबतच देवसाहेबांचे नाव आजही अदबीने घेतले जाते.देव यांचे सिनेमे रोमँटिक, हलकेफुलके असायचे. त्यांची संवादफेक, नृत्य करण्याची हटके स्टाईल खूप प्रसिद्ध असायची. हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक (मॅकेनाज गोल्ड या बहुचर्चित आणि अतिशय प्रसिद्ध सिनेमातील अभिनेता) यांच्यासोबत देव आनंद यांची तुलना केली जात असे.
पब्लिक प्लेसमध्ये काळा कोट आणि पांढरा शर्ट घालायची बंदी
देव यांना पब्लिक प्लेसमध्ये काळा कोट आणि पांढरा शर्ट घालायची बंदी घालण्यात आली होती, कारण घटनाच तशी होती.
देव यांना पाहून अनेक युवतींनी त्याकाळी आत्महत्या केल्या होत्या.
सर्वात महत्वाचे म्हणजे यांच्या सिनेमातील गाणी अफाट लोकप्रियता मिळवत असायची.त्यांच्या सिनेमाचे संगीतही खुप चालायचे.
जवळपास सहा शतके देव आनंद यांनी आपल्या अभिनयाने भारतीय चित्रपट सृष्टीला समृध्द बनवले.
अशा हरहुन्नरी कलाकाराबाबत आज आपण जाणून घेऊया.
त्यांचा जन्म पंजाबमधील गुरदासपुर येथे २३ सप्टेंबर १९२३ ला झाला. देव आनंद यांचे संपूर्ण नाव धर्मदेव पिशोरीमल आनंद असे होते. लाहोरमध्ये त्यांनी इंग्रजीतून पदवी घेतली आणि ते मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांच्याजवळ केवळ तीस रुपये होते.देव आणि गुरुदत्त यांची मैत्री घनिष्ट होती. देव आनंद यांचा पहिला चित्रपट १९४६ चा “हम एक है” जो भारत आणि पाकिस्तान देशातील बंधुभाव यावर आधारीत होता.
देवसाहब आणि सुरैय्या
देव यांनी अनेक अजरामर भूमिका केल्या. अनेक क्लासिक चित्रपट केले. देव आनंद यांनी अनेक हिरोईनसोबत काम केले. त्यामध्ये प्रामुख्याने नुतन, वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, सुरैय्या, झिनत अमान, हेमामालिनी, साधना यांच्यासोबत काम केले. सुरैय्या आणि देव यांचे “विद्या” नावाच्या चित्रपटात काम करताना प्रेम जुळले.एकमेकांवर अतोनात प्रेम करायचे देवसाहब आणि सुरैय्या. देव आनंद यांच्यावर संपूर्ण भारतातील तरुणी फिदा होत्या तर सुरैय्या त्याकाळातील खूप चर्चित अभिनेत्री होत्या.देव आणि सुरैय्या यांचे हे प्रेम सुरैय्या यांच्या घरच्यांना मान्य नव्हते. दोघांनीही घरच्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते विफल झाले.
कारकीर्द
आनंद साहेबांच्या भुमिका असलेले अनेक क्लासिक चित्रपट हिट झाले. त्यांचे गाईड, ज्वेलथीफ, तेरे घर के सामने, हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस, हरे राम -हरे कृष्ण असे अनेक चित्रपट आहेत. देव आनंद यांच्यावर चित्रित करण्यात आलेली अनेक सदाबहार गाणी आहेत ज्यामध्ये गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल,तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार कशी अनेक गाणी आजही मनाला भुरळ घालणारी आहेत.
आनंद यांना काला पत्थर आणि गाईड या चित्रपटातील भूमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला होता. प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कारहीआनंद यांना २००२ साली दिला होता. त्याचबरोबर इंडो-अमेरिकन स्टार आॅफ मिलेनियम हा पुरस्कार देण्यात आला होता. देव आनंद यांचा ३ डिसेंबर २०१२ रोजी मृत्यू झाला. सर्वांगसुंदर हिरो म्हणून त्यांची ख्याती जगभर आहे आणि ती तशीच राहील यात शंकाच नाही.
मागील पोस्ट सिरिज साठी खालील लिंकवर क्लिक करा
1 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने -1
2 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 2
3 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 3
4 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 4
5 भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने – 5
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 2