पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड ( Pune Market Yard Fire News ) भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीत शनिवारी (दि.13) दुपारी एका घराला आग लागली. गल्ली नं 11 मधील झोपडपट्टीमध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली.आग लागल्याची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली. या आगीत सहा झोपड्या जळून खाक झाल्या मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुण्यातील मार्केटयार्ड, आंबेडकर नगर झोपडपट्टीमधील गल्ली क्रमांक ११ येथे ही आग लागल्याची घडली आहे.
अग्निशमन दलाच्या ६ गाड्या आणि पाण्याचे ४ वॉटर टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी मारुन आग विझवली. प्राथमिक माहितीनुसार, एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका घराला आग लागली होती.या आगीत सहा झोपड्या जळून खाक झाल्या मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी यात एकजण किरकोळ जखमी झाला असून
या आगीत स्थानिक जनतेचे संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने 6 गरीब कुटुंबांचा संसार मात्र आता उघड्यावर पडला आहे.
पुण्यातील मार्केटयार्ड परिसर हा दाट वस्तीचा भाग असून गल्ली क्र. 11 मधील काही झोपड्यांना आज (शनिवार 13-01-2024) दुपारी चारच्या सुमारास आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.मार्केट यार्ड परिसरात आग लागण्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील तीन साधूंना जमावाने केली मारहाण, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 13,2024 | 19:32 PM
WebTitle – Pune Market Yard Fire News