पाणी की पानी ? न की ण, ष की श किंवा असे बरेच काही बरळणाऱ्यांसाठी देखील ही पोस्ट आहे!
‘ण’ की ‘न’ यावर केलेली चर्चा हे पेठी पुणेकर कदापि सहन करणार नाहीत कारण पूना ते पुणं ते पुणे असा प्रवास याच पुणेकरांनी घडवून आणला आहे. “आम्हीं शुद्ध मराठी बोलतो” असा अभिमान (प्राकृतिक भाषेत याला माज म्हणतात) असलेल्यांना म्हणूनच कोणी त्यांच्या उच्चाराबद्दलच्या चुका काढलेल्या आवडत नाही!
जन्मल्यापासून ते अर्धे आयुष्य पुण्यात घालवल्यामुळे आणि शालेय व नंतर कॉलेज वयात सर्व “पेठा” मनसोक्त सायकलने धुंडळल्याने, ण की न यावर भाष्य करण्याचा माझा “जन्मसिद्धअधिकार” आहे हे पुणेकर देखील मान्य करतील…
पाणी की पानी ?
पुण्यात “पाणी” ऐवजी “पानी” म्हणणाऱ्याला किती कुत्सितपणाने पाहिले जाते याचा अनुभव अनेक पुणेकर नसणाऱ्यांनी आणि पेठा सोडून इतर भागत राहणाऱ्यांनी घेतला असेलच.
स्वतःच्या उच्चारांवर पोकळ अभिमान असणाऱ्या पुणेकर मात्र स्वतःचे म्हणणे रेटण्यासाठी (आम्हीं किती हुशार, वगैरे, वैगरे) चुकीचे शब्दांना देखील मान्यता मिळवून घेतो.
पाणी हा व्याकरणीक तसेच बोली भाषेत अतिशय चुकीचा शब्द आहे! खरा शब्द आहे “पानीय”. या मूळ पालि भाषेतील शब्दाचा अर्थ होतो – पानी, द्रव पदार्थ, पिन्याजोगा. यावरूनच पुढील शब्द आले आहेत – पानीयघट (पान्याचा घडा), पानीय चाटी (पान्याची वाटी), पानीय थालिका (पान्याचा प्याला किंवा भांडे), पानीय साला (पानपोई), पानीय जातक नावाची कथा देखील आहे ज्यात स्वतःचे पानी साठवून ठेवून दुसऱ्याचे पानी पिणाऱ्या स्वार्थी माणसाची कथा आहे.
मराठी भाषेतील जवळपास 80% शब्द हे पालि भाषेतील आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे!
सरस्वती शब्दकोशात पानई म्हणजे पान्याचे भांडे असा अर्थ दिला आहे. याच शब्दकोशात पानक (सरबत, पेय), पानवटा (आत्ताचा पाणवठा), पानाडी (विहीर खणताना पानी किती खोल लागेल याचा अंदाज सांगणारा) दिले आहेत तसेच पाणी या शब्दाला संस्कृतमध्ये पानी असे म्हणतात हे लिहिले आहे!
अमरकोश (11वे शतक) या संस्कृत शब्दकोशात द्वितियं भूम्यादि काण्डम् मध्ये खालील श्लोक आहे –
चैत्यमायतनं तुल्ये वानिशाला तु मन्दुरा
आवेशनं शिल्पिशाला प्रपा पानीयशालिका
यात पानीयशालिका म्हणजे पान्याचे भांडे. याच ग्रंथात जवळपास 22 पानांवर, “पानी” या नावाशी संबंधित संदर्भशब्द दिले आहेत!
म्हणजेच मूळ पालि भाषेतील “पानी” हा शब्द देखील संस्कृत भाषेत “पानी” याच नावाने पाहायला मिळतो
म्हणजेच मूळ पालि भाषेतील “पानी” हा शब्द देखील संस्कृत भाषेत “पानी” याच नावाने पाहायला मिळतो मात्र 18व्या शतकानंतर पानीचे रूपांतर “पाणी” या शब्दांत स्वतःचे “वेगळे अस्तित्व” दाखविण्यासाठी झाले असावे! व्याकरणीक अर्थाने पाहिल्यास पाणी या शब्दाला कोणताही अर्थ अभिप्रेत नाही…हिंदी मध्ये देखील पानीच म्हणतात.
त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हीं पानी म्हणत असाल तर अजिबात कमीपणा समजू नका….तुम्हीं “योग्य उच्चार” करीत आहात. बिंदास पानी म्हणा किंवा तसे म्हणायला लाजू नका. जर कोणी पानी म्हटल्यानंतर तुमच्याकडे कुत्सितपणे पाहिले तर त्याला “पाणी” शब्दाचे व्याकरण किंवा शब्दकोशीय प्रमाण विचारा…
बाकी, ज्यांना न की ण म्हणून शहाणपण दाखवायचे असेल तर दाखवू द्यात….
बाकी, मराठी भाषा दिनाच्या सदिच्छा
व्हॅलेंटाईन डे,बजरंग दल च्या गुंडांना लोकांनीच पळवून पळवून मारलं
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 01,2023 12:05 PM
WebTitle – pani marathi shabd word praman bhasha