सिवान : (Mahendra Nath temple Siwan Stampede) सिवानमधील बाबामहेंद्रनाथ शिव मंदिरात जलाभिषेकादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी झालेल्या अपघातात आणखी अनेक भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये मुफसिल पोलीस ठाण्याच्या भंतापोखर येथील सोहगमती देवी आणि लीलावती देवी या दोन महिलांचा समावेश आहे.
या घटनेनंतर मंदिराचा बंदोबस्त सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा लावण्यात आला आहे.
खरं तर, कोरोनाच्या काळात (श्रावण महिन्यात ) दोन वर्षे बंद राहिल्यानंतर पहिल्या सोमवारी मंदिरात जलाभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
प्रशासनानं म्हंटलय एकच मृत्यू
मात्र, तरीही मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरी घटनेत केवळ एकाच महिलेचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.
हा सर्व प्रकार सोमवारी पहाटे ३ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मंदिराच्या दरवाजाजवळ मोठी गर्दी जमली.
शिव मंदिराचे दरवाजे उघडताच चेंगराचेंगरी झाली. मात्र, घटनेनंतर जखमींना सदर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.
त्याचबरोबर मंदिराच्या बंदोबस्तात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जखमी भाविक
या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमीही झाले आहेत. जखमीपैकी भाविकांमध्ये शिवकुमारी देवी (पती जनक भगत, शाहबाजपूर, ठाणे हुसेनगंज), अजोरिया देवी (पती दीनानाथ यादव, रा. प्रतापपूर) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गर्दीत आधी मृत्यू मग चेंगराचेंगरी
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या सोमवारी रात्रीपासून बाबा महेंद्रनाथ मंदिरात लोकांची गर्दी झाली होती.(Mahendra Nath temple Siwan Stampede) मोठी गर्दी असल्याने बाबा भोलेनाथांच्या जलाभिषेकासाठी मंदिर परिसरातही लांबच लांब रांग लागली होती. यामध्ये जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करत असताना गर्दीत दोन महिला दाबल्या गेल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कॅम्पसमध्ये गोंधळ उडून धावपळ झाली आणि त्यामुळे धावपळीत चेंगराचेंगरी झाली.या घटनेनंतर मंदिराचा बंदोबस्त सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा लावण्यात आला आहे.
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
Video:कचरा गाडीत PM मोदी,CM योगींचा फोटो,सफाई कर्मचारी बडतर्फ
दलित आणि उपेक्षित लोकांमध्ये स्वार्थी लोकांची कमतरता नाही – मायावती
मुलगा होण्याचा नवस पूर्ण वडिलांनी मंदिरात नेऊन तरुणाचा नरबळी दिला
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 18, 2022, 19:15 PM
WebTitle – stampeded in bihar siwan mahendranath shiv mandir temple two women died many injured