नागालँड : नागालँड (Nagaland) पोलिसांनी 4 डिसेंबर 2021 रोजी राज्याच्या मोन जिल्ह्यात (Mon District) झालेल्या 13 नागरी हत्येच्या संदर्भात आपल्या आरोपपत्रात 30 भारतीय लष्करी जवानांची नावे दिली आहेत, 30 सैनिकांवर 13 नागरिकांचा बळी घेण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.(Oting Tiru Area) जेव्हा लष्कराने “चुकीच्या ओळखीने” गोळीबार केला होता.यात मृत्युमुखी पडलेले सर्व सामान्य नागरिक होते.या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागालँड सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) (SIT) आपल्या आरोपपत्रात एका लष्करी अधिकारी आणि 29 सैनिकांची नावे दिली आहेत, जी न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
काय आहे प्रकरण ?
नागालँड मध्ये युनायटेड लिबरेशन फ्रंट ULFA (ULFA) ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे.गुप्तचर संघटनेने दिलेल्या माहितीवरून 3 डिसेंबर 2021 रोजी ओटिंग तिरू परिसरात (Oting Tiru Area) पॅरा स्पेशल फोर्सने तिथं एक ऑपरेशन सुरू केलं.4 डिसेंबर रोजी पहाटे 4:20 वाजता अप्पर तिरू आणि ओटिंग गावाच्या मध्यभागी लाँगखाओ येथे हल्ला करण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या ’21 पॅरा स्पेशल फोर्स’च्या ऑपरेशन टीमने ओटींग गावातील आठ सामान्य लोकांना घेऊन जाणाऱ्या पांढऱ्या बोलेरो पिकअप वाहनावर गोळीबार केला. त्यापैकी बहुतेक तिरू येथील कोळसा खाणीत मजूर म्हणून काम करत होते. सैनिकांनी या लोकांची अचूक ओळख पटवली नव्हती किंवा हल्ल्यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारचं आव्हान देण्यात आलं नव्हतं.त्यांच्यावर अतिरेकी समजून गोळीबार करण्यात आला होता.असं तपासात निष्पन्न झालंय.
30 सैनिकांवर 13 नागरिकांचा बळी घेण्याचा आरोप
आरोपपत्रात नाव असलेल्या सैनिकांवर कारवाई करण्यासाठी नागालँड सरकारने केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे.
राज्य पोलिसांनीही संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवून संबंधित सैनिकांवर कारवाई करण्यास परवानगी मागितली आहे.
नागालँड सरकारच्या SIT व्यतिरिक्त, लष्कराच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा एक स्वतंत्र सैन्य दल देखील या घटनेची चौकशी करत आहे.
लष्कराच्या चौकशीचे नेतृत्व एक मेजर जनरल करत आहेत, ज्यांनी आधीच ओटिंग गावाला भेट दिली होती
आणि घटनेपर्यंतची परिस्थिती समजून घेण्यासाठी घटनास्थळाची तपासणी केली होती.
या घटनेनंतर, सशस्त्र दल (विशेष) अधिकार कायदा, किंवा AFSPA, जो राज्याच्या मोठ्या भागांमध्ये लागू करण्यात आला आहे, तो रद्द करण्याची मागणी होत आहे. सोम जिल्ह्यातील नागरिकांच्या हत्येचे कारण म्हणून अनेकजण याकडे पाहतात.
लष्करी कारवाईत १४ नागरिकांच्या मृत्यूनंतर नागा स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा आणि वादग्रस्त एएफएसपीए( AFSPA) कायदा रद्द करावा या मागणीसाठी आंदोलन केले होते.
AFSPA अफ्स्पा कायदा काय आहे?
AFSPA ‘आर्मड् फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट (थोडक्यात अफ्स्पा) Arm Force Special Powers Act सुरक्षा दलांना कोणत्याही पूर्व वॉरंटशिवाय ऑपरेशन चालविण्याचा आणि कोणालाही अटक करण्याचे अधिकार देते, तसेच सुरक्षा दलांनी एखाद्याला गोळ्या घातल्यास त्यांना अटक आणि खटला चालवण्यापासून मुक्तता दिली जाते.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
यूट्यूबरला अटक, नूपुर शर्मा चा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता
Prophet Muhammad Protest:हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू,अनेक पोलिसही जखमी
राज्यसभा निवडणूक,आघाडीची मते फुटली – फडणवीसांची स्ट्रेटेजी यशस्वी
नूपुर शर्मा च्या अटकेच्या मागणीवरून हिंसाचार, रांचीमध्ये संचारबंदी
भीमा कोरेगाव चौकशी समितीचे मुख्यमंत्र्यांसह 6 राजकीय पक्षांना समन्स
दलित मुलाशी प्रेम ; पित्याने केली मुलीची हत्या : आई पाहत राहिली
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 12 2022, 13 : 16 PM
WebTitle – 30 soldiers charged with killing 13 civilians, charges filed