उत्तरप्रदेश – हाथरस पुन्हा एकदा हादरलं आहे. हाथरस हे आता मुली स्त्रियांसाठी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.हाथरस मध्ये महिला अत्याचार, गुंडगिरी दहशतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निकालात निघाल्याचे दिसते.हाथरस मुलीच्या पित्याचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.उत्तरप्रदेशात दिवसा ढवळ्या नागरिकांचे मुडदे पाडले जात आहेत.या दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मात्र पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून रामद्रोही लोकांचे पश्चिम बंगाल मध्ये आणि देशातही काहीच काम नाही असा दम त्यांनी दिला आहे.ते निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.
#BengalElections2021 | “In India, nothing happens without the name of Lord Ram. Why is there a barrier to saying ‘Jai Sri Ram’ in the state of West Bengal?,” asks Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath campaigning for BJP in Malda, West Bengal
हाथरस मुलीच्या पित्याचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण ?
अमरिश शर्मा हे आपल्या शेतात बटाटा पीक काढत होते.त्यांच्यासोबत इतर काही कामगारही होते.त्यावेळी संध्याकाळच्या सुमारास मुख्य आरोपी गौरव शर्मा,आणि त्याचे अन्य साथीदार रोहिताश शर्मा, निखिल शर्मा व ललितेश शर्मा आणि अन्य दोन अशा सहा लोकांनी अमरिश शर्मा यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
आरोपी गौरव शर्मा जामिनावर होता
आरोपी गौरव शर्मा जामिनावर नुकताच बाहेर आला होता. विशेष म्हणजे मृत अमरिश शर्मा यांच्या मुलीला छेडल्याच्या आरोपाखालीच त्याच्यावर 16 जुलै 2018 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता,आणि ही केस मागे घेण्यासाठीच आरोपी गौरव शर्मा आणि त्याचे साथीदार अमरिश शर्मा यांना धमकावत होते.मात्र अमरिश शर्मा हे बधले नाहीत तेव्हा आरोपी गौरव शर्मा आणि त्याच्या इतर साथीदारांनी कित्येक राऊंड गोळ्या फायर करून अमरिश शर्मा यांचा खून केला.त्यांना पोलिसांनी दवाखान्यात दाखल केले,मात्र तिथे मृत घोषित करण्यात आले.
मृत पित्याची मुलगी म्हणाली – गौरव शर्माने वडिलांना गोळ्या घातल्या
मृत अमरीश यांची मुलगी म्हणाली की , ‘गौरव शर्मा ने माझा विनयभंग केला होता त्याची तक्रार वडिलांनी पोलिस ठाण्यात केली होती.
ज्यामुळे आरोपी गौरव शर्मा याला जेल झाली होती.याच गोष्टीचा राग मनात ठेवून माझ्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
या मुलीने गोळ्या घालणाऱ्या गौरव शर्माचे नाव सांगितले आहे.
मुलीने दिला खांदा
पिताच्या हत्येनंतर अंतिम यात्रेत मुलीने पित्याच्या पार्थिवास खांदा दिला.मला न्याय द्या असं हात जोडून ती विनवणी करताना दिसत होती.
मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट यांचे कडक कारवाईचे आदेश
नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री अजयकुमार बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच आरोपींवर रासुका लावण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
परिवाराचा पोलिसांवर गंभीर आरोप
मृत अमरिश शर्मा यांच्या कुटुंबाने पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप लावला आहे,आरोपीने बघून घेईन अशी धमकी दिल्याने मृत अमरिश शर्मा यांनी पोलिसाना याबाबत कळवूनही पोलिस प्रशासन ढीम्म होते त्यांनी काहीच कारवाई केली नाही.त्यांनी योग्य पाऊले उचलली असती तर ही घटना घडली नसती असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनास्थळी सापडले डझनभर गोळ्यांच्या काडतुसांचे बॉक्स
घटनास्थळी बंदुकीच्या गोळ्यांचे डझनभर बॉक्स सापडून आले आहेत.ज्यामध्ये तीन खोके 315 बोअर आणि दोन पिस्तूलचे असल्याचे समजते.यावरून आरोपी मोठ्या तयारीने आल्याचे स्पष्ट होते,पोलिसांनी हे सर्व साहित्य ताब्यात घेतले आहे.उत्तरप्रदेशातील अवैध हत्यार आणि साहित्य याबद्दल सुद्धा यामुळे मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कायदा सुव्यवस्था शेवटच्या घटका मोजत असल्याचे स्पष्ट दिसते.
- टीम जागल्या भारत
हेही वाचा .. गॅंगरेप: मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेचा बलात्कार करून गुप्तांगात रॉड खुपसून हत्या
हेही वाचा.. हाथरस गॅंग रेप: युपी सरकार तोंडघशी,चार्जशिट दाखल
First Published on March 02 , 2021 21 :00 pm
WebTitle – Sexual assault accused Gaurav Sharma grant bail shoots dead survivor’s father in UP’s Hathras