कल्याण – येथील रेयान कंपनी बंद करून ती विकल्याने कंपनीतील कामगारांची कोट्यावधिंची थकबाकी मात्र अद्याप दिली नसल्याचे समजते,अशातच पातळगंगा येथील प्लांट चालवा म्हणून ही कंपनी बंद पाडल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.सरकार मराठी माणसाच्या बाजूने आहे की गुजराती व्यापाऱ्याच्या बाजूने ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
ते म्हणाले –
कल्याणमधील National Rayon Co.(NRC) ला बंद पाडून ३००० कामगारांना देशोधडीला लावलं गेलं. कशाला? तर पाताळगंगेतला नवीन प्लांट चालावा म्हणून. महाराष्ट्र शासनाला माणुसकी असती तर त्यांनी कामगारांसोबत अन्याय होऊ दिला नसता, पण जो निवडून जातो तो फक्तं स्वतःची तिजोरी भरण्यात धन्यता मानतो.
शासनाचे धोरण गरिबांच्या अधिकाधिक पिळवणुकीतून श्रीमंतांचा “विकास” कसा होईल एवढंच पाहणारे आहे. या धोरणांविरोधात आवाज उठवला तर जेलची हवा खा नाहीतर देश सोडून जा. NRC ही कंपनी ज्यांना विकली त्या अदानीवर ७०००० कोटींचं कर्ज आहे.
बँका बुडवण्याच्या मार्गावर असलेल्या लोकांना शासनच मदत करतं.
या कंपनीकडून कामगारांना कोट्यवधी रुपये थकबाकी म्हणून येणे आहे. ती द्यायची सोडून अदानीने या जमिनीवर असलेल्या कामगारांची घरं पाडायला सुरुवात केली आहे. हे करत असताना कामगारांविरोधात पोलीस बळाचा वापर, म्हणजे याला शासनाचीही साथ आहे.
कामगारांची देणी न देता त्यांची घरं पडायला निघालेल्या अदानी समूह व महाराष्ट्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. मराठी माणसाच्या आणि पुरोगामीत्वाच्या नावावर बसलेले हे सरकार मराठी माणसाच्या बाजूने आहे की गुजराती व्यापाऱ्याच्या बाजूने आहे हे त्यांनी जाहीर करावं.
वंचित बहुजन आघाडी कामगारांच्या बाजूने ठामपणे उभी आहे, हेही सरकारने लक्षात घ्यावे.
ऍड प्रकाश आंबेडकर
यावर आता शासन स्तरावर काय निर्णय होणार? कामगारांची थकीत बाकी आणि निवाऱ्याचे प्रश्न सुटणार का? ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने कुटुंबाच्या पुढील भवितव्याचे काय असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
- टीम जागल्या भारत
हे ही वाचा.. भांवडलशाही आणि आर्थिक विषमता
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published on March 05, 2021 16 :35 PM
WebTitle – national rayon company at Kalyan sold out workers colony houses demolished