शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
वरवरा राव यांचे वय, आरोग्य आणि कैद्याचा वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता आम्ही त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करत आहोत, असं उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे.त्यांना सहा महिन्यांचा जामीन देण्यात आला असून त्यानंतर त्यांनी स्वत:हूनहजर राहावे आणि जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करावा असं न्यायालयाने निकालामध्ये म्हटलं आहे.
तसेच राव यांच्यावरील गुन्हा गंभीर असल्याने त्यांना अंतरिम जामीन देण्यात येत असला तरी त्यांना हैदराबाद येथील घरी जाता येणार नाही, त्यांना विशेष न्यायालयाच्या परिसरातच राहावे लागेल, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
भाजपचे तेंडुलकर आरक्षण विरोधात अजेंडा रेटल्याने ट्रोल
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून आरक्षण विरोधात गरळ ओकलेली विरोध केलेला
आणि आरक्षण संपविण्यासाठी धडपड केल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात,
मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारात भारतीय जनतेसमोर भाजप हे आरक्षण संपवणारे नाहीत असं म्हणत असतात.
भाजप सोबत सत्तेत असणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपची बाजू घेताना
सतत असे म्हणताना दिसतात की भाजप आरक्षण संपवणार नाही,
भाजपकडून संविधान आणि आरक्षणाला धोका नाही.आठवले काहीही दावे करत असले तरी..
वस्तुस्थिती मात्र याच्या विपरीत दिसत आहे.
काही ठिकाणी कॉलेजियम सिस्टम आणली गेलीय,काही ठिकाणी लॅटरल एन्ट्री आणली गेलीय,तर काही ठिकाणी आरक्षणात कपात करण्यात आली आहे.त्याऐवजी EWS आरक्षण लागू करून मुळ आरक्षणाला हरताळ फासण्यात आला आहे.तथाकथित उच्चजातीयांना 10% आरक्षण देण्यात आले.राज्यघटनेत आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही. अशा परिस्थितीत हा प्रस्ताव लागू करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम १५ व १६ मध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. १२४वे घटनादुरुस्ती विधेयक २०१९ बुधवारी विरोधकांच्या गदारोळातच राज्यसभेत मांडले. राज्यात फेब्रुवारी २०१९ पासून हे आरक्षण लागू करण्यात आले आहे.या आरक्षणाचे लाभार्थी प्रामुख्याने ब्राह्मण ठाकूर आणि राजपूत जाट कम्मा असे आहेत.आश्चर्यकारक म्हणजे लाखोंचे मुक मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला यापासून वगळण्यात आल्याचे दिसते.
स्त्रिया आणि राजकारण : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचं राजकारणातील स्थान चिंताजनक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 22, 2021, 12:50 pm
Web Title: Varvara Rao got bail from mumbai high court on bases of his health condition